Tandulachi Kaneri (तांदुळाची कणेरी) – Rice Porridge – Comfort Food

Tandulachi Kaneri (तांदुळाची कणेरी)

Tandulachi Kaneri (तांदुळाची कणेरी) – Rice Porridge – Comfort Food

तांदुळाची कणेरी कम्फर्ट फूड मराठी

Generally we have Rice with Dal / Kadhi / Gravy. But when you don’t want to have a light meal, Kaneri is a good option. In Southern Konkan, Pej – पेज (Watery porridge of Rice) is very common for breakfast. Whereas in Northern parts of Konkan, Mau Bhat – मऊ भात (Rice Porridge – thicker than Pej) is common for breakfast. Kaneri is a variation of Mau Bhat where Raw rice is roasted using Pure Ghee and Cumin Seeds. While cooking a small piece crushed is Ginger is added to the rice. Rice is cooked with lots of water. My mother used to make this Kaneri when we did not want to have full meal or any one of us was unwell. We used to have it as meal – not as breakfast. It’s super tasty. It is also called Khimat in some regions.

Ingredients (Serves 3)

Raw Rice ½ cup (Do not use long grain rice – Use Kolam / Jiresal / Ambemohor)

Pure Ghee (Clarified butter) 1 teaspoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Ginger about ½ inch piece roughly crushed

Salt to taste

Instructions

1. Wash Raw rice. Drain water.

2. Heat 2.5 cups of water. Let it boil.

3. Heat Ghee in a pan. Add cumin seeds. Wait for splutter. Add rice. Saute for a few minutes on low flame till rice is dry.

3. Add boiling water to rice. Add crushed ginger and salt.

4. Cook rice till it’s soft. Add water if required.

5. Using a wooden / metal hand churner (not electric churner), churn rice for 2 minutes. The texture of rice will be like Porridge.

6. Kaneri is ready to serve. Serve it with a spoonful of Pure Ghee, Metkut (optional) and Pickle. It’s absolutely yummy and satisfying.

Tandulachi Kaneri (तांदुळाची कणेरी)
Tandulachi Kaneri (तांदुळाची कणेरी)
       ==================================================================================

तांदुळाची कणेरी कम्फर्ट फूड

लहानपणी आम्ही कोणी आजारी असताना आई बनवून द्यायची. मऊ भातापेक्षा थोडी वेगळी रेसिपी आहे. साजूक तूप जिऱ्याची फोडणी करून त्यात धुतलेले तांदूळ परतून घ्यायचे. आणि ५ पट पाणी घालून शिजवायचे. शिजताना थोडं आलं ठेचून घालायचे. आणि मीठ घालायचे. चांगली शिजल्यावर त्यात रवी फिरवायची म्हणजे कणेरी छान मिळून येते (ही आई ची स्पेशल टीप आहे) . गरम गरम कणेरी वर साजूक तूप, मेतकूट घालायचे आणि लोणच्याबरोबर खायची. खूप चविष्ट लागतेआम्ही कधी कधी भाताऐवजी कणेरीच करतो.

काही ठिकाणी याला खिमट म्हणतात.

साहित्य (३ जणांसाठी)

तांदूळ अर्धा कप (जिरेसाळ/ कोलम / आंबेमोहोर सारखा बारीक तांदूळ वापरा)

साजूक तूप १ चमचा

जिरं पाव चमचा

आलं अर्धा इंच तुकडा ठेचून

मीठ चवीनुसार

कृती

. तांदूळ धुवून पाणी काढून टाका.

. अडीच कप पाणी गरम करायला ठेवा.

. एका पातेल्यात साजूक तूप घालून त्यात जिऱ्याची फोडणी करा . त्यात धुतलेले तांदूळ घाला आणि मंद आचेवर परतून घ्या. तांदूळ सुके झाले की त्यात उकळतं पाणी घाला.

. आता आलं आणि मीठ घालून मंद आचेवर भात शिजवून घ्या. तांदूळ अगदी मऊ होईपर्यंत शिजवा. जरूर पडल्यास थोडं पाणी घाला. कणेरी मऊ भातासारखी पातळ असते.

. कणेरी शिजल्यावर त्यात २ मिनिटं रवी फिरवा. म्हणजे कणेरी छान मिळून येईल.

. गरमागरम कणेरी साजूक तूप, मेतकूट घालून लोणच्याबरोबर खायला द्या. (मेतकूट न घालता ही कणेरी छान लागते.) अप्रतिम जेवण होईल

Tandulachi Kaneri (तांदुळाची कणेरी)
Tandulachi Kaneri (तांदुळाची कणेरी)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes