Katache Tomato Rasam (कटाचं टोमॅटो रसम) – South Indian Tomato Soup using Bengal Gram Stock
Tomato Rasam is a South Indian specialty. It’s a kind of soup that is served as an appetizer or it is served with Rice. Generally no lentils are added to it. But sometimes Roasted split Bengal Gram (Chana Dal) is added while making Rasam Powder that is added to Rasam. This gives little thickness to Rasam. Since we don’t use Rasam Powder regularly, I added the powdered ingredients separately. Also instead of plain water, I added Split Bengal Gram Stock which I had separated out while making Puran Poli (This stock is called Kat (कट) in Marathi). You can make this Rasam without the stock.
Ingredients (Serves 4)
Tomatoes 4 medium size
Bengal Gram Stock / Plain Water 2-3 cups
Crushed Garlic clove 1-2 optional
Tamarind Taste ½ teaspoon (if required)
Coriander Powder 1 teaspoon
Cumin Powder ½ teaspoon
Black Pepper Powder ½ teaspoon
Chopped Coriander 2 teaspoon
Ghee (Clarified Butter) / Oil 1 teaspoon
Mustard Seeds ¼ teaspoon
Cumin Seeds ¼ teaspoon
Fenugreek Seeds (Methi) 5-6 grains
Asafoetida a pinch
Turmeric Powder ¼ teaspoon
Curry Leaves 7-8
Dry Red Chillies 1-2 with a slit lengthwise
Salt to taste
Instructions
1. Finely chop Tomatoes.
2. In a pan, heat Ghee / Oil. Add Mustard Seeds, wait for sputter; Add cumin seeds, wait for splutter. Add Fenugreek Seeds, Turmeric Powder, Asafoetida, Red chillies and Curry Leaves.
3. Add chopped Tomatoes. Sauté for 2-3 minutes.
4. Add Salt and Cook covered till Tomatoes are soft.
5. Mash Tomatoes with a spoon.
6. Add Bengal Gram Stock / Plain Water. Bring the mixture to boil.
7. Add Crushed Garlic, Tamarind Pulp, Coriander Powder, Cumin Powder, Black Pepper Powder. Boil the mixture for 4-5 minutes. Adjust the consistency by adding water, if required.
8. Add chopped coriander, boil mixture for 1 minute.
9. Yummy Tomato Rasam is ready. Serve hot as an Appetizer or serve with Rice. It tastes awesome.
==================================================================================
कटाचं टोमॅटो रसम
आमच्याकडे कटाची आमटी आवडत नाही. म्हणून मी कटाचं टोमॅटो रसम बनवते जे सगळे आवडीने खातात. मी रसम मसाला न बनवता हे रसम बनवते. कारण रसम मसाला वापरला जात नाही आणि पडून राहतो. रसम हे एक प्रकारचं दक्षिण भारतीय सार आहे. जे सूप म्हणून सर्व्ह करतात किंवा भाताबरोबर खातात. खूप टेस्टी आणि पौष्टिक पदार्थ आहे. कट न वापरता करायचं असेल तर साधं पाणी घालून ही रसम बनवता येतं. नक्की करून बघा हा चविष्ट पदार्थ.
साहित्य (४ जणांसाठी)
टोमॅटो ४ मध्यम आकाराचे
कट / पाणी २– ३ कप
ठेचलेली लसूण १–२ पाकळ्या (ऐच्छिक)
चिंचेचा कोळ अर्धा चमचा (जरूर पडल्यास)
धने पावडर १ चमचा
जिरे पावडर अर्धा चमचा
काळी मिरी पावडर अर्धा चमचा
चिरलेली कोथिंबीर २ चमचे
तूप / तेल १ चमचा
मोहरी पाव चमचा
जिरं पाव चमचा
मेथी दाणे ५–६
हळद पाव चमचा
हिंग चिमूटभर
कढीपत्ता ७–८ पानं
सुक्या लाल मिरच्या १–२ मधे चीर देऊन
मीठ चवीनुसार
कृती
१. टोमॅटो बारीक चिरून घ्या.
२. एका पातेल्यात तूप / तेल गरम करून मोहरी, जिरं, मेथी दाणे, हळद, हिंग, लाल मिरच्या, कढीपत्ता घालून फोडणी करा.
३. त्यात टोमॅटो घाला आणि २–३ मिनिटं चांगलं परतून घ्या.
४. मीठ घाला. झाकण ठेवून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. शिजताना पाणी घालू नका.
५. चमच्याने टोमॅटो मॅश करून घ्या.
६. कट / पाणी घालून एक उकळी काढा.
७. त्यात धने पावडर, जिरे पावडर, मिरी पावडर, लसूण आणि चिंचेचा कोळ घाला. ४–५ मिनिटं उकळून घ्या.
८. पाणी घालून रसम हवे तेवढे पातळ करून घ्या.
९. चिरलेली कोथिंबीर घालून १ मिनिट घाला.
१०. चविष्ट टोमॅटो रसम तयार आहे. गरमागरम रसम सूप म्हणून सर्व्ह करा किंवा भाताबरोबर सर्व्ह करा.
Your comments / feedback will help improve the recipes