Masala Dudh (मसाला दूध) – Traditional Maharashtrian Sweet Milk
Masala Dudh (Masala Milk) is Sweetened Milk with added dry fruits. It’s a Maharashtrian specialty made on special occasions. There are different ways to add dry fruits to Masala Milk. There are different ways to add dry fruits to Masala Milk. You can either add Dry fruit powder (ready made or home made) or add thin slices of dry fruit. I add home made dry fruit powder. Dry fruit powder can be made by simply grinding Almonds, Cashew and Pistachios together. Use Pulse mode of the grinder so that the powder won’t be oily.
Ingredients (Makes 5-6 Glasses) (1 cup = 250 ml)
Full fat Milk 1.5 litre
Sugar about ½ cup (adjust as per taste)
Saffron 5-6 strands soaked in warm milk
Cardamom Powder ¼ teaspoon
Dry Fruit Powder 2-3 teaspoons
Instructions
1. In a thick bottom pan, add full cream milk. Keep boiling milk on medium to high flame for 7-8 minutes. Keep stirring all the time to avoid spilling over.
2. Add sugar. Boil till sugar dissolves.
3. Mix dry fruit powder with 2 tablespoon of milk (you can use the milk that is being boiled) , mix it and then add to boiling milk. This way there won’t be lumps of dry fruit powder.
3. Add saffron and Cardamom powder. Stir well and remove from gas.
4. Keep stirring till lukewarm to avoid formation of cream layer on top.
5. You can serve Masala Milk hot or cold. Garnish with dry fruit slices while serving. For cold milk, keep Masala Milk in refrigerator after it comes to room temperature.
===================================================================================
मसाला दूध – सगळ्यांचे आवडतं पेय
हे पारंपारिक महाराष्ट्रीयन मसाला दूध सणासुदीला केलं जातं. करायला तसं सोपं आणि सगळ्यांच्या आवडीचं. मसाला दूध करायला फार वेळ लागत नाही. काही जणी ह्यात दुधाचा तयार मसाला घालतात. त्याऐवजी घरी ड्राय फ्रुट ची पावडर करून घातली तर जास्त चांगलं. किंवा ड्राय फ्रुटस चे पातळ काप करून घालू शकता. मी घरी केलेली पावडर घालते. ड्राय फ्रुट पावडर करण्यासाठी बदाम, काजू आणि पिस्ते मिक्सर मध्ये पल्स मोड वर बारीक करायचे. असे केल्याने पावडर तेलकट न होता सुकी होते. आणि गरम दुधात ही पावडर घालताना एका वाटीत पावडर आणि २ चमचे दूध एकत्र करून मग उकळत्या दुधात घालावी म्हणजे पावडरच्या गुठळ्या होत नाहीत.
साहित्य (५–६ ग्लास दुधासाठी) (१ कप = २५० मिली)
म्हशीचं दूध दीड लिटर
साखर अर्धा कप (चवीप्रमाणे कमी / जास्त करा)
केशर ५–६ काड्या कोमट दुधात भिजवून
वेलची पूड पाव टीस्पून
ड्राय फ्रुट पावडर २–३ टेबलस्पून
कृती
१. एका जाड बुडाच्या पातेल्यात दूध घेऊन मध्य्म / मोठ्या आचेवर ७–८ मिनिटं उकळा. एकसारखं ढवळत रहा.
२. दुधात साखर घाला. साखर विरघळेपर्यंत उकळा.
३. ड्राय फ्रुट पावडर एका वाटीत घेऊन त्यात २ टेबलस्पून दूध घालून मिक्स करा आणि मिश्रण उकळत्या दुधात घाला. असं केल्याने ड्राय फ्रुट पावडर च्या गुठळ्या होणार नाहीत.
४. केशर आणि वेलची पूड घालून एक उकळी काढा. गॅस बंद करा.
५. मसाला दूध गरम पिऊ शकता किंवा फ्रिजमध्ये ठेवून गार करून पिऊ शकता. दोन्ही छान लागतात. आवडत असेल तर सर्व्ह करताना वरून थोडे पिस्त्याचे/ बदामाचे काप घाला. फ्रिजमध्ये ठेवण्याआधी दूध कोमट करून घ्या. सारखे ढवळत रहा म्हणजे साय धरणार नाही.
Your comments / feedback will help improve the recipes