Instant Khaman Dhokla (इन्स्टंट खमण ढोकळा) – Savory Steamed Cake using Gram Flour (No Fermentation Required)

Khaman Dhokla (खमण ढोकळा)

Instant Khaman Dhokla (इन्स्टंट खमण ढोकळा) – Savory Steamed Cake using Gram Flour (No Fermentation Required)

इन्स्टंट खमण ढोकळा मराठी

This is a recipe of instant Khaman Dhokla (Popular Gujarati Snack) that does not require any fermentation. Khaman Dhokla is little sour, little sweet and has a refreshing flavor of Ginger. There are different recipes of Khaman Dhokla. This is the one that I use. It makes soft, fluffy and tasty Khaman Dhokla. Some people add Sugar Water to Dhokla after Steaming. But I don’t like such Dhokla; hence I don’t add it.

Ingredients (Serves 6-8) (1 cup = 250 ml)

For Batter

Besan / Gram Flour 1.5 cups

Fine Rava / Semolina 1.5 tablespoon

Ginger-Green Chilies Paste 1.5 teaspoon

turmeric powder 2 to 3 pinches or as required to get nice yellow colour batter

Eno or fruit salt 1 teaspoon (Use the one without any flavor)

Salt to taste

Lemon juice 1 teaspoon

Sugar 3 teaspoons (adjust as per taste)

Curd 2 tablespoons or Buttermilk ½ to ¾ cup

Oil 2 teaspoon

For Tempering:

Oil 2 tablespoon

Mustard seeds ¼ teaspoon

Cumin seeds ¼ teaspoon (optional)

Sesame seeds 1 teaspoon (optional)

Asafoetida a pinch

For Garnish:

chopped coriander 2 teaspoon

Fresh scraped / grated coconut 2 teaspoon

Instructions

1. Mix Besan, Rava, Ginger Chilly paste, Salt, Sugar, Turmeric powder, Lemon juice and Oil in a bowl.

2. Add curd / buttermilk and mix well. Ensure there are no lumps. Batter should be thick but flowing. Add water if required.

3. Heat water in Idli / Dhokla Steamer. Grease Dhokla plates with oil.

4. Add Eno fruit salt in the pan, add a teaspoon of water and mix immediately in one direction for 30-40 seconds. Don’t overmix.

5. Quickly pour the batter in greased Dhokla plates and steam covered for 20-25 minutes. It is most important that you start steaming the batter soon after adding eno to it. If there is a delay in steaming, Dhokla won’t be soft and fluffy. If you don’t have big enough plate(s) to steam all the batter together, then take out batter sufficient for your plate(s) in a small bowl, mix Eno and steam dhokla. Repeat this step for remaining batter.

6. Once cooked, take out the plates from Dhokla Steamer and allow to cool. Using a knife cut pieces in desired shapes.

Steamed Khaman Dhokla (वाफवलेला खमण ढोकळा)

7. In a ladle, heat oil. Add Mustard seeds; wait for crackle. Add Cumin Seeds; wait for crackle. Add White sesame seeds and cover the pan to avoid sesame seeds crackling all over the place. Once they stop crackling, remove the lid, switch off the gas and add Asafoetida.

8. Spread Fresh scraped coconut, chopped coriander and tempering on Dhokla and serve Dhokla with Chutney of your choice or tomato sauce.

Khaman Dhokla (खमण ढोकळा)
Khaman Dhokla (खमण ढोकळा)
        ===================================================================================

इन्स्टंट खमण ढोकळाझटपट नाश्ता

आज अगदी सोपी रेसिपी देतेय. लोकप्रिय गुजराती पदार्थाची ही इन्स्टंट रेसिपी आहे. डाळ भिजवायला नको, वाटायला नको आणि आंबवायला नको. बेसन वापरून बनवलेला हा ढोकळा थोडासा आंबट, थोडासा गोड असतो आणि त्याला आल्याची मस्त चव असते .

काही ठिकाणी ढोकळा वाफवला की त्यात साखरेचं पाणी घालतात. मला तसा ओला ढोकळा आवडत नाही; त्यामुळे मी पाणी घालत नाही. तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता

बऱ्याच जणींचा ढोकळा फुलत नाही. माझ्या वडिलांच्या भाषेत परफेक्ट ढोकळ्यासाठी काही पथ्यं पाळावी लागतात (टीप्स). ती लक्षात ठेवा :

. इनो हवा न गेलेला असावा. इनोची बाटली वापरल्यावर लगेच नीट बंद करून फ्रिजमध्ये ठेवावी म्हणजे इनो चांगला राहतो.

. पिठात इनो घातल्यावर फार ढवळू नका. इनोमुळे पीठ फसफसते. पिठातली हवा जाण्याआधी ढोकळा ताटलीत घालून वाफवायला ठेवला नाही तर ढोकळा बसतो (फ्लॅट होतो). म्हणून जास्त वेळ पीठ ढवळू नका. ही पायरी अगदी वेळ न दवडता करायला हवी.

. ढोकळा वाफवायच्या पातेल्यात आधीच पाणी घालून उकळी आणा. ढोकळ्याची ताटली गार पाण्याच्या पातेल्यात ठेवली तरी ढोकळा बसतो. इथेही टायमिंग महत्वाचं आहे.

. ढोकळा करताना दुसरं काहीही काम करू नका. नाहीतर वर लिहिलेल्या पायऱ्या वेळेत होणार नाहीतएकदा ढोकळ्याची ताटली वाफवायला ठेवली की दुसरी कामं करा.   

साहित्य (८ जणांसाठी) (१ कप = २५० मिली )

ढोकळ्याच्या पिठासाठी

बेसन दीड कप

बारीक रवा दीड टेबलस्पून

आलं मिरचीची पेस्ट दीड चमचा

हळद २३ चिमूट (पिठला पिवळा रंग आला पाहिजे )

इनो १ चमचा (रेग्युलर वापरा कोणत्याही स्वादाचं नको )

मीठ चवीनुसार

लिंबाचा रस १ चमचा

साखर ३ चमचे (चवीनुसार कमी / जास्त करा)

दही २ टेबलस्पून / ताक अर्धा – पाऊण कप

तेल २ चमचे

फोडणीसाठी

तेल २ टेबलस्पून

मोहरी पाव चमचा

जिरं पाव चमचा (ऐच्छिक)

तीळ १ चमचा (ऐच्छिक)

हिंग चिमूटभर

सजावटीसाठी

चिरलेली कोथिंबीर २ चमचे

ताजा खवलेला नारळ २ चमचे

कृती

. एका बाउल मध्ये ढोकळ्याच्या पिठाचं इनो वगळून सर्व साहित्य घालून मिक्स करा. गुठळ्या होऊ देऊ नका.

. आवश्यकतेनुसार  पाणी घालून पीठ भिजवा. पीठ दाट भज्यांच्या पिठासारखं हवं.

. इडली / ढोकळा पात्रात पाणी घालून उकळत ठेवा. ढोकळ्याच्या थाळीला तेल लावून घ्या.

. पाणी उकळू लागलं की ढोकळ्याच्या पिठात इनो आणि १ चमचा पाणी घालून लगेच पीठ एकाच दिशेने ३०४० सेकंद ढवळा. जास्त ढवळू नका. पीठ फुलेल.

. लगेच तेल लावलेल्या थाळीत घालून वाफवायला ठेवा. झाकण लावून २०२५ मिनिटं वाफवून घ्या. सुरी घालून ढोकळा शिजलाय का ते चेक करा. नसेल तर आणखी ३४ मिनिटं वाफवा.

. इनो घातल्यावर लगेच पीठ वाफवायला ठेवलं पाहिजे. नाहीतर ढोकळा मऊ, लुसलुशीत होणार नाही. तुमच्या ढोकळा प्लेट मध्ये सगळं पीठ एका वेळी मावत नसेल तर हवं तेवढं पीठ एका बाउल मध्ये काढून त्यात इनो घालून वाफवून घ्या. ते झाल्यावर उरलेल्या पिठात इनो घालून वाफवा.

Steamed Khaman Dhokla (वाफवलेला खमण ढोकळा)

. ढोकळा गार झाल्यावर त्याचे तुकडे करा. तेलात मोहरी, जिरं घालून फोडणी करा. फोडणीत तीळ घाला आणि झाकण ठेवा नाहीतर तीळ सगळीकडे उडतात. तीळ तडतडायचे थांबले की हिंग घाला. ढोकळ्यावर नारळ, कोथिंबीर आणि फोडणी पसरवा. आणि चविष्ट ढोकळा सर्व्ह करा

Khaman Dhokla (खमण ढोकळा)
Khaman Dhokla (खमण ढोकळा)

2 Comments

  1. Hello mam,i used to make dhokla using curd or buttermilk with eno combination..it was a perfect combination..i have tried the same process several times…but now days whenever i try to make dhokla using same recipe it becomes hard from bottom..plz try to help me further solution..

Your comments / feedback will help improve the recipes