Mango Saasav / Sasav (आंब्याचं सासव) – Goan Mango Raita

Mango Saasav (आंब्याचं सासव)

Mango Saasav / Sasav (आंब्याचं सासव / आंब्याचं रायतं) – Goan Mango Raita

आंब्याचं सासव / आंब्याचं रायतं मराठी

Saasav /Sasav is a Goan dish made using ripe Mangoes. It is called Mango Raita in Konkan. It’s a side dish that goes well with Roti / Chapati. It’s yummy with a little sweet and little hot taste. There are 2 types of Saasav. One does not need any cooking. And the second where ingredients are cooked together. Obviously the one without cooking lasts only for a couple of day when stored in refrigerator. The cooked one lasts for about a week in refrigerator. This recipe is the one without cooking. It requires only few ingredients that are generally available in Indian kitchen. The mangoes used for Saasav should be with fibre (threads) – so don’t use Alphonso, Dasheri etc.

Instructions for making cooked Saasav are provided in the Note at the end of the recipe.

Ingredients (Serves 2) (1 cup = 250ml)

Ripe Mangoes 4 (Use mangoes with Fibre – threads)

Fresh scraped coconut ½ cup

Green Chilies 2

Mustard Seeds ¾ teaspoon

Crushed Jaggery 2 tablespoon

Salt to taste

Instructions

1. Dry Roast Mustard Seeds till they start to splutter.

2. Grind together Coconut, Green Chilies, Mustard seeds into a coarse paste. Add little water if required.

3. Peel Mangoes and squeeze them a bit in a bowl. Keep the mango seeds also in the bowl along with the juice.

4. Add coconut paste to the bowl. Add Jaggery and salt. Mix together till Jaggery dissolves.

5. Tasty Saasav is ready. Serve with Roti / Chapati.

6. Saasav will last for 2 days when stored in refrigerator.

Note

1. For making Cooked Saasav, add ½ teaspoon mustard seeds while grinding coconut. Heat 1 teaspoon oil. Add ¼ teaspoon mustard seeds, wait for splutter; add a pinch of Asafoetida Now add Mango juice along with seeds and cook for 4-5 minutes. Add Coconut paste and other ingredients and cook for 2-3 minutes. This Saasav lasts for about a week in refrigerator.

Mango Saasav (आंब्याचं सासव)
Mango Saasav (आंब्याचं सासव)

 

 

 

 

 

==================================================================================

आंब्याचं सासव / तळकोकणातलं आंब्याचं रायतं 

तळकोकणातल्या आंब्याच्या रायत्याला गोव्यात सासव म्हणतात. हा एक पारंपारिक पदार्थ आहे. ह्यात पिकलेले आंबे वापरतात. अगदी कमी जिन्नस वापरून बनणारे सासव / रायतं हे एक प्रकारचं तोंडीलावणं आहे ज्याची चव थोडी गोड, थोडी तिखट अशी असते. ह्यात भाजलेली मोहरी वाटून घालतात. मोहरीचा जरासा झणझणीतपणा येतो सासवला. सासव दोन प्रकारे बनवतात. एक कच्चे सासव ज्यात जिन्नस शिजवत नाहीत आणि दुसरं जिन्नस शिजवून करतात. कच्चे सासव दोनच दिवस फ्रिजमध्ये ठेवून चांगलं राहतं तर शिजवलेलं सासव एक आठवडाभर फ्रिजमध्ये चांगलं राहतं. ही रेसिपी कच्च्या सासव ची आहे. सासव साठी रायवळ आंबे वापरतात ज्यांना रेषा असतात. हापूस / दशेरी सारखे बिन रेषांचे आंबे वापरत नाहीत.

शिजवलेल्या सासव ची कृती रेसिपीत शेवटी दिलेली आहे.

साहित्य (२ जणांसाठी ) (१ कप = २५० मिली )

पिकलेले आंबे ४ (रायवळ आंबे घ्या)

ताजा खवलेला नारळ अर्धा कप

हिरव्या मिरच्या २

मोहरी पाऊण चमचा

चिरलेला गूळ २ टेबलस्पून

मीठ चवीनुसार

कृती

. मोहरी कोरडीच तडतडेपर्यंत भाजून घ्या.

. मिक्सर मध्ये नारळ, मिरच्या आणि मोहरी खसखशीत (जाडसर) वाटून घ्या. जरूर असेल तर थोडं पाणी घाला.

. आंबे सोलून थोडेसे पिळून रस काढा. एका बाउल मध्ये रस आणि आंब्याच्या कोयी एकत्रच ठेवा.

. बाउल मध्ये नारळाचं वाटण, गूळ आणि मीठ घालून गूळ विरघळेपर्यंत ढवळून घ्या.

. आंब्याचे चविष्ट सासव तयार आहे. पोळीबरोबर आस्वाद घ्या.

. हे सासव फ्रिजमध्ये दोन दिवस चांगलं राहील.

टीप

. शिजवलेलं सासव बनवण्यासाठी नारळ वाटताना अर्धा चमचा मोहरी घाला. १ चमचा तेल गरम करून पाव चमचा मोहरी आणि चिमूटभर हिंग घालून फोडणी करा. त्यात आंब्याचा रस कोयींसकट घाला. ५ मिनिटं शिजवा. नंतर नारळाचं वाटण आणि बाकी साहित्य घालून २३ मिनिटं शिजवा. हे सासव फ्रिजमध्ये एक आठवडा चांगलं राहील.

Mango Saasav (आंब्याचं सासव)
Mango Saasav (आंब्याचं सासव)

2 Comments

    • Thank You Jayshree. सांग मला कसं वाटतं ते. काही लोकांना आमरसापेक्षा हे सासव जास्त आवडतं.

Your comments / feedback will help improve the recipes