Rava Malai Laadoo (रवा मलई लाडू) – Semolina Laddus with Milk Cream – Easy Laddus without Sugar Syrup
Generally while making Rava laddus, sugar syrup (Chasni) is required. Many people are not very confident of making sugar syrup of required consistency. Can’t the sugar syrup be avoided? Yes. It can be avoided. Try these laddus that does not need sugar syrup. This is my friend’s recipe to make delicious Rava Laddus. It’s a very easy recipe where nothing can go wrong.
Ingredients (Makes 15-16 Laddus)
Rava Jada / medium (Semolina coarse / medium coarse) 1 cup
Powdered Sugar / Bura Sugar ¾ cups
Fresh Milk Cream (Malai) ½ cup
Cardamom (Eliachi) Powder ¼ teaspoon
Chopped Dry Fruits 2 tablespoon
Instructions
1. Dry Roast Semolina on medium flame till colour changes to pink.
2. Switch off the gas. Add Milk cream (Malai), mix and cover the pan. Leave it to cool.
3. After 30 minutes, add Powdered / Bura sugar and mix.
4. Add dry fruits, cardamom powder and mix.
5. Roll lemon size laddus. If mixture is dry, add ½ tablespoon Milk cream to the mixture and mix.
6. Enjoy these delicious Laddus. Laddus will last for 4-5 days at room temperature.
Note
1. Bura sugar is fine granular sugar which is made by boiling sugar syrup to reach crystallization. Advantage of Bura sugar is lumps are not formed unlike powdered sugar.
===================================================================================
रवा मलई लाडू – साखरेचा पाक न करता बनणारे सोपे लाडू
रव्याचे लाडू करताना साखरेचा पाक करावा लागतो. आणि बऱ्याच जणांना साखरेचा पाक नीट जमत नाही. हे वेगळ्या प्रकारचे लाडू सगळ्यांना नक्कीच आवडतील कारण ह्यात साखरेचा पाक करावा लागत नाही. माझ्या मैत्रिणीची ही रेसिपी आहे ज्यात मलई घालून लाडू बनवले जातात. अगदी सोपी रेसिपी आहे आणि लाडू फार स्वादिष्ट बनतात. आणि मुख्य म्हणजे काही चुकेल ही धास्तीच नाही.
साहित्य (१५–१६ लाडवांसाठी)
जाड / मध्यम जाड रवा १ कप
पिठीसाखर साखर (किंवा बुरा साखर) पाऊण कप
मलई (साय) अर्धा कप
वेलची पूड पाव चमचा
सुके मेवे बारीक तुकडे करून २ टेबलस्पून
कृती
१. एका कढईत रवा घालून मंद आचेवर सुकाच भाजा. सारखं ढवळत राहा.
२. रवा गुलाबी रंगावर भाजला की गॅस बंद करा.
३. रव्यात मलई घालून मिश्रण नीट ढवळा आणि झाकण ठेवून गार व्हायला ठेवा.
४. अर्ध्या तासाने साखर घालून ढवळून घ्या.
५. सुके मेवे, वेलची पूड घालून मिक्स करा.
६. मध्यम आकाराचे लाडू वळा. मिश्रण सुकं झालं असेल तर अर्धा टेबलस्पून मलई घालून मिक्स करा आणि लाडू वळा.
७. चविष्ट रवा मलई लाडू तयार आहेत.
८. हे लाडू फ्रिज मध्ये न ठेवता ४–५ दिवस टिकतात.
टीप
१. बुरा साखर ही अगदी बारीक दाणेदार साखर असते. ती बनवताना साखरेचं पाणी उकळून त्यातलं सगळं पाणी काढून टाकतात. ह्या साखरेत पिठीसाखरेसारख्या गुठळ्या होत नाहीत.
मस्त
\r\nThank you Jayshree
Can I use fresh cream (Amul) instead of the malai ?
Use fresh cream – Malai. Amul fresh cream will change the taste of Laddus.