Cheesy Beans (चिजी बीन्स)

Cheesy Beans (चिजी बीन्स)

Cheesy Beans (चिजी बीन्स)

चिजी बीन्स मराठी

When I told my friend that I don’t like french beans, she shared this recipe with me. She was very sure that I’ll like french beans prepared this way. Recipe was easy and quick. So tried it today. Any it turned out so yummy, I actually liked French Beans! Thanks to my friend for sharing such a wonderful recipe.

If kids don’t like French Beans, make these Cheesy Beans for them. They will ask you to make it again and again.

Ingredients (Serves 3) (1 cup = 250ml)

French beans chopped as small size pieces 1 cup

Medium size onion 1

Garlic cloves 2-3

Butter 1 teaspoon

Salt to taste

Black Pepper Powder ¼ teaspoon

Processed Cheese 2-3 cubes (or as per your choice) ; you can use some mozzarella cheese also

Instructions

1. Finely chop onion and garlic cloves.

2. In a pan, heat oil. Add chopped onions. Sauté till light brown.

3. Add chopped garlic. Sauté for 1 minute

4. Add french beans. Sauté for 1 minutes.

5. Cook covered for 2-3 minutes till beans are little soft. Sprinkle some water if necessary. Do not cook till they become mushy. Beans should be crunchy.

6. Add salt and black pepper powder. Mix.

7. If you want to use oven, transfer the mixture to a greased baking tray. Spread grated cheese evenly. Bake in preheated oven for 10 minutes on 200 degrees Celsius.

8. If you don’t want to use oven, spread grated cheese over the mixture in the pan. Cooked covered on low flame for 5 minutes.

9. Serve hot as a side dish or salad or as subji with Roti/ Bread. Tastes yummy.

Cheesy Beans (चिजी बीन्स)
Cheesy Beans (चिजी बीन्स)
          ===================================================================================

चिजी बीन्स

एकदा गप्पा मारता मारता माझ्या मैत्रिणीला मी सांगितलं की मला फरसबी आवडत नाही; फक्त सूप मध्ये चालते, तेव्हा तिने मला ही रेसिपी सांगितली. म्हणाली, अशी करून बघ, तुला नक्की आवडेल. मग केली एकदा. आणि खरंच ! एवढी छान लागली की मी फरसबी चक्क आवडीने खाल्ली. तुमच्या घरी फरसबी न खाणारी मंडळी असतील तर हे चिजी बीन्स करून बघा. पुन्हा पुन्हा करायला सांगतील. हा पदार्थ तुम्ही स्टार्टर, सॅलड, साईड डिश म्हणून खाऊ शकता किंवा भाजी म्हणून ही खाऊ शकता. मुलांना डब्यात देऊन बघा. नक्की आवडेल.

साहित्य (३ जणांसाठी) (१ कप = २५० मिली )

फरसबी पाव किलो

कांदा १ मध्यम

लसूण २३ पाकळ्या

बटर १ चमचा

मिरपूड पाव चमचा

मीठ चवीनुसार

चीज  २३ क्युब्स (किंवा हवे तेव्हढे ) – तुम्ही थोडं मोझोरेला चीज ही घालू शकता

कृती

. फरसबी बारीक चिरून घ्या; कांदा बारीक चिरून घ्या. लसणीचे बारीक तुकडे करा.

. एका कढईत बटर घालून त्यात कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या.

. लसणीचे तुकडे घालून १ मिनिट परता.

. फरसबीचे तुकडे घालून २ मिनिटं परतून घ्या.

. झाकण ठेवून फरसबी थोडी नरम होईपर्यंत शिजवून घ्या. जरूर पडल्यास थोडं पाणी शिंपडा. जास्त शिजवू नका. फरसबी जरा कुरकुरीत राहिली पाहिजे

. मीठ आणि मिरपूड घाला आणि मिक्स करा.

. बटर लावलेल्या ओव्हन च्या भांड्यात मिश्रण काढून घ्या. त्यावर चीज किसून पसरवा. २०० डिग्रीवर प्रीहिट केलेल्या ओव्हन मध्ये १० मिनिटं मिश्रण भाजून घ्या.

. ओव्हन नसेल तर चीज किसून कढईतच मिश्रणावर घाला आणि झाकण ठेवून मंद आचेवर चीज वितळेपर्यंत गरम करा.

. यम्मी चिजी बीन्स तयार आहेत. सॅलड, साईड डिश, भाजी जसं हवं तसं खायला द्या

Cheesy Beans (चिजी बीन्स)
Cheesy Beans (चिजी बीन्स)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes