Pangi – Panki (पानगी / पानकी) – Roasted Indian Crepe

Pangi / Panki
Savory and Sweet Pangi / Panki (तिखटमिठाची आणि गोडाची पानगी / पानकी)

Pangi – Panki (पानगी / पानकी) – Roasted Indian Crepe

पानगी / पानकी मराठी

Pangi is a healthy and tasty snack from Maharashtra. In Gujarat, it’s called Panki. I’d tasted it in a couple of Gujarati Restaurants. The main ingredient is Rice Flour. It’s mixed with some basic spices like Green Chili, Ginger and Cumin Seeds. Little Ghee is added in Pangi batter that enhances the taste of Pangi. It also makes Pangi soft. Pangi is roasted on Banana Leaf. That gives it a different taste. It’s like Ghavan roasted in Banana Leaf. There is sweet version of Pangi also. I added Coconut milk and Jaggery for making sweet Pangi.

Pangi is different than Patole. Pangi is roasted wrapped in Banana Leaves while Patole is steamed wrapped in Turmeric Leaves. Sweet Pangi has no filling but Patole has a filling of Coconut and Jaggery. Pangi is a snack (even sweet Pangi is a snack) whereas Patole is a sweet dish.

Although it’s an easy recipe, since it’s very light snack, you need to make more quantity as compared to other snacks. And that can be time consuming. So try to use 2-3 Griddles at a time and make these Pangi simultaneously. Else you will land up spending long hours in the kitchen.

I’ve given measures for Savory and Sweet Pangi together. If you want to make only one type or make more of one type, change the measures of ingredients accordingly.

Ingredients (Serves 3) (1 cup = 250ml)

Rice Flour 1.5 cups (use ¾ cup for savory Pangi and ¾ cup for Sweet Pangi)

Crushed Green Chili ½ teaspoon

Crushed Ginger ½ teaspoon

Crushed Cumin Seeds ½ teaspoon

Curd / Yogurt 2 teaspoon

Salt to taste

Ghee (Clarified butter) 1 teaspoon

Coconut Milk ¾ cup

Crushed Jaggery / Sugar 2-3 tablespoon (adjust as per taste)

Ghee (Clarified butter) to roast Pangi

Banana Leaves 3 full leaves

Instructions

1. Wash and wipe Banana Leaves. Remove the stem. And make rectangular pieces. You can either make big pieces to fit your griddle (one Pangi at a time) or make small pieces to fit 2 Pangi on the griddle at a time. 2 pieces are required per Pangi.

2. For Savory Pangi, mix Rice flour, crushed chili, crushed ginger, crushed cumin seeds, curd, salt and ½ teaspoon butter. Mix together. Add 1 tablespoon of water at a time and mix. It should be flowing Consistency of batter but not watery. Keep the batter to rest for 15-20 minutes.

3. For Sweet Pangi, mix Rice flour, coconut milk, crushed Jaggery (or sugar), little salt and ½ teaspoon butter. Mix together. Add 1 tablespoon of water at a time and mix. It should be flowing Consistency of batter but not watery. Keep the batter to rest for 15-20 minutes.

4. Heat a Griddle. Grease 2 pieces of banana leaves with Ghee. Place one piece on the griddle with greased side facing up. Gently drop 1-1.5 tablespoon of batter on the leaf; quickly spread it evenly on the leaf. Cover it second greased leaf with greased side facing down. Gently press the leaf a bit so that it sticks to the batter.

Pangi / Panki being roasted on a griddle (पानगी / पानकी तव्यावर भाजताना)

5. Cover and cook on medium flame for 4-5 minutes. Banana leaf will shrink. Flip Pangi along with Banana Leaf and cook the other side. Cooked Pangi will have light brown dots. Serve Savory Pangi hot with Chutney and Ghee. You can serve Sweet Pangi with Ghee / Butter.

Savory Pangi / Panki (तिखटमिठाची पानगी / पानकी)
Sweet Pangi / Panki (गोडाची पानगी / पानकी)
           ===================================================================================

पानगी / पानकी अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट नाश्त्याचा प्रकार

पानगी हा महाराष्ट्रातला अगदी पौष्टिक आणि चविष्ट प्रकार आहे. गुजरातमध्ये याला पानकी म्हणतात. मी २ वेळा गुजराती उपहारगृहातच पानकी  खाल्ली होती. यात मुख्य जिन्नस म्हणजे तांदुळाचं पीठ. पिठात हिरवी मिरची, आलं आणि जिरं घालून पानगी केळ्याच्या पानावर भाजतात. त्यामुळे पानगीला छान वेगळी चव येते. पानगीचं पीठ भिजवताना थोडं साजूक तूप घातलं की पानगीला छान स्वाद येतो आणि पानगी लुसलुशीत होतेआपण याला केळीच्या पानातले घावन म्हणू शकतो. गोड पानगी सुद्धा बनवतात. मी गोड पानगीत नारळाचं दूध आणि गूळ घातला

पानगी ही पातोळ्यांपेक्षा वेगळी आहे. पानगी केळीच्या पानात भाजलेली असते तर पातोळे हळदीच्या पानात वाफवलेले असतात. गोडाच्या पानगीत काही सारण नसतं तर पातोळ्यांमध्ये नारळ, गुळाचं सारण असतं. पानगी ही नाश्त्यासाठी खाल्ली जाते तर पाटोळे पक्वान्न म्हणून खाल्ले जातं. अर्थात दोन्ही प्रकार खूप छान लागतात.

पानगीची कृती अगदी सोपी आहे. पण हा पदार्थ अगदी हलका आहे त्यामुळे पोटभरीसाठी खूप पानग्या बनवाव्या लागतात. आणि त्याला खूप वेळ लागतो. म्हणून एका वेळी २३ तवे घालून पानग्या बनवा. म्हणजे भराभर पानग्या होतील आणि तुम्हाला तासंतास स्वयंपाकघरात राहावं लागणार नाही.     

मी ह्या रेसिपीत तिखटमिठाच्या आणि गोडाच्या पानगीचं प्रमाण दिलेलं आहे. तुम्हाला एकच प्रकार करायचा असेल किंवा एक प्रकार जास्त आणि दुसरा कमी करायचा असेल तर साहित्य त्याप्रमाणात घ्या.

साहित्य (३ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)

तांदुळाचं पीठ दीड कप (पाऊण कप तिखटमिठाच्या पानगीसाठी आणि पाऊण कप गोडाच्या पानगीसाठी)

ठेचलेली हिरवी मिरची अर्धा चमचा

ठेचलेलं आलं  अर्धा चमचा

ठेचलेलं जिरं  अर्धा चमचा

दही २ चमचे

साजूक तूप १ चमचा

नारळाचं दूध पाऊण कप

चिरलेला गूळ / साखर २३ टेबलस्पून

मीठ चवीनुसार

साजूक तूप पानगी भाजायला

केळीची पानं ३ मोठी अख्खी पानं

कृती

. केळीची पानं स्वच्छ धुवून पुसून घ्या. मधला देढ काढून टाका. आणि पानांचे तुकडे करा. मोठ्या पानग्या करायच्या असतील तर तव्यावर बसेल एवढी मोठे तुकडे करा. नाहीतर तव्यावर एका वेळी २ तुकडे बसतील अशा आकाराचे तुकडे करा. एका पानगीसाठी केळीच्या पानांचे २ तुकडे लागतात.

. तिखटमिठाच्या पानगीसाठी एका बाऊलमध्ये पाऊण कप तांदुळाचं पीठ, ठेचलेली मिरची, ठेचलेलं आलं, ठेचलेलं जिरं, मीठ, दही आणि अर्धा चमचा तूप घालून मिश्रण एकत्र करा. थोडं थोडं पाणी घालून भज्यांच्या पिठासारखं सरसरीत पीठ भिजवा. फार पातळ नको. पीठ १५२० मिनिटं झाकून ठेवा.

. गोडाच्या पानगीसाठी एका बाऊलमध्ये पाऊण कप तांदुळाचं पीठ, नारळाचं दूध, गूळ  मीठ आणि अर्धा चमचा तूप घालून मिश्रण एकत्र करा. थोडं थोडं पाणी घालून भज्यांच्या पिठासारखं सरसरीत पीठ भिजवा. फार पातळ नको. पीठ १५२० मिनिटं झाकून ठेवा.

. केळीच्या पानांना एका बाजूला थोडं तूप लावून घ्या. गरम तव्यावर एक केळीचं पान तूप लावलेली बाजू वरच्या बाजूला येईल असं ठेवा. त्यावर १ दीड टेबलस्पून पीठ घाला आणि हलक्या हाताने पीठ नीट पसरून घ्या. आता दुसरं केळीचं पान पहिल्या पानावर ठेवा. तूप लावलेली बाजू खालच्या बाजूला येऊ दे. पान हलक्या हाताने जरासं दाबून घ्या म्हणजे ते पिठाला चिकटेल.

Pangi / Panki being roasted on a griddle (पानगी / पानकी तव्यावर भाजताना)

. झाकण ठेवून मध्यम आचेवर ४५ मिनिटं भाजून घ्या. केळीचं पान भाजून लालसर होईल. पानगी केळीच्या पानासकट परतून दुसरी बाजू भाजून घ्या. छान भाजलेल्या पानगीवर हलके लालसर ठिपके दिसतील.

. तिखटमिठाची पानगी चटणी / तुपाबरोबर सर्व्ह करा. गोडाची पानगी लोणी / तुपाबरोबर सर्व्ह करा

Savory Pangi / Panki (तिखटमिठाची पानगी / पानकी)
Sweet Pangi / Panki (गोडाची पानगी / पानकी)
 

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes