
Tomato Omlet ( टोमॅटो ऑम्लेट) – Tomato Savory Pan Cake
Tomato Omlet is a popular Indian Snack. Not sure why it is called Omlet. It’s a vegetarian snack. Whatever it is called, it does not matter. It is very delicious, healthy and filling. It can be a quick and easy breakfast item, good way to start the day. It requires ingredients that are generally available in Indian kitchen. I add crushed ginger and carom (Ajwain) seeds for the flavor.
Ingredients (Makes 7-8 Omlets)
Tomatoes 4 medium size
Onions 2 medium size
Crushed Ginger 1 teaspoon
Bengal Gram flour (Besan) 4 tablespoon
Rice Flour 2 tablespoon
Fine Semolina 2 tablespoon
Crushed Green Chillies ½ teaspoon
Carom Seeds (Ajwain) 1 teaspoon
Turmeric Powder ½ teaspoon
Chopped Coriander 2 teaspoon
Salt to taste
Oil / Butter / Ghee (Clarified Butter) for pan frying
Instructions
1. Finely chop Tomatoes and Onions.
2. In a bowl, Mix all ingredients except Oil / Ghee / Butter. Add water to make a medium consistency batter.
3. Rest the batter for 10 minutes.
4. Heat a non-stick Griddle. Turn the gas to medium flame. Pour ¼ cup of batter on the griddle and spread it evenly.
5. Cover the griddle and cook for 2-3 minutes.
6. Remove the cover. If you see wet batter on the top on Omlet. Cook for a few more minutes. Pour a few drops of oil / ghee/ butter along the edges of Tomato Omlet.
7. Flip the omlet and cook the other side without cover.
8. When both sides are cooked, Tomato Omlet is ready.
9. Serve hot with coriander chutney and /or tomato sauce. It tastes awesome with home made butter.
टोमॅटो ऑम्लेट
सर्वांचा आवडता हा पदार्थ अतिशय टेस्टी असतो. घरात नेहमी असणारं साहित्य वापरून अगदी पटकन बनवता येतो आणि हेल्दी, पोटभरीचा असतो. टोमॅटो ऑम्लेट वेगवेगळ्या प्रकारांनी बनवलं जातं. माझी ही रेसिपी अगदी सोपी आहे. टोमॅटो, कांदा चिरून पिठं घालायची. टोमॅटोचा रस वगैरे नाही काढायचा. चवीसाठी हिरवी मिरची, आलं आणि ओवा घालायचा. पिठात मी बेसनाबरोबर तांदुळाचं पीठ आणि बारीक रवा घालते. त्यामुळे ऑम्लेट दडदडीत होत नाही; छान टेक्सचर येतं.
साहित्य (८–९ ऑम्लेट साठी)
टोमॅटो ४ मध्यम
कांदे २ मध्यम
ठेचलेलं आलं १ चमचा
ठेचलेली हिरवी मिरची अर्धा चमचा
ओवा १ चमचा
बेसन ४ टेबलस्पून
तांदुळाचं पीठ २ टेबलस्पून
बारीक रवा २ टेबलस्पून
हळद अर्धा चमचा (हळद जास्त झाली तर रंग काळपट येतो)
चिरलेली कोथिंबीर २ चमचे
मीठ चवीनुसार
तेल/ तूप / बटर ऑम्लेट भाजायला
कृती
१. टोमॅटो आणि कांदे बारीक चिरून घ्या.
२. एका बाउल मध्ये वरील सर्व साहित्य (तेल / तूप / बटर वगळून ) मिक्स करा.
३. थोडं थोडं पाणी घालून मध्यम पातळ पीठ भिजवा (भज्यांच्या पिठासारखं ).
४. पीठ १० मिनिटं झाकून ठेवा.
५. नॉन स्टिक तवा गरम करून घ्या.
६. गॅस मध्यम करून पाव कप पीठ तव्यावर ओता. ओतताना कप गोल फिरवा आणि हाताने पीठ सारखं करा.
७. झाकण ठेवून २–३ मिनिटं भाजा. झाकण काढून बघा. ओलं पीठ ऑम्लेट वर दिसत असेल तर परत १–२ मिनिटं भाजा.
८. कडेनी थोडं तूप / तेल / बटर सोडा.
९. ऑम्लेट परतून दुसरी बाजू झाकण न ठेवता भाजून घ्या.
१०. गरमगरम टोमॅटो ऑम्लेट चटणी / सॉस बरोबर खायला द्या. लोण्याबरोबर हे ऑम्लेट अप्रतिम लागते.
Leave a Reply