Vangyache Bharit (वांग्याचं भरीत ) – Baingan Bharata
This is a popular Indian dish served as Main Course. There are different recipes to make Vangyache Bharit. But the first step in all recipes is same – to roast the Brinjal. Baingan Bharata served in restaurants is generally made using this recipe. It’s an easy recipe that makes yummy Bharata.
Ingredients (Serves 4)
Big Brinjal 3 medium size (I generally use Brinjals with dark skin but you can also use the green ones)
Onion 2 medium finely chopped
Tomato 1 medium finely chopped
Chili Paste ½ teaspoon
Scraped fresh coconut 1 tablespoon
Chopped coriander 2 teaspoon
Sugar ½ to 1 teaspoon (Adjust as per taste)
Salt to taste
Oil 1 tablespoon
Mustard Seeds ¼ teaspoon
Cumin Seeds ¼ teaspoon
Turmeric Powder ½ teaspoon
Asafoetida a pinch
Instructions
1. Wash Brinjals and wipe with kitchen tissue, remove the green part around the stem; do not cut the stem. Apply little oil on the skin of Brinjal and roast it on direct gas flame till the skin gets dark. Once one side is roasted, Rotate brinjal and roast other sides. Leave to cool.
2. Peel off Brinjals; taste Brinjals individually. If Brinjal is bitter don’t use it. Mash the flesh with help of a spoon. You can hold brinjal using the stem while peeling. After mashing Brinjal, discard the stem.
3. In a pan, heat oil. Add mustard seeds, wait for splutter; add cumin seeds, wait for splutter. Add Turmeric Powder, Asafoetida and Chili Paste. Turn the flame to low.
4. Add Chopped onion. Saute for 2 minutes.
5. Add Chopped tomatoes. Saute for 2 minutes.
6. Cook covered till onions are translucent.
7. Add Brinjal Flesh. Mix.
8. Add Salt, Sugar, Coconut and Coriander. Mix. Cook without lid for 3-4 minutes.
9. Delicious Baingan Bharata is ready. Serve hot with Roti / Bhakari (Indian Bread).
===================================================================================
वांग्याचं भरीत
खमंग भाजलेल्या वांग्याचं भरीत बहुतेक सगळ्यांना आवडतं. भरीत वेगवेगळ्या रीतीने करता येतं. रेस्टॉरंट मध्ये ‘बैंगन भरता’ ह्या नावानी जे मिळतं त्याची ही रेसिपी आहे. भरताच्या सगळ्या रेसिपीमध्ये पहिली स्टेप वांगं भाजण्याची असते. वांगं भाजून सोललं की नंतर ची कृती अगदी सोपी आहे.
साहित्य (४ जणांसाठी)
भरताची वांगी ३ मध्यम आकाराची (जांभळी किंवा हिरव्या सालीची – कुठलीही चालतील)
कांदे २ मध्यम बारीक चिरून
टोमॅटो १ मध्यम बारीक चरून
ठेचलेली हिरवी मिरची अर्धा चमचा
ताजा खवलेला नारळ १ टेबलस्पून
चिरलेली कोथिंबीर २ चमचे
साखर अर्धा ते १ चमचा (चवीनुसार कमी /जास्त करा)
मीठ चवीनुसार
तेल १ टेबलस्पून
मोहरी पाव चमचा
जिरं पाव चमचा
हळद अर्धा चमचा
हिंग चिमूटभर
कृती
१. वांगी धुवून पुसून घ्या. देठालगतच्या हिरव्या पाकळ्या काढून टाका. देढ कापू नका. वांगी भाजताना देढाला धरून फिरवता येतात. वांग्यांना २ थेम्ब तेल लावून डायरेक्ट गॅसवर भाजून घ्या. सर्व बाजूनी साल काळी होईपर्यत भाजा.
२. थंड झाल्यावर सालं काढून टाका. प्रत्येक वांगं चाखून बघा. एखादं वांगं कडू असेल तर भरीत कडू होतं.
३. एका हाताने वांग्याचा देढ धरून चमच्याने वांग्याचा गर कुस्करून घ्या. आता देढ काढून टाका.
४. एका कढईत तेल घालून मोहरी, जिरे, हळद आणि हिंगाची फोडणी करा. त्यात हिरवी मिरची घाला.
५. कांदा घालून २ मिनिटं परतून घ्या.
६. टोमॅटो घालून २ मिनिटं परतून घ्या.
७. चिमूटभर मीठ घालून मिक्स करा आणि झाकण ठेवून मंद आचेवर कांदा पारदर्शक होईपर्यंत शिजवा. मधे मधे ढवळत राहा.
८. आता वांग्याचा गर घाला. मिक्स करा.
९. मीठ, साखर, नारळ , कोथिंबीर घालून ३– ४ मिनिटं परता.
१०. वांग्याचं चविष्ट भरीत तयार आहे. गरमगरम भरीत पोळी / भाकरी बरोबर खायला द्या.
Your comments / feedback will help improve the recipes