Amiri Khaman (अमिरी खमण ) – Popular Gujarati Snack made using Khaman Dhokla
This is a famous Gujarati Snack made using Khaman Dhokla. Crumbled khaman dhokla is tempered and mixed with Pomegranate seeds. This tastes awesome. I’d shared Instant Khaman Dhokla recipe earlier. Click on the following link to find Khaman Dhokla Recipe:
https://myfamilyrecipes.kunkalienkar.com/2018/09/khaman-dhokla
Ingredients (Serves 5) (1 cup = 250 ml)
Ready Khaman Dhokla made using 1.5 cups of Gram Flour (Besan) – Do not add tempering
Oil 2 tablespoon
Mustard seeds ¼ teaspoon
Cumin Seeds ¼ teaspoon
Asafoetida 2 pinch
Curry leaves 8-10
Cashew nuts 10-12 cut into small pieces
Raisins(Khishmish) 10-12
Chopped coriander 2 tablespoon
Pomegranate Seeds about 1 cup for Garnishing
Nylon Sev for Garnishing
Instructions
1. Steam Khaman Dhokla using the recipe provided in the link. Allow it to cool.
2. Crumble it using fingers. It will turn into a coarse powder.
3. In a pan, make tempering using Oil, mustard seeds, cumin seeds, Asafoetida, curry leaves, Cashew nuts and Raisins.
4. Add crumbled Dhokla into the pan. Add chopped coriander and mix well. If mixture is too dry, sprinkle ¼ cup of water. Cook covered for 2 minutes.
5. Serve hot Amiri Khaman along with Nylon Sev, Pomegranate Seeds and Coriander.
Note
1. You can add crushed Garlic and fresh scraped coconut also. Add garlic in the tempering and scraped coconut while serving.
2. You can also make Amiri Khaman using Khaman Dhokla that does not puff up.
====================================================================================
अमिरी खमण
अमिरी खमण हा अतिशय लोकप्रिय गुजराती पदार्थ आहे. खमण ढोकळ्याला फोडणी देऊन त्यात सुका मेवा घालून बनणारा हा नाश्त्याचा प्रकार खूप चविष्ट लागतो. पूर्वी जेव्हा मी तयार पाकिटं आणून खमण ढोकळा बनवत असे (बेसनाचा ढोकळा तेव्हा केला नव्हता) तेव्हा बरेचदा खमण ढोकळा फुलत नसे. त्यावेळी मी त्या फसलेल्या ढोकळ्याचा अमिरी खमण बनवत असे. आता बेसनाचा खमण ढोकळा कधी फसत नाही तरी अमिरी खमण आवडतो म्हणून बनवते.
खमण ढोकळा फसला तरी चिंता करू नका. त्या फसलेल्या ढोकळ्याचा अमिरी खमण बनवा.
खमण ढोकळा रेसिपी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा :
https://myfamilyrecipes.kunkalienkar.com/2018/09/khaman-dhokla
अमिरी खमण साहित्य (५ जणांसाठी ) (१ कप = २५० मिली )
वाफवलेला खमण ढोकळा दीड कप बेसन घालून बनवलेला (फोडणी देऊ नका)
तेल २ टेबलस्पून
मोहरी पाव टीस्पून
जिरं पाव टीस्पून
हिंग २ चिमूट
कढीपत्ता ८–१० पानं
काजू १०–१२ तुकडे करून
बेदाणे (किसमिस) १०–१२
चिरलेली कोथिंबीर २ टेबलस्पून
डाळिंबाचे दाणे १ कप सजावटीसाठी
बारीक शेव सजावटीसाठी
कृती
१. वर दिलेल्या रेसिपी लिंक प्रमाणे खमण ढोकळा वाफवून घ्या. थंड झाल्यावर हाताने कुस्करून घ्या. बारीक पिठासारखं मिश्रण होईल.
२. एका कढईत तेल गरम करून मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी करा. फोडणीत काजू आणि बेदाणे घालून लालसर होईपर्यंत परता.
३. त्यात कुस्करलेला ढोकळा घाला. मिश्रण ढवळून झाकण ठेवून एक वाफ काढा.
४. मिश्रण फार सुकं वाटलं तर पाव कप पाणी शिंपडून वाफ काढा.
५. कोथिंबीर घालून ढवळा.
६. चविष्ट अमिरी खमण तयार आहे. सर्व्ह करताना प्लेट मध्ये अमिरी खमण घालून वर बारीक शेव, कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे घाला.
टीप
१. यात तुम्ही लसूण आणि खवलेला ओला नारळ ही घालू शकता. लसूण बारीक ठेचून फोडणीत घाला आणि ओला नारळ प्लेट मध्ये सर्व्ह करताना घाला.
Your comments / feedback will help improve the recipes