Half Moon Shaped Namak Paare (नमक पारे – तिखटमिठाचे शंकरपाळे)

Half Moon Shaped Namak Paare (नमक पारे - तिखटमिठाचे शंकरपाळे)

Half Moon Shaped Namak Paare (नमक पारे तिखटमिठाचे शंकरपाळे)

नमक पारे तिखटमिठाचे शंकरपाळे मराठी

There are different recipes of making Namak Paare. I use this one. With roasted cumin seeds and carom seeds, Namak Paare are very crispy and tasty. I add Piri Piri Masala to it. If you don’t want, you can skip it. Namak Paare are yummy without that as well.

After deep frying Namak Paare do not take them out on a Newspaper. Newspaper ink is injurious to health. Instead take them out on a Kitchen Tissue so that excess oil is absorbed.

Ingredients (1 cup = 250 ml)

All Purpose Flour 4 cup (or more if required)

Wheat Flour 1 cup

Milk 1 cup

Ghee (Clarified Butter) ¾ cup

Cumin Seeds 1.5 teaspoon

Carom Seeds (Ajwain) 1.5 teaspoon

Corn flour (Corn Starch) 1.5 teaspoon

Salt to taste

Chilly Powder 1.5 teaspoon

Oil for frying

Piri Piri Masala as required

Instructions

1. Dry roast Cumin Seeds and Carom Seeds separately.

2. Crush separately in coarse powder – preferably using mortal and pastel. If it’s not possible, use a grinder.

3. In a pan, beat Ghee till fluffy; add corn flour and beat again till fluffy.

4. Add milk and beat together.

5. Add Cumin powder, Carom Seeds powder, chilly powder and mix.

6. Add Wheat flour – little quantity at a time and mix. Add Salt and mix.

7. Add All Purpose Flour – little quantity at a time and bind a stiff dough. Add more All Purpose Flour if required.

8. Let the dough rest for 2-3 hours.

9. Roll Namak Paare in desired shape and deep fry on low flame till light brown.

10. Take them out on a kitchen tissue to get rid of excess oil.

11. Transfer to a plate and sprinkle Piri Piri Masala.

12. When cool, store in an air tight container.

Note

I made half moon shaped Namak Paare. I’ve given photos of how to make this shape. Note that pictures are clicked with normal chapati / Roti dough and not with Namak Paare dough.

Half Moon Shaped Namak Paare (नमक पारे – तिखटमिठाचे शंकरपाळे)
        How to make Half Moon Shape
Step 1
Step 2
  
Step 3
Step 4
 
Step 5 – Keep repeating the process
      ==================================================================================

नमक पारे तिखटमिठाचे शंकरपाळे

तिखटमिठाचे शंकरपाळे वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. मी ही रेसिपी वापरते ज्यात कणिक आणि मैदा दुधात भिजवते; आणि थोडं कॉर्न फ्लोअर घालते. जिरं आणि ओव्याची छान चमचमीत चव येते. वरून थोडा पिरी पिरी मसाला पण घालते. मस्त चविष्ट लागतात. शंकरपाळ्यांचा आकार तुम्हाला हवा तसा बनवू शकता. मी चंद्रकोरीच्या आकाराचे शंकरपाळे  बनवते. जरा वेगळं छान दिसतं

खाण्याचे पदार्थ कधीही वर्तमानपत्रावर ठेवू नयेत. मी बरेच फोटो बघते ज्यात तळलेले पदार्थ वर्तमानपत्रावर काढलेले असतात. हे अगदी चुकीचं आहे. वर्तमानपत्राची शाई खाल्ली गेली तर अगदी वाईट असते. किचन मध्ये वापरायचे टिश्यू पेपर मिळतात ते वापरा

साहित्य (१ कप = २५० मिली )

मैदा ४ कप (जरूर पडली तर आणि थोडा)

कणिक १ कप

दूध १ कप

तूप पाऊण कप

जिरं दीड चमचा

ओवा दीड चमचा

लाल तिखट दीड चमचा

कॉर्न फ्लोअर दीड चमचा

मीठ चवीनुसार

तेल तळायला

पिरी पिरी मसाला आवश्यकतेनुसार (ऐच्छिक)

कृती

. जिरं आणि ओवा वेगवेगळा खमंग भाजून घ्या.

. गार झाल्यावर जाडसर कूट करून घ्या. खलबत्त्यात केलंत तर उत्तम नाहीतर मिक्सर मधे करा.

. एका परातीत तूप होईपर्यंत फेटून घ्या. त्यात कॉर्न फ्लोअर घालून परत क्रिमी होईपर्यंत फेटून घ्या.

. त्यात दूध घालून मिक्स करा.

. जिरे पूड, ओव्याची पूडलाल तिखट घालून मिक्स करा.

. आता कणिक घालून मिक्स करा. मीठ घाला आणि मिक्स करा.

. थोडा थोडा मैदा घालून घट्ट पीठ भिजवा. जरूर असेल तेवढा मैदा घाला.

. पीठ २३ तास झाकून ठेवा.

. पीठ मळून घ्या आणि हव्या त्या आकाराचे शंकरपाळे बनवून गरम तेलात मंद आचेवर गुलाबी रंगावर तळून घ्या.

१०. तळलेले शंकरपाळे टिश्यू पेपर वर काढून घ्या म्हणजे जास्तीचं तेल पेपर शोषून घेईल.

११. गरम असतानाच शंकरपाळ्यांवर पिरी पिरी मसाला भुरभुरवा.

१२. गार झाल्यावर शंकरपाळे हवाबंद डब्यात भरून ठेवा.

Half Moon Shaped Namak Paare (नमक पारे – तिखटमिठाचे शंकरपाळे)

टीप

चंद्रकोरीचा आकार कसा करायचा त्याचे मी फोटो दिले आहेत. हे फोटो पोळीची कणिक वापरून काढले आहेत. पण पद्धत नक्की कळेल.

Step 1
  
Step 2
 
Step 3
Step 4
 
Step 5 – Keep repeating the process (हीच कृती परत परत करा )

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes