Baked Vada Pav / Stuffed Pav (बेक्ड वडा पाव / स्टफ्ड पाव)

Baked Vada Pav / Stuffed Pav (बेक्ड वडा पाव / स्टफ्ड पाव)

Baked Vada Pav / Stuffed Pav (बेक्ड वडा पाव / स्टफ्ड पाव)

बेक्ड वडा पाव स्टफ्ड पाव मराठी

The taste of home cooked Pav is unbeatable. Basically there are only 5 ingredients required for Pav – All Purpose Flour, Salt, Oil, Yeast and Warm Water. Proportion differs from recipe to recipe. But the most important ingredient is Yeast. My experience with yeast is that the first time you use it after opening the new pack, results are awesome. Second time results are okay. Third time onwards, it’s your luck if the yeast works the way you want it to work. This is after storing the yeast pack in air tight container in refrigerator. So be watchful for yeast. Once the dough did not rise as expected, so instead of baking Pav, I made Paranthas using that dough. Paranthas were nice and soft. Anyway, try this recipe when you are sure about the quality of yeast.

This is a healthy version of Vada Pav where I stuff filling of Potato Vada in the dough and then bake it. You can use any other stuffing of your choice. So you have an option to bake plain Pav or stuffed Pav.

If you don’t have oven, you can bake Pav using a Wok / Pan.

Ingredients (Makes 12-13 Pav) (1 cup = 250ml)

All Purpose Flour (Maida) 2 cups

Sugar ½ tablespoon

Dry Yeast ½ teaspoon

Salt ½ teaspoon

Oil 1.5 tablespoon

Milk + butter for brushing

For Filling

Potatoes 6-7 medium size

Ginger Garlic Chili Paste 1 tablespoon

Curry leaves 8-10

Turmeric Powder ¼ to ½ teaspoon

Mango Powder ¼ teaspoon

Oil 1 teaspoon

Salt to taste

Instructions

1. Warm 2 tablespoon of water. Add sugar and yeast. Mix and keep covered for 10 min.

2. Yeast should become frothy. If it does not, then it is not right quality yeast. Buy a new pack of yeast and repeat step 1.

3. Mix All Purpose Flour, salt on the kitchen platform.

4. Make a well and add yeast mixture. Keep adding warm water and knead a soft dough.

5. Add Oil and knead for 15 minutes using your palm. This is an important step in this recipe.

6. Transfer the dough to a container. Apply little butter on top and Keep the dough covered for 1 hour.

7. While we wait for the dough to rise, make the filling using the instructions given under “To Make Filling”.

8. The dough should rise 2 to 3 times. If it does not keep it covered for 30 minutes. Still if it does not rise, you should not proceed with baking Pav. Make Paranthas using this dough.

9. Using 1 tablespoon All Purpose Flour, punch the dough. Knead for 2-3 minutes.

10. Make dough balls of desired size / shape, Make a small bowl of the dough, place a small filling ball in the dough bowl, cover the filling with dough and seal it properly. Arrange these filled dough balls in a greased baking tray. Keep some distance between dough balls.

11. Cover with damp cloth for 45 minutes. Dough balls will rise again.

12. Brush with Milk.

13. Bake in a preheated oven on 200 degrees for 20-25 minutes. Buns should be light brown on top.

14. Brush with butter. Allow to cool. Enjoy these soft and fluffy healthy Baked Vada Pav / Stuffed Pav.

To Make Filling

1. Boil Potatoes.

2. Peel Potatoes and mash them (or cut into small pieces).

3. In a Pan, heat oil. Add Ginger,Garlic, Chili Paste. Sauté for 2-3 minutes. Add curry leaves (cut them into small pieces before adding them; so that they can be eaten easily).

4. Add Turmeric powder, Mix.

5. Add Mashed / chopped potatoes, Salt and Mango Powder. Mix well. Cook for 2-3 minutes. Spread it on a plate and leave to cool.

6. Stuffing is ready.

Baked Vada Pav / Stuffed Pav (बेक्ड वडा पाव / स्टफ्ड पाव)
Baked Vada Pav / Stuffed Pav (बेक्ड वडा पाव / स्टफ्ड पाव)
       ===================================================================================

बेक्ड वडा पाव / स्टफ्ड पाव (आणि यीस्ट बद्दल बरंच काही)

घरी बनवलेल्या पावाची मजा काही औरच असते. पाव भाजताना जो सुगंध घरभर दरवळतो त्याला तर तोडच नाही. पाव बनवायला ५ च जिन्नस लागतात. मैदा, मीठ, तेल, यीस्ट आणि पाणी. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा (आणि दगा देणारा) जिन्नस म्हणजे यीस्ट. माझ्या अनुभवानुसार यीस्ट चं नवीन पाकीट उघडून ते यीस्ट वापरलं तर पाव छान बनण्याचे चान्सेस जास्त असतात. तुम्ही दुसऱ्या वेळेला त्या पाकिटातलं यीस्ट वापरलं तर पाव छान होण्याचे चान्सेस फक्त ५० टक्के. आणि तिसऱ्या वेळेला त्या पाकिटातलं यीस्ट वापरलं आणि पाव छान झाला तर तुम्ही नक्कीच खूप नशीबवान असता (त्यादिवशी अचानक धनलाभ वगैरे योग असू शकतात तुमच्या भविष्यात !!!). मी तर एकदा नवीन पाकीट उघडून वापरलेलं यीस्ट सुद्धा फेकून दिलेलं आहे . मग कुठल्या ब्रँड चं यीस्ट वापरावं? माझी एक मैत्रीण Sooper ब्रँड च यीस्ट वापरते. हे १०० टक्के चांगले असतं असं ती सांगते. पण ते सगळीकडे मिळत नाही. मग तुमच्या आजूबाजूला जो ब्रँड चांगला मिळत असेल तो वापरा. एखादा बेकरी वाला ओळखीचा असेल तर त्याच्याकडून घेऊन या. मी माझ्या मित्राकडूनच यीस्ट आणते.

पावाच्या कृतीमध्ये महत्त्वाच्या २ स्टेप्स मध्ये तुम्हाला कळेल की पाव छान होणार की फसणार ते.

. पहिली स्टेप ज्यात तुम्ही यीस्ट साखर घालून कोमट पाण्यात भिजवता ती (activation). यीस्ट जर छान फुलून आलं तर पुढची कृती करा. नाहीतर ते मिश्रण सरळ टाकून द्या आणि नवीन यीस्ट आणून पुन्हा प्रयत्न करा.

. जेव्हा तुम्ही पावाचं पीठ मळून फुगण्यासाठी ठेवता. पीठ जर एक / दीड तासात २३ पट फुगलं नाही तर पाव बनवण्याच्या फंदात पडू नका. पाव चांगले होणार नाहीत. त्या पिठाचे पराठे बनवा (ह्याला खमिरी पराठे म्हणतात). छान होतात.

ह्या २ स्टेप्स व्यवस्थित पार पडल्या की पाव छान होणार

वडा पाव सर्वांनाच आवडतो. पण वडे तेलकट असल्यामुळे जरा जपून खायचा प्रयत्न असतो. ह्या बेक्ड वडा पाव मध्ये मी पावाच्या पिठाच्या गोळ्यात बटाटा वड्याची भाजी घालते आणि नंतर पाव भाजते. वडापावची चव पण तेलकट नसलेला टेस्टी पदार्थ नक्की करून बघा. ओव्हन नसेल तर तुम्ही कढई / पातेल्यात मीठ / वाळू घालून त्यावर ताटलीत पिठाचे गोळे ठेवून झाकण ठेवून पाव भाजू शकता

साहित्य (१२१३ पावांसाठी) (१ कप = २५० मिली )

मैदा २ कप

साखर अर्धा टेबलस्पून

ड्राय यीस्ट अर्धा चमचा

मीठ अर्धा चमचा

तेल दीड टेबलस्पून

दूध + बटर पाव भाजताना वरून लावायला

सारणासाठी

बटाटे ६-७ मध्यम आकाराचे

लसूण आलं मिरची पेस्ट १ टेबलस्पून

कढीपत्ता ८-१० पानं

हळद पाव-अर्धा चमचा

आमचूर पाव चमचा

तेल १ चमचा

मीठ चवीनुसार

कृती

. एका कपात टेबलस्पून कोमट पाणी घ्या . त्यात साखर आणि यीस्ट घालून ढवळा आणि १० मिनिटं झाकून ठेवा

. यीस्ट छान फुलून आलं पाहिजे (activate). यीस्ट फुललं नाही तर मिश्रण फेकून द्या. नवीन यीस्ट आणा आणि स्टेप पासून परत कृती करा

. किचन चा ओटा स्वच्छ पुसून घ्यामैदा आणि मीठ ओट्यावर मिक्स करा

. पिठ गोलाकार पसरून मध्ये खड्डा करा. त्यात यीस्ट मिश्रण घालून मिक्स करा. आता थोडं थोडं कोमट पाणी घालून सैलसर पीठ भिजवा

. तेल घाला आणि पीठ १५ मिनिटं तळहाताने नीट मळून घ्या. पीठ छान मळणे हे खूप महत्त्वाचं आहे

. पीठ एका मोठ्या  बाउल मध्ये ठेवा. वरून थोडं तेल लावा आणि तासभर बाउल झाकून ठेवा. बाउल मोठी घ्या कारण पीठ पट फुलतं

. पीठ फुलतंय तोपर्यंत सारण करून घ्या. खाली दिलेली सारणाची कृती वाचा

. पीठ पट फुगलं पाहिजे. नाही फुगलं तर आणखी अर्धा तास बाउल झाकून ठेवा. तरीपण पीठ फुललं नाही तर पाव बनवायच्या फंदात पडू नका. पाव चांगले होणार नाहीत. त्या पिठाचे पराठे बनवा. पराठे छान होतात

. टेबलस्पून मैदा पिठात घालून पिठाला हाताने बुक्के मारा. पिठातली हवा काढायची आहे. मिनिटं पीठ मळून घ्या.

१०. पिठाचे मध्यम आकाराचे गोळे बनवा. पिठाच्या गोळ्याची पारी बनवून त्यात सारणाचा गोळा भरा. पीठ सर्व बाजूनी सारणावर येईल अशा तऱ्हेने गोळा बनवा आणि कडा बंद करा. एका तेल लावलेल्या बेकिंग ट्रे मध्ये हे गोळे थोडं अंतर सोडून ठेवा

११. सर्व गोळे भरून तयार झाले की ओल्या कपड्याने ट्रे ४५ मिनिटं झाकून ठेवा. पिठाचे गोळे पुन्हा फुलतील.

१२. गोळ्यांना वरून दुधाचा ब्रश फिरवा.

१३. प्री हीटेड ओव्हन मध्ये २०० डिग्री वर २०२५ मिनिटं बेक करा. पाव वरून गुलाबी झाले पाहिजेत

१४.पावावर बटर चा ब्रश फिरवा. खाण्याएवढे थंड झाले की चविष्ट आणि हेल्दी वडा पाव चा आस्वाद घ्या

सारणाची कृती

. बटाटे उकडून सोलून घ्या. बारीक तुकडे करा किंवा कुस्करून घ्या.

. एका कढईत तेल गरम करून त्यात लसूण आलं मिरची ची पेस्ट घाला. २-३ मिनिटं परता. कढीपत्त्याची पानं बारीक तुकडे करून घाला. हळद घाला.

. आता बटाटा घाला. आमचूर  आणि मीठ घालून नीट ढवळून घ्या.

. २- ३ मिनिटं परता. मिश्रण ताटलीत घालून गार करून घ्या.

. सारण तयार आहे

Baked Vada Pav / Stuffed Pav (बेक्ड वडा पाव / स्टफ्ड पाव)
Baked Vada Pav / Stuffed Pav (बेक्ड वडा पाव / स्टफ्ड पाव)

2 Comments

  1. हीलाच सिलेक्ट केल नाव बेक्ड वडा पाव मग काय बाकी च्या राहुदे म्हटलं रेसिपी त्या नंतर बघू

Your comments / feedback will help improve the recipes