Lasuni Alu Palak (लसूणी आलू पालक)– Garlic Spinach Potatoes
Alu Palak subji is very popular. Lasuni Alu Palak is a variation of regular Alu Palak. Lasun means Garlic. Recipe is easier than that of Alu Palak as this one does not use Onion, Ginger and Garam Masala. There is no grinding of spices. The only spices that are used in this subji are Garlic pieces, Green Chili and Cumin Seeds. So it gets done faster. It tastes awesome. In most places, the texture of Alu Palak is like a paste. I use a combination of Spinach Paste and Mashed Spinach. Hence the texture of this subji is different. Try this out. You will like the different taste.
Ingredients (Serves 3)
Finely chopped Spinach 2.5 cups
Garlic 18-20 cloves
Boiled Potatoes 2 medium
Cashew nuts 12-13
Pure Ghee (Clarified Butter) 1 tablespoon
Cumin Seeds ¼ teaspoon
Asafoetida a pinch
Green Chilies Crushed ½ teaspoon
Tamarind pulp ½ teaspoon
Cumin Powder ½ teaspoon
Sugar ½ – 1 teaspoon
Salt to taste
Instructions
1. Clean, wash and finely chop Spinach. Use tender stems, if any.
2. Transfer spinach into a microwave safe bowl and cook on High power for 4 minutes. Do not add water. Do not cover the bowl.
3. Leave Spinach to cool.
4. Peel and chop Garlic cloves into medium size pieces.
5. Soak Cashew nuts in warm water for 10 minutes.
6. Transfer half of Spinach to a grinder bowl and grind it into a smooth paste. Mash remaining spinach using a spoon.
7. In a pan, heat Ghee. Add cumin seeds and wait for splutter. Add Asafoetida.
8. Add Garlic pieces and fry on low heat till light brown.
9. Add Spinach Paste as well as Mashed Spinach.
10. Add Crushed chilies, Tamarind pulp, Cumin powder, Salt and Sugar. Mix.
11. Peel Boiled potatoes and chop into medium size pieces. Add to Spinach. Mix.
12. Make a smooth paste of cashew nuts and add to Spinach.
13. Mix and cook for 3-4 minutes.
14. Delicious, creamy Lasuni Alu Palak is ready. Enjoy with Roti (Indian Bread).
Note
1. If you don’t have Microwave, cook chopped spinach in a pan without adding water and without covering the pan. Spinach will release water and that will be sufficient to cook it.
===================================================================================
लसूणी आलू पालक
आलू पालक खूप लोकप्रिय भाजी आहे. बरेच वेळा घरी बनवली जाते. लसूणी आलू पालक ही आलू पालक पेक्षा थोडी वेगळी भाजी आहे – त्यापेक्षा सोपी आहे. यात कांदा आलं, गरम मसाला घालत नाहीत. फक्त हिरवी मिरची, लसूण आणि जिरं घालून केलेली ही भाजी चवीला अप्रतिम लागते. मी पालक आधी मायक्रोवेव्ह मध्ये शिजवून घेते. अर्धा पालक मिक्सरमध्ये बारीक करून घेते आणि अर्धा चमच्याने कुस्करून (मॅश ) करून घेते. त्यामुळे भाजीचं टेक्सचर छान येतं. नक्की करून बघा.
साहित्य (३ जणांसाठी)
बारीक चिरलेला पालक २.५ कप
लसूण १८–२० पाकळ्या
उकडलेले बटाटे २ मध्यम
काजू १२–१३
साजूक तूप १ टेबलस्पून
जिरं पाव चमचा
हिंग चिमूटभर
ठेचलेली हिरवी मिरची अर्धा चमचा
चिंचेचा कोळ अर्धा चमचा
जिरेपूड अर्धा चमचा
साखर अर्धा – १ चमचा
मीठ चवीनुसार
कृती
१. पालक निवडून, धुवून बारीक चिरून घ्या. पालकचे कोवळे देठ असतील तर तेही चिरून घ्या.
२. एका मायक्रोवेव्ह च्या भांड्यात पालक घालून मायक्रोवेव्ह मध्ये हाय पॉवर वर ४ मिनिटं शिजवून घ्या. पाणी घालू नका. झाकण ठेवू नका.
३. पालक गार होऊ द्या.
४. लसूण सोलून मध्यम आकाराचे तुकडे करा.
५. काजू १० मिनिटं कोमट पाण्यात भिजवून ठेवा.
६. अर्धा पालक मिक्सर मध्ये बारीक करून घ्या. अर्धा चमच्याने चुरडून घ्या. असं केल्याने भाजीचं टेक्सचर छान येतं.
७. एका कढईत तूप गरम करून जिरं, हिंगाची फोडणी करा.
८. फोडणीत लसूण घालून मंद आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत परता.
९. मिक्सर मध्ये बारीक केलेला पालक आणि चमच्याने चुरडलेला पालक दोन्ही कढईत घाला.
१०. हिरवी मिरची, चिंचेचा कोळ, जिरेपूड, मीठ, साखर घालून मिक्स करा.
११. बटाटे सोलून मध्यम आकाराचे तुकडे करा. कढईत घाला.
१२. काजू थोडं पाणी घालून मिक्सर मध्ये बारीक करून घ्या. कढईत घाला.
१३. ३–४ मिनिटं शिजवा.
१४. स्वादिष्ट, क्रिमी लसूणी आलू पालक तयार आहे. पोळी / भाकरी बरोबर अप्रतिम लागते.
टीप
१. मायक्रोवेव्ह नसेल तर चिरलेला पालक एका कढईत पाणी न घालता आणि झाकण न ठेवता शिजवून घ्या. पालकाला पाणी सुटतं आणि त्या पाण्यात पालक छान शिजतो.
Yummy. Goes well with Roti & parathas too. THKs for explaining the preparation so beautifully. Have a wonderful day
Thank you for your encouraging words, Vanita.