Pesarattu Dosa (पेसरट्टू डोसा – मुगाचा डोसा) – Green Gram Savory Pan Cake

Pesarattu Dosa (पेसरट्टू डोसा - मुगाचा डोसा)

Pesarattu Dosa (पेसरट्टू डोसा मुगाचा डोसा) – Green Gram Savory Pan Cake

पेसरट्टू डोसा (मुगाचा डोसा) मराठी

This dosa from Andra Pradesh is made from Green Gram (Green Moong). You can use whole Green Moong or Chhilkewali Moong Dal (Split Green Gram with husk) for this dosa. It’s an easy recipe to make very tasty and healthy dosa.

Some add rice flour to this batter. But I don’t add it. Dosa comes out well without rice flour. I serve this Dosa with Sauteed Onions.

Ingredients (Makes 6-7 Dosas) (1 cup = 250 ml)

Whole Green Gram / Split Green Gram with Husk (Chhilkewali Moong Dal)

Green Chilies 3-4

Coriander Seeds 1 tablespoon

Cumin Seeds ½ teaspoon

Chopped Coriander leaves 1 tablespoon

Salt to taste

Ghee / Oil for Pan frying dosas

Instructions

1. Wash and soak Whole Green Moong or Chhilkewali Moong Dal for 6-8 hours.

2. Drain the water and grind it into a coarse paste; add Green chilies while grinding; do not add any water.

3. Add Crushed Coriander Seeds, whole cumin seeds, chopped coriander and salt to the ground batter.

4. Mix well into a thick but spreadable batter – thicker than dosa batter; add water if required.

Dosa Batter (डोश्याचं पीठ)

5. Heat am Iron / non stick Griddle.

6. Sprinkle water and wipe it with a napkin (like we do for dosa). Pour a ladle full of batter on Griddle and spread it evenly with the ladle into a thin layer.

7. Cover and cook for 2-3 minutes on medium flame.

8. Remove the lid; put a few drops of ghee / oil; spread it on dosa.

9. Now flip the dosa and roast the other side. Put a few drops of ghee / oil.

Pesarattu Dosa (पेसरट्टू डोसा – मुगाचा डोसा)

10. When the other side is light brown, Dosa is ready.

11. Serve hot Dosas with Chutney and sautéed Onions.

Sautéed Onions

Finely chop 2 big onions. In a pan, heat a spoonful of oil. Add ¼ spoon of Cumin Seeds. Add onions and sauté. Cook covered till onions are translucent. Stir in between. Add salt and ½ teaspoon of Garam Masala. Tasty Sautéed Onions are ready.

Pesarattu Dosa (पेसरट्टू डोसा – मुगाचा डोसा)
Pesarattu Dosa (पेसरट्टू डोसा – मुगाचा डोसा)

 

=================================================================================

पेसरट्टू डोसा (मुगाचा डोसा) – Protein Packed Green Moong Dosa

पेसरट्टू डोसा हा आंध्र प्रदेशाचा खास डोसा आहे. हिरवे मूग किंवा सालाची मुगाची डाळ वापरून हा डोसा बनवला जातो. अगदी सोपी रेसिपी आहे. हे डोसे टेस्टी आणि पौष्टिक असतात.

काही जण ह्या डोश्यात थोडं तांदुळाचं पीठ घालतात. पण मी घालत नाही. लोखंडी तव्यावर छान होतात हे डोसे. आमच्या जवळच्या एका मद्रासी हॉटेलात ह्या डोश्यासोबत परतलेला कांदा देतातखूप छान लागतो. म्हणून मीही ह्या डोश्यासोबत कांदा परतून देते. नेहमीपेक्षा जरा वेगळा प्रकार

साहित्य (७ डोशांसाठी) (१ कप = २५० मिली )

हिरवे मूग / सालाची मुगाची डाळ १ कप

हिरव्या मिरच्या ३

धने १ टेबलस्पून

जिरं अर्धा टीस्पून

चिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून

मीठ चवीनुसार

तेल / तूप डोसे भाजायला

कृती

. मूग / डाळ धुवून ६८ तास पाण्यात भिजवून ठेवा.

. पाणी काढून टाका. डाळ आणि हिरव्या मिरच्या मिक्सर मध्ये जाडसर वाटून घ्या. पाणी घालू नका.

. वाटलेल्या डाळीत अर्धवट कुटलेले धने, अख्खे जिरं, कोथिंबीर आणि मीठ घालून मिश्रण एकत्र करा.

. थोडं पाणी घालून डोश्याच्या पिठापेक्षा दाट पण पसरता येईल असं पीठ बनवा.

Dosa Batter (डोश्याचं पीठ)

. एक लोखंडी / नॉन स्टिक तवा गरम करून घ्या.

. तव्यावर थोडं पाणी शिंपडून कापलेल्या कांद्याने पसरून घ्या (डोश्यांसारखं). एक मोठा डाव पीठ तव्यावर घालून डावाने पातळ पसरवा.

. झाकण ठेवून २३ मिनिटं डोसा भाजून घ्या.

. झाकण काढून डोश्यावर थोडं तेल / तूप घाला.

. डोसा पलटून दुसरी बाजू भाजून घ्या.

Pesarattu Dosa (पेसरट्टू डोसा – मुगाचा डोसा)

१०. डोसा दोन्ही बाजूंनी छान भाजला की खायला तयार आहे.

११. ह्या डोश्यासोबत चटणी आणि परतलेला कांदा छान लागतो.

परतलेला कांदा

२ मोठे कांदे बारीक चिरून  घ्या. एका कढईत १ चमचा तेल घालून त्यात पाव चमचा जिरं घाला. त्यात कांदा घालून झाकण ठेवून पारदर्शक होईपर्यंत शिजवा. मधे मधे ढवळत रहा म्हणजे कांदा करपणार नाही. कांद्यात मीठ आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून मिक्स करा. परतलेला कांदा तयार आहे. पेसरट्टू डोश्यासोबत खायला द्या

Pesarattu Dosa (पेसरट्टू डोसा – मुगाचा डोसा)
Pesarattu Dosa (पेसरट्टू डोसा – मुगाचा डोसा)