Tondlyachya Kacharya (तोंडल्याच्या काचऱ्या) – Dry Subji using Tendli / Ivy Gourd / Scarlet Gourd

Tondlyachya Kacharya (तोंडल्याच्या काचऱ्या)

Tondlyachya Kacharya (तोंडल्याच्या काचऱ्या) – Dry Subji using Tendli / Ivy Gourd / Scarlet Gourd

तोंडल्याच्या काचऱ्या मराठी

This is a Maharashtrian style Tondli / Tendli (Ivy Gourd / Scarlet Gourd) Subji. Kacharya in Marathi is a specific way of chopping vegetables where we make thin slices of veggies. This Subji is very common in Maharashtrian households but is not available in restaurants. This subji does not use Onion and Garlic and yet it is tasty. This is a very easy recipe and does not require too many ingredients.

The only time consuming part in this recipe is to chop Tondli. After that it does not take long to make the subji. If you want to make this subji in the morning, you can chop Tondli on previous night, cover it and keep in refrigerator. Next morning you can make subji.

Ingredients (Serves 4)

Tondli / Tendli About 400 gms

Crushed Chilies 1 teaspoon / Green Chilies 3-4 with a slit lengthwise

Fresh Scraped coconut 1 tablespoon

Chopped coriander 1 teaspoon

Lemon Juice ½ teaspoon

Sugar ½ teaspoon (adjust as per taste)

Salt to taste

For Tempering / Tadka

Oil 1 tablespoon

Mustard Seeds ¼ teaspoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Turmeric Powder ½ teaspoon

Asafoetida (Hing) 2 pinch

Instructions

1. Wash Tondli. Chop Tondli in thin round slices.

2. In a wok, heat oil on medium heat.

3. Add mustard seeds, wait for splutter; add cumin seeds, wait for splutter.

4. Add asafoetida, crushed chilies.

5. Add Tondli slices and turmeric powder. Mix.

6. Saute for 2-3 minutes. Cook covered till Tondli are soft. Regularly stir the subji. If required, sprinkle little water and then cook.

7. Add Sugar, Salt, Lemon juice, Scraped coconut, chopped coriander and mix.

8. Cook for 2 minutes and this tasty Tondlyachya Kacharya are ready.

9. Serve hot with Puri or Roti (Indian Bread) or Curd Rice.

Note

1. You can add ½ teaspoon Red Chili Powder instead of Green Chilies. Add it in step 7.

Tondlyachya Kacharya (तोंडल्याच्या काचऱ्या)
Tondlyachya Kacharya (तोंडल्याच्या काचऱ्या)

===================================================================================

तोंडल्याच्या काचऱ्या – कांदा लसूण विरहित चविष्ट भाजी

काचऱ्या हा प्रकार महाराष्ट्रीयन स्वयंपाकात लोकप्रिय आहे. काचऱ्या म्हणजे भाजीचे पातळ काप करून तेलावर परतून केलेली सुकी भाजी. फक्त हिरवी मिरची, नारळ, कोथिंबीर, मीठ, साखर घालून केलेल्या ह्या भाज्या चविष्ट असतात कारण मूळ भाजीची चव कांदा, लसूण आणि मसाले घालून मारलेली नसते. ह्या भाज्या कुठल्याही हॉटेलात मी तरी बघितल्या नाहीत. कारण माहित नाही. कदाचित एकच रस्सा करून त्यात वेगवेगळ्या भाज्या घालून वेगवेगळ्या नावाने द्यायची यात सोय नाही म्हणून असेल. पण मराठी कुटुंबात मात्र ह्या भाज्या अजून तरी केल्या जातात.

तोंडल्याच्या काचऱ्यांमध्ये एकच वेळखाऊ काम म्हणजे तोंडली चिरणे. एकदा चिरून झाली की भाजी पटकन होते. सकाळी घाईच्या वेळी भाजी करायची असेल तर आदल्या रात्री काचऱ्या चिरून झाकून फ्रिजमध्ये ठेवाव्यात. आणि सकाळी भाजी करावी.

साहित्य (४ जणांसाठी

तोंडली अंदाजे ४०० ग्राम

ठेचलेली हिरवी मिरची १ टीस्पून / हिरव्या मिरच्या  ३उभी चीर देऊन

ताजा खवलेला नारळ १ टेबलस्पून

चिरलेली कोथिंबीर १ टीस्पून

लिंबाचा रस अर्धा टीस्पून

साखर अर्धा टीस्पून (चवीनुसार कमी / जास्त करा)

मीठ चवीनुसार

फोडणीसाठी

तेल १ टेबलस्पून

मोहरी पाव टीस्पून

जिरं पाव टीस्पून

हिंग २ चिमूट

हळद अर्धा टीस्पून

कृती

. तोंडली धुवून पातळ गोल काचऱ्या चिरून घ्या

. एका कढईत तेल गरम करून मोहरी, जिरं, हिंगाची फोडणी करा.

. त्यात हिरवी मिरची घाला.

. तोंडल्याच्या काचऱ्या कढईत घाला. हळद घाला. ३ मिनिटं परतून घ्या.

. आता झाकण ठेवून वाफेवर तोंडली मऊ होईपर्यंत शिजवा. मधे मधे भाजी ढवळाजरूर पडल्यास भाजी शिजण्यासाठी थोडं पाणी शिंपडा.

. आता मीठ, साखर, लिंबाचा रस, नारळ आणि कोथिंबीर घालून मिक्स करा. २ मिनिटं शिजवा.

. चविष्ट तोंडल्याच्या काचऱ्या तयार आहेत. गरम काचऱ्या पोळी / भाकरी किंवा दही भातासोबत सर्व्ह करा.

टीप

. ह्या भाजीत हिरव्या मिरची ऐवजी अर्धा चमचा लाल तिखट घालू शकता. मीठ, साखरेसोबत तिखट घाला. मात्र लाल तिखटाने भाजीचा रंग वेगळा येतो

Tondlyachya Kacharya (तोंडल्याच्या काचऱ्या)
Tondlyachya Kacharya (तोंडल्याच्या काचऱ्या)

2 Comments

    • अगदी बरोबर. रोज मसाल्याच्या भाज्या खायला नाही आवडत. \nSudha

Your comments / feedback will help improve the recipes