Rava Naral Malai Laadoo (रवा नारळ मलई लाडू) – Semolina Coconut Laddus with Malai – Easy Laddus without Sugar Syrup
Generally while making Rava Coconut laddus, sugar syrup (Chasni) is required. Many people are not very confident of making sugar syrup of required consistency. Can’t the sugar syrup be avoided? Yes. It can be avoided. This is my innovation where Sugar Syrup is not required. I use Fresh Cream for binding. It gives super delicious taste to these laddus. It’s an easy recipe where nothing can go wrong.
Ingredients (Makes 20-22 Laddus) (1 cup = 250ml)
Rava Barik (Semolina Fine) 1 cup
Fresh Scraped Coconut 1 cup (Use only white part of the coconut)
Powdered Sugar / Bura Sugar 1 cup
Fresh Milk Cream (Malai) about ¾ cup
Cardamom (Eliachi) Powder ¼ teaspoon
Pure Ghee (Clarified Butter) 1 tablespoon
Raisins / Dry Fruits 2 tablespoon
Instructions
1. Add Ghee to a thick bottom pan; add Semolina and Roast Semolina on medium flame for about 5 minutes.
2. Now add Fresh Scraped coconut to the pan. Roast the mixture on medium flame till light brown.
3. Switch off the gas. Add Milk cream (Malai), mix and cover the pan. Leave it to cool.
4. After 15-20 minutes, add Powdered / Bura sugar and mix.
5. Add Raisins / Dry fruits, cardamom powder and mix.
6. Roll lemon size laddus. If mixture is dry, add ½ tablespoon Milk cream to the mixture and mix.
7. Enjoy these delicious Laddus. Laddus will last for 3-4 days at room temperature. If you want to store longer, store in refrigerator.
Note
1. Bura sugar is fine granular sugar which is made by boiling sugar syrup to reach crystallization. Advantage of Bura sugar is lumps are not formed unlike powdered sugar.
2. If Semolina is little coarse, you may require more Milk Cream. But add spoonful at a time as required.
===================================================================================
रवा नारळ मलई लाडू – साखरेचा पाक न करता बनणारे सोपे लाडू
साखरेचा पाक न करता रवा नारळाचे लाडू होतात का ? नक्की होतात. बऱ्याच जणांना साखरेचा पाक नीट जमत नाही.किंवा पाक नीट होईल का याची धास्ती वाटत असते. त्यांच्यासाठी ही माझी इनोव्हेटिव्ह रेसिपी. अगदी सोपी रेसिपी आहे – ह्या लाडवात मी तुपाऐवजी मलई (साय) घातलीय. ह्यात साखरेचा पाक करावा लागत नाही. म्हणजे काही चुकणारच नाही … बिनधास्त करा लाडू. लाडू फार स्वादिष्ट होतात.
साहित्य (२०–२२ लाडवांसाठी) (१ कप = २५० मिली)
बारीक रवा १ कप
ताजा खवलेला नारळ १ कप
पिठीसाखर साखर (किंवा बुरा साखर) १ कप
मलई (साय) अंदाजे पाऊण कप
वेलची पूड पाव चमचा
साजूक तूप १ टेबलस्पून
सुके मेवे / बेदाणे २ टेबलस्पून
कृती
१. एका कढईत तूप आणि रवा घालून मंद आचेवर ५ मिनिटं भाजून घ्या.
२. आता रव्यात नारळ घाला आणि मिश्रण गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्या. गॅस बंद करा.
३. रव्यात मलई घालून मिश्रण नीट ढवळा आणि झाकण ठेवून गार व्हायला ठेवा.
४. १५–२० मिनिटांनी साखर घालून ढवळून घ्या.
५. सुके मेवे, वेलची पूड घालून मिक्स करा.
६. मध्यम आकाराचे लाडू वळा. मिश्रण सुकं झालं असेल तर अर्धा टेबलस्पून मलई घालून मिक्स करा आणि लाडू वळा.
७. चविष्ट रवा नारळ मलई लाडू तयार आहेत.
८. हे लाडू फ्रिज मध्ये न ठेवता ३–४ दिवस टिकतात.नंतर फ्रिजमध्ये ठेवून खाऊ शकता.
टीप
१. बुरा साखर ही अगदी बारीक दाणेदार साखर असते. ती बनवताना साखरेचं पाणी आटवून त्यातलं सगळं पाणी काढून टाकतात. ह्या साखरेत पिठीसाखरेसारख्या गुठळ्या होत नाहीत.
२. रवा जरा जाड असेल तर जास्त मलई घालावी लागेल. पण सर्व मलई एकदम न घालता जशी लागेल तशी एक एक चमचा घाला.
Your comments / feedback will help improve the recipes