Simla Mirchi Batata Bhaaji (सिमला मिरची बटाटा भाजी) – Capsicum Potato Subji

Simla Mirchi Batata Bhaaji (सिमला मिरची बटाटा भाजी)

Simla Mirchi Batata Bhaaji (सिमला मिरची बटाटा भाजी) – Capsicum Potato Subji

सिमला मिरची बटाटा भाजी मराठी

This is a different type of dry subji using Capsicum and Potatoes. Differences start from the way vegetables are cut. Cut both Capsicum and Potatoes into long thin pieces like french fries. The spices that go in here are Garam Masala, Chat Masala and Chili Powder. Also this subji is cooked just enough to make Potatoes and Capsicum soft. Pieces of both should be intact (al dente as my Son calls it). Just with these few ingredients, without onion, garlic the subji turns out to be yummy. This will be a good change from standard Capsicum subji.

Ingredients (Serves 3)

Capsicum 2 medium size

Raw Potatoes 3 medium size

Chili Powder ½ teaspoon

Garam Masala ½ teaspoon

Chat Masala ½ teaspoon

Chopped coriander 1 teaspoon

Sugar ½ teaspoon

Salt to taste

For Tempering / Tadka

Oil 1 teaspoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Turmeric Powder ¼ teaspoon

Asafoetida (Hing) a pinch

Instructions

1. Cut Capsicum into thin long pieces. Peel Potatoes. Cut Potatoes in the shape of French Fries.

2. In a wok, heat oil on medium heat.

3. Add cumin seeds, wait for splutter. Add Asafoetida.

4. Add potato pieces. Add Turmeric Powder. Mix together.

5. Cook covered on low flame for 2-3 minutes. Stir in between.

6. Add Capsicum pieces. Mix. Cook covered on low flame for 2 minutes. This subji should not be overcooked.

6. Add Sugar, Salt, Garam Masala, Chat Masala, Chili powder and gently mix.

7. Cook for 1 minute without cover.

8. Add chopped coriander and mix gently. Tasty Capsicum Potato Subji is ready.

8. Serve hot with Roti (Indian Bread).

Simla Mirchi Batata Bhaaji (सिमला मिरची बटाटा भाजी)
Simla Mirchi Batata Bhaaji (सिमला मिरची बटाटा भाजी)

==================================================================================

सिमला मिरची बटाटा भाजी कांदा लसूण विरहित चविष्ट भाजी

ही एक वेगळ्या प्रकारची सिमला मिरचीची सुकी भाजी आहे. याचा वेगळेपणा भाजी चिरण्यापासूनच दिसून येतो. यात सिमला मिरची आणि बटाटे लांब पातळ तुकडे करून घालतात जसे आपण फ्रेंच फ्राईज बनवताना करतो. आणि यात फक्त गरम मसाला, चाट मसाला आणि लाल तिखट घातलं जातं. आणि ही भाजी फार शिजवत नाहीत. सिमला मिरची, बटाट्याचे तुकडे व्यवस्थित दिसले पाहिजेत (माझ्या मुलाच्या भाषेत al dente)कांदा लसूण न घालताही ही भाजी खूप टेस्टी होते. नेहमीच्या सिमला मिरचीच्या भाजी ऐवजी ही वेगळी भाजी नक्की करून बघा

साहित्य (३ जणांसाठी)

सिमला मिरची २ मध्यम

बटाटे ३ मध्यम

लाल तिखट अर्धा टीस्पून

गरम मसाला अर्धा टीस्पून

चाट मसाला अर्धा टीस्पून

चिरलेली कोथिंबीर १ टीस्पून

साखर अर्धा टीस्पून

मीठ चवीनुसार

फोडणीसाठी

तेल १ टीस्पून

जिरं पाव टीस्पून

हळद पाव टीस्पून

हिंग चिमूटभर

कृती

. सिमला मिरची धुवून दोन भाग करून बिया आणि पांढरा भाग काढून टाका. मिरचीचे  लांब पातळ तुकडे करा फ्रेंच फ्राईज सारखे.

. बटाटे सोलून लांब पातळ तुकडे करा फ्रेंच फ्राईज सारखे.

. एका कढईत तेल गरम करून जिरं आणि हिंग घालून फोडणी करा.

. त्यात बटाट्याचे तुकडे घाला, हळद घाला. मिक्स करून झाकण ठेवून २३ मिनिटं शिजवा. पाणी घालू नकामध्ये एकदा भाजी ढवळून घ्या.

. आता कढईत सिमला मिरचीचे तुकडे घाला. मिक्स करून झाकण ठेवून २ मिनिटं शिजवा. सिमला मिरची आणि बटाटे जरा नरम झाले की पुरे. ही भाजी जास्त शिजवत नाहीत.

. कढईत गरम मसाला, चाट मसाला, लाल तिखट, मीठ, साखर घालून मिक्स करा. १ मिनिट झाकण न ठेवता शिजवा.

. चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा. सिमला मिरची बटाट्याची चविष्ट भाजी तयार आहे

. गरमागरम भाजी पोळी / भाकरीसोबत खायला द्या

Simla Mirchi Batata Bhaaji (सिमला मिरची बटाटा भाजी)
Simla Mirchi Batata Bhaaji (सिमला मिरची बटाटा भाजी)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes