Tips for making Perfect Khobaryachi Karanji (परफेक्ट सुक्या खोबऱ्याच्या करंज्या करण्यासाठी टिप्स)

Khobaryachi Karanji (सुक्या खोबऱ्याच्या करंज्या)

Tips for making Perfect Khobaryachi Karanji (परफेक्ट सुक्या खोबऱ्याच्या करंज्या करण्यासाठी टिप्स)

परफेक्ट सुक्या खोबऱ्याच्या करंज्या करण्यासाठी टिप्स मराठी

1. Use fine semolina for the cover.

2. For cover, add Ghee (don’t melt Ghee) to All purpose flour and Semolina mixture and bind a stiff dough by adding milk. If you add 1 tablespoon of corn flour to this dough, cover will be more crispy. Let it rest for 4-5 hours. Knead the dough properly before using it. If dough is not stiff, you will have to use dry flour for dusting while rolling dough balls. While deep frying, this dry dough will drop in the oil and oil will be brownish.

3. While grating dry coconut for the filling, grate the dark skin first and keep it separate. Later grate the white part and use it for filling. You can use grated dark skin for making gravy.

4. While making Karanji, roll the dough thin. If it’s thick, Karanji will not be well fried and will not be crisp.

5. Add enough filling in the Karanji. Seal the edges properly. If there is any gap, then filling will drop in the oil.

6. Deep fry Karanji on low heat. Once you slide in Karanji in oil, splash oil on the top part of Karanji. This way, Karanji will have a nice texture.

7. In case a Karanji breaks in oil, using a muslin cloth separate out the burnt filling from oil and then use the oil for frying.

8. Use Refined Oil / Ghee / Vanaspati to fry Karanji. Karanji fried in Filtered Oil smell of Oil after frying.

For detailed Recipe of Khobaryachya Karanjya, click on the link below:

Khobaryachi Karanji (सुक्या खोबऱ्याच्या करंज्या) – Gujiya with Dry Coconut filling

Khobaryachi Karanji (सुक्या खोबऱ्याच्या करंज्या)

===================================================================================

परफेक्ट सुक्या खोबऱ्याच्या करंज्या करण्यासाठी टिप्स

. पारीसाठी बारीक रवा वापरा.

. रवा आणि मैदा तुपाचं मोहन घालून दुधात घट्ट भिजवा (तूप गारच घाला) आणि ४५ तास झाकून ठेवा. मुरल्यावर पीठ छान मळून घ्या. पारीच्या पिठात १ टेबलस्पून कॉर्न फ्लोअर घातलं तर पारी आणखी खुसखुशीत होते. पीठ सैल झालं तर लाटताना सुकं पीठ लावावं लागते आणि करंजी तळताना ते सुकं पीठ तेलात / तुपात उतरून तेल / तूप काळं होते.

. सारणासाठी खोबरं किसताना आधी काळा भाग किसून वेगळा काढा. तो भाजीसाठी वापरू शकता. मग पांढरी खोबऱ्याची वाटी वेगळी किसून घ्या. सारणाचा रंग छान येतो.

. करंजीची पुरी जाड लाटली तर करंजी नीट तळली जाणार नाही आणि खुसखुशीत होणार नाही. पुरी पातळ लाटा.

. सारण भरताना पोळपाटावर लाटलेली पुरी ठेवून भरा किंवा पुरी तळव्यावर घेऊन भरा. पण सारण अगदी कमी भरले तर करंजी तळल्यावर खुळखुळा म्हणून वाजवता येईल. सारण भरल्यावर करंजी नीट बंद करा. कुठेही भोक राहिलं तर तळताना सारण बाहेर येतं आणि तेल/तूप खराब होतं.

. करंजी तळताना तेलात/ तुपात सोडल्यावर मंद आचेवर तळा आणि झाऱ्याने करंजीच्या वरच्या भागावर हळू हळू तेल / तूप उडवा. असे केल्याने करंजीला छान मुखऱ्या येतात.

. तळताना एखादी करंजी फुटली आणि सारण तेलात / तुपात पडलं तर तेल / तूप मलमल च्या कपड्याने गाळून घ्या आणि नंतर बाकीच्या करंज्या तळा. नाहीतर करंज्यांना तळलेल्या सारणाचे काळे डाग पडतात

. करंज्या तळायला रिफाईंड तेल किंवा तूप वापरा. फिल्टर्ड तेलात तळलेल्या करंज्यांना तेलाचा वास येतो

खोबऱ्याच्या करंजीच्या सविस्तर रेसिपीसाठी ह्या लिंकवर क्लिक करा:

Khobaryachi Karanji (सुक्या खोबऱ्याच्या करंज्या) – Gujiya with Dry Coconut filling

Khobaryachi Karanji (सुक्या खोबऱ्याच्या करंज्या)

 

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes