Batatyachya Kacharya (बटाट्याच्या काचऱ्या) – Subji using Raw Potato Slices
This is a Maharashtrian style Potato Subji that uses Raw Potatoes instead of Boiled Potatoes. Kacharya in Marathi is a specific way of chopping vegetables when we make thin slices of veggies. This Subji is very common in Maharashtrian households but is not available in restaurants. This subji does not use Onion and Garlic and yet it is tasty. This is a very easy recipe and does not require too many ingredients.
Ingredients (Serves 4)
Raw Potatoes 8 medium size
Crushed Chilies 1 teaspoon / Green Chilies 3-4 with a slit lengthwise
Curry leaves 7-8
Fresh Scraped coconut 2 tablespoon
Chopped coriander 1 tablespoon
Lemon Juice ½ teaspoon
Sugar ½ teaspoon (adjust as per taste)
Salt to taste
For Tempering / Tadka
Oil 1 tablespoon
Mustard Seeds ¼ teaspoon
Cumin Seeds ¼ teaspoon
Turmeric Powder ½ teaspoon
Asafoetida (Hing) 2 pinch
Instructions
1. Wash Potatoes. I generally do not peel potatoes. If you want you can peel them. Cut a potato into 2 / 4 pieces depending on the size and then chop each pieces into thin slices (about 2-3 mm thick). If you are not making subji immediately, then add enough water in the bowl to cover potato slices completely. This will prevent Potatoes turning black.
2. In a wok, heat oil on medium heat.
3. Add mustard seeds, wait for splutter; add cumin seeds, wait for splutter.
4. Add Asafoetida, crushed chilies, and curry leaves. (I always make small pieces of curry leaves so that one can easily eat them).
5. Add potato slices (do not pour water) and turmeric powder. Mix.
6. Saute for 2-3 minutes. Cook covered till Potatoes are soft. Regularly stir the subji. If Subji is too dry, sprinkle little water and then cook.
7. Add Sugar, Salt, Lemon juice, Scraped coconut, chopped coriander and gently mix.
8. Cook for 2 minutes and this tasty Batatyachya Kacharya are ready.
9. Serve hot with Puri or Roti (Indian Bread) or Curd Rice.
===================================================================================
बटाट्याच्या काचऱ्या – सगळ्यांची आवडती सोपी भाजी
बटाट्याच्या काचऱ्या ही महाराष्ट्रीयन भाजी घरोघरी केली जाते. महाराष्ट्राबाहेर ही भाजी माहीत नसेल कारण मी कुठल्याही हॉटेलात ही भाजी बघितली नाही. कच्च्या बटाट्याच्या काचऱ्या (छोटे पातळ काप) कापून केलेली ही भाजी पटकन होते आणि छान लागते. ही कांदा लसूण न घालता केलेली सात्विक भाजी आहे.
साहित्य (४ जणांसाठी)
कच्चे बटाटे ८ मध्यम आकाराचे
ठेचलेली हिरवी मिरची १ चमचा / हिरव्या मिरच्या उभ्या मधे कापून ३–४
कढीपत्ता ७–८ पानं
ताजा खवलेला नारळ २ टेबलस्पून
चिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून
लिंबाचा रस अर्धा चमचा
साखर अर्धा चमचा (चवीनुसार कमी / जास्त करा)
मीठ चवीनुसार
फोडणीसाठी
तेल १ टेबलस्पून
मोहरी पाव चमचा
जिरं पाव चमचा
हिंग २ चिमूट
हळद अर्धा चमचा
कृती
१. बटाटे धुवून घ्या. मी बटाट्याची सालं काढत नाही. तुम्हाला हवी असतील तर सालं काढून टाका. प्रत्येक बटाट्याचे २ / ४ तुकडे करा. आणि प्रत्येक तुकड्याचे पातळ काप करा – साधारण २–३ मिमी जाडीचे.
२. भाजी लगेच करणार नसाल तर काप पाण्यात बुडवून ठेवा म्हणजे काळे पडणार नाहीत.
३. एका कढईत तेल गरम करून मोहरी, जिरं, हिंगाची फोडणी करा. त्यात हिरवी मिरची आणि कढीपत्ता घाला. मी कढीपत्त्याचे बारीक तुकडे करून घालते म्हणजे खाल्ले जातात.
४. बटाट्याच्या काचऱ्या कढईत घाला. पाणी घालू नका. हळद घाला अमी २–३ मिनिटं परतून घ्या.
५. आता झाकण ठेवून वाफेवर बटाटे मऊ होईपर्यंत शिजवा. मधे मधे भाजी ढवळा. फार सुकी असेल तर थोडं पाणी शिंपडा.
६. आता मीठ, साखर, लिंबाचा रस, नारळ आणि कोथिंबीर घालून मिक्स करा. २ मिनिटं शिजवा.
७. बटाट्याच्या चविष्ट काचऱ्या तयार आहेत. गरम काचऱ्या पोळी / भाकरी किंवा दही भाताबरोबर सर्व्ह करा.
Your comments / feedback will help improve the recipes