Rajma Madra – Himachali Style Rajma Masala (राजमा मद्रा – हिमाचली पद्धतीचा राजमा मसाला)– Kindney Beans Madra Style

Rajma Madra - Himachali Style Rajma Masala (राजमा मद्रा - हिमाचली पद्धतीचा राजमा मसाला)

Rajma Madra – Himachali Style Rajma Masala (राजमा मद्रा हिमाचली पद्धतीचा राजमा मसाला)– Kindney Beans Madra Style

राजमा मद्रा (हिमाचली पद्धतीचा राजमा मसाला) मराठी

While traveling from Shoja to Sangla in Himachal Pradesh, we had lunch in a small roadside joint. The owner lady served us Rajma Chaval. This Rajma was very different – it was cooked without Onion Garlic but it was super yummy. I’d never tried to cook Rajma earlier.  I bought Himachali Rajma (This is yellowish in colour and grains are small as compared to Punjabi Rajma). I searched Himachali style Rajma Recipe on internet. I found one that I thought would taste like the one we had in Himachal Pradesh. Made some changes to the recipe (as usual) and tried it; and it came out so yummy!! We all liked it very much. This type of recipes are called Madra recipes which use curd and beans like Kidney beans (Rajma), Chickpeas (Chhole) or Black eyed beans (Lobiya). Try this out, it’s yummy.

Ingredients (Serves 4) (1 cup = 250 ml)

Kidney Beans (Rajma) 1 cup

Cinnamon 1 inch piece

Cloves 2

Green Cardamom 2

Bay Leaf 1

Pure Ghee (Clarified Butter) 2 tablespoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Asafoetida a pinch

Curd 1 cup

Turmeric Powder ½ teaspoon

Cumin Powder ½ teaspoon

Coriander Powder ¾ teaspoon

Garam Masala ½ teaspoon

Kashmiri Red Chili Powder ¾ to 1 teaspoon (adjust as per taste)

Dried Fenugreek Leaves (Kasuri Methi) 1 teaspoon

Salt to taste

Instructions

1. Wash and soak Rajma in water for 8 hours.

2. Drain water; add 2.5 to 3 cups of water to Rajma; add whole spices – Cinnamon, Cloves, Green Cardamom and Bay Leaf to Rajma bowl and pressure cook till Rajma is soft. Himachali Rajma cooks faster – for me it took just 2 whistles in pressure cooker. But Big Red Rajma will take longer to cook.

3. Once the pressure settles down, check if Rajma is cooked properly. It should be soft when you press with a spoon. If it’s not cooked, cook again. Undercooked Rajma won’t be good for the recipe.

4. In a bowl, whisk curd without adding water.

5. In a pan, heat Ghee. Add cumin seeds; wait for splutter; add Asafoetida.

6. Switch off the gas. Add curd and immediately mix.

7. Switch on the gas on low flame. Keep stirring curd mixture continuously till you see a layer of Ghee on curd.

8. Now add Turmeric powder, cumin powder, Garam Masala, Kashmiri Chili Powder, Coriander Powder and mix.

9. Remove all whole spices from Rajma. Add Cooked Rajma along with the stock. Mix.

10. Add Salt and mix.

11. Keep cooking for 10 minutes till you get required consistency of the gravy. If gravy is too thick, add some water.

12. Crush dried Fenugreek Leaves (Kasuri Methi) with fingers and add to the pan. Mix.

13. Yummy Rajma Madra is ready. Enjoy hot Rajma with steamed rice or rotis. But it tastes better with rice.

Rajma Madra – Himachali Style Rajma Masala (राजमा मद्रा – हिमाचली पद्धतीचा राजमा मसाला)
Rajma Madra – Himachali Style Rajma Masala (राजमा मद्रा – हिमाचली पद्धतीचा राजमा मसाला)
Rajma Madra – Himachali Style Rajma Masala (राजमा मद्रा – हिमाचली पद्धतीचा राजमा मसाला)

===================================================================================

राजमा मद्रा (हिमाचली पद्धतीचा राजमा मसाला) – कांदा लसूण न घालता

हिमाचल प्रदेशात शोजाहून सांगल्याला जाताना एका छोट्याश्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. तिथे आम्ही जसे राजमा चावलखाल्ले तसे आधी कधीच खाल्ले नव्हते. विचारपूस केल्यावर कळलं की राजमा हिमाचली पद्धतीने बनवला होता कांदा लसूण न घालता. ती चव जिभेवर रेंगाळत होती. एकदा हिमाचली राजमा विकत आणला (हा पिवळसर रंगाचा असतो आणि छोटा असतो पंजाबी राजम्यापेक्षा) तेव्हा रेसिपी ची शोधाशोध केली. एक रेसिपी मिळाली जी लक्षात राहिलेल्या चवीशी मिळतीजुळती वाटली. त्या रेसिपीत थोडे बदल करून (नेहमीप्रमाणे) राजमा बनवला. आणि खरंच, त्या आठवणीतल्या चवीसारखाच झाला.

ह्या रेसिपीज ना मद्रा रेसिपीज म्हणतात. ह्यात दही घालतात आणि एखादं कडधान्य राजमा, छोले किंवा चवळी. नक्की करून बघा ही सात्विक रेसिपी.

साहित्य (४ जणांसाठी) (१ कप = २५० मिली )

राजमा १ कप

दालचिनी १ इंचाचा तुकडा

लवंग २

वेलची २

तमालपत्र १

साजूक तूप २ टेबलस्पून

जिरं पाव टीस्पून

हिंग १ चिमूट

दही १ कप

हळद अर्धा टीस्पून

जिरं पूड अर्धा टीस्पून

गरम मसाला अर्धा टीस्पून

धने पूड पाऊण  टीस्पून

काश्मिरी मिरची पावडर पाऊण एक टीस्पून (चवीनुसार कमी / जास्त करा)

कसुरी मेथी १ टीस्पून

मीठ चवीनुसार

कृती

. राजमा धुवून ८ तास पाण्यात भिजवून ठेवा.

. पाणी ओतून टाका आणि एका पातेल्यात राजमा घालून त्यात अडीच ते तीन कप पाणी घाला. दालचिनी, लवंग, वेलची आणि तमालपत्र अख्खच  घाला.

. प्रेशर कुकर मध्ये राजमा मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. मी आणलेला राजमा २ शिट्यांमध्ये शिजला. जाड राजमा शिजायला वेळ लागतो. राजमा शिजला नसेल तर परत शिजवा

. दही पाणी न घालता घुसळून घ्या.

. एका कढईत तूप घालून जिरं, हिंगाची फोडणी करा. गॅस बंद करून दही घाला आणि लगेच मिक्स करा.

. कढई गॅस वर ठेवून बारीक आचेवर ढवळत राहा. दह्याच्या वर तुपाचा तवंग येईपर्यंत ढवळत राहा .

. आता त्यात हळद, जिरं पूड, गरम मसाला, काश्मिरी मिरची पावडर, धने पूड घालून मिक्स करा.

. राजम्यातले अख्खे मसाले काढून टाका. आणि राजमा वरच्या पाण्यासकट कढईत घाला.

. मीठ घाला. उकळी काढा आणि १० मिनिटं मंद आचेवर शिजवा. रस जेव्हढा दाट हवा असेल तसा आटवा. जास्त दाट झाला असेल तर थोडं पाणी घाला.

१०. कसुरी मेथी हाताने चुरून घाला. मिक्स करून गॅस बंद करा.

११. स्वादिष्ट राजमा मद्रा तयार आहे. गरमगरम राजमा भाताबरोबर / पोळीबरोबर खायला द्या. हा भाताबरोबर जास्त छान लागतो

 

Rajma Madra – Himachali Style Rajma Masala (राजमा मद्रा – हिमाचली पद्धतीचा राजमा मसाला)
Rajma Madra – Himachali Style Rajma Masala (राजमा मद्रा – हिमाचली पद्धतीचा राजमा मसाला)
Rajma Madra – Himachali Style Rajma Masala (राजमा मद्रा – हिमाचली पद्धतीचा राजमा मसाला)

2 Comments

Your comments / feedback will help improve the recipes