Vegetable Cutlet (व्हेजिटेबल कटलेट)
Vegetable Cutlet is a popular yummy snack that people enjoy at any time of the day. It’s healthy and quite filling. Recipe is quite easy. Also you can modify the recipe to add vegetables that you like and remove those that you don’t like. It is necessary to add a few boiled potatoes to bind all veggies together. To make the mixture dry, I add some Flattened Rice (Poha) and Oats. I don’t add bread crumbs. The yummy taste of cutlets is due to Crushed Ginger and Garam Masala.
Ingredients (Makes 24-25 cutlets)
Boiled Potatoes 5 medium size
Beet root 2 medium size
Carrots 4 medium size
Cauliflower grated 1 cup
Cabbage grated 1 cup
Finely chopped Onions 2 medium size
Chopped Coriander 2 tablespoon
Crushed Ginger 1 teaspoon
Garam Masala 1 teaspoon
Crushed Chillies ½ teaspoon
Chilly Powder ½ teaspoon
Mango Powder ½ teaspoon
Sugar 1 teaspoon (optional)
Thick Flattened Rice 2-3 tablespoon
Oats About 2 tablespoon
Fine Semolina for rolling cutlets
Salt to taste
Oil for shallow frying
Instructions
1. Peel boiled Potatoes and grate them.
2. Wash and Peel Beet Root and Carrots and Grate them.
3. Wash and drain Flattened rice.
4. In a bowl, mix all ingredients except Semolina and oil. Mixture may be little moist but because of Flattened rice, it will dry up after you rest it. Leave the mixture for 30 minutes.
5. If mixture is still very moist, add some more flattened rice (washed and drained).
6. Make big lemon size balls of the mixture and flatten them to make round discs. Or use cookie cutter to make cutlets in required shapes.
7. Roll these cutlets in Semolina and shallow fry on medium heat on a heated griddle. Add some oil on the griddle while shallow frying cutlets. Roast on both sides till light brown.
8. Serve hot with coriander chutney and /or tomato sauce.
==================================================================================
व्हेजिटेबल कटलेट
व्हेजिटेबल कटलेट हा सगळ्यांना आवडणारा चविष्ट पदार्थ आहे. पोटभरीचा आणि पौष्टिक असा हा प्रकार तुम्ही कधीही खाऊ शकता. रेसिपि सोपी आहे. आणि तुम्ही रेसिपी बदलून तुम्हाला आवडणाऱ्या भाज्या घालू शकता आणि न आवडणाऱ्या भाज्या वगळू शकता. थोडे उकडलेले बटाटे घालणं मात्र जरुरी आहे मिश्रण एकत्र करायला. मिश्रण सुकं करायला मी ह्यात ब्रेड क्रम्ब्स न घालता थोडे जाडे पोहे आणि ओट्स घालते. त्यांनी कटलेट आणखी पौष्टिक होतात. कटलेट ची चमचमीत चव आलं आणि गरम मसाल्यानी येते.
साहित्य (२४–२५ कटलेट साठी)
उकडलेले बटाटे ५ मध्यम
बीट रूट २ मध्यम
गाजर ४ मध्यम
कॉलिफ्लॉवर किसून १ कप
कोबी किसून १ कप
बारीक चिरलेले कांदे २ मध्यम
बारीक चिरलेली कोथिंबीर २ टेबलस्पून
ठेचलेलं आलं १ चमचा
गरम मसाला १ चमचा
ठेचलेली हिरवी मिरची अर्धा चमचा
लाल तिखट अर्धा चमचा
आमचूर अर्धा चमचा
साखर १ चमचा (ऐच्छिक)
जाडे पोहे २–३ टेबलस्पून
ओट्स २ टेबलस्पून
बारीक रवा कटलेट भाजताना लावायला
तेल कटलेट भाजण्यासाठी
मीठ चवीनुसार
कृती
१. उकडलेले बटाटे सोलून किसून घ्या.
२. बीट आणि गाजर सोलून किसून घ्या.
३. पोहे धुवून पाणी निथळून घ्या.
४. एका बाउल मध्ये रवा आणि तेल वगळून सर्व जिन्नस एकत्र करा. मिश्रण थोडं ओलसर असलं तरी पोह्यामुळे थोड्या वेळाने सुकेल. मिश्रण अर्धा तास झाकून ठेवा.
५. मिश्रण अजून फार ओलं असेल तर थोडे पोहे भिजवून घाला आणि मिक्स करा.
६. मिश्रणाचे मोठ्या लिंबाएवढे गोळे करून हवा तो आकार द्या.
७. तवा गरम करा. कटलेट रव्यात घोळवून तव्यावर ठेवा. थोडं तेल घालून मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्या.
८. गरमागरम कटलेट चटणी / सॉस बरोबर खायला द्या.
Your comments / feedback will help improve the recipes