Tondli Bhaat – Tondli Bhat (तोंडली भात)– Maharashtrian Specialty Spiced Rice with Ivy Gourd

Tondli Bhaat served with Kadhi and Bhaji (तोंडली भात, कढी आणि मिक्स भजी )

Tondli Bhaat – Tondli Bhat (तोंडली भात)– Maharashtrian Specialty Spiced Rice with Ivy Gourd

तोंडली भात मराठी

Spiced Rice with Tondli (Ivy Gourd / Scarlet Gourd / Kowai) is a Maharashtrian Specialty. In Maharashtra different vegetables like Brinjal, Carrots, Green Peas, Cabbage, Cauli Flower are added to Spiced Rice. The basic recipe of Spiced Rice is the same. But these vegetables give a different taste to rice. I don’t add Garam Masala to this rice; instead add Goda Masala and whole spices – Black Pepper, Cloves, Cardamom, Cinnamon and Bay Leaf. This makes the rice very tasty. My mother used to add a spoonful of Pure Ghee at the end after cooking the rice. That gives a nice aroma to the rice.

Ingredients (Serves 4) (1 cup = 250 ml)

Tondli (तोंडली)

Raw Rice 1 cup (Use short grain rice like Kolam / Ambemohor)

Tondli (Ivy Gourd / Scarlet Gourd / Kowai) about 250 gms

Goda Masala 2 teaspoon

Black Pepper 8-10

Cloves 6-7

Bay leaf 1

Cinnamon 1 inch stick

Green Cardamom 2

Chili Powder ½ to 1 teaspoon (adjust as per taste)

Curry Leaves 10-12 leaves

Lemon Juice 1 teaspoon

Fresh Scraped coconut 2 tablespoon

Chopped coriander 1 tablespoon

Cashew Nut Pieces 2 tablespoon

Oil 2 tablespoon

Mustard Seeds ¼ teaspoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Turmeric Powder ½ teaspoon

Asafoetida 2 pinch

Pure Ghee (Clarified butter) 1 tablespoon

Salt to taste

Instructions

1. Wash Raw Rice and leave it for 30 minutes.

2. Wash Tondli; remove edges and cut it lengthwise into 2 halves.

3. In a pan, heat oil.

4. Add mustard seeds, wait for sputter; Add cumin seeds, wait for splutter; Add Turmeric Powder, Asafoetida; Add Black Pepper, Cloves, Cinnamon, Green Cardamom and Bay leaf; Add curry leaves and cashew nuts.

5. Add Tondli and saute for 2 minutes.

6. Add Rice and saute the mixture till rice is dry. Simultaneously boil 2.5 cups of water.

7. When Rice is dry, add boiling water to it.

8. Add Salt, Chili Powder, Lemon Juice and Goda Masala. Mix.

9. Cover the pan and cook the mixture till rice is cooked.

10. Add Fresh scraped coconut and coriander. Mix.

11. Add Pure Ghee and mix. Switch off the gas.

12. Serve Tondli Bhaat hot with Kadhi and Papad / Bajiya.

Note

1. If you have Rice cooker, then you can transfer the mixture to Rice cooker after step 8; add coconut and coriander and cook rice in Rice Cooker. When the rice is cooked, add Pure Ghee and mix.

Tondli Bhaat (तोंडली भात)
Tondli Bhaat served with Bhaji (तोंडली भात आणि मिक्स भजी )
Tondli Bhaat served with Kadhi and Bhaji (तोंडली भात, कढी आणि मिक्स भजी )
===================================================================================

तोंडली भात

बाजारात छान कळीची तोंडली मिळाली. माझ्या आईला अशी तोंडली फार आवडायची. कळीची तोंडली नेहमीच्या तोंडल्यांपेक्षा लांब आणि बारीक असतात. तोंडली भाताचा बेत केला. आपला  महाराष्ट्रीयन मसालेभात कोणत्याही भाज्या घालून करू शकतो वांगी, गाजर, मटार, कोबी, फ्लॉवर, तोंडली. मूळ मसालेभाताची कृती एकच असली तरी भाज्यांमुळे वेगळी चव येते. मी मसालेभातात गोडा मसाला घालते आणि मिरी, लवंग, वेलची, दालचिनी, तमालपत्र अख्खेच घालते. भात पटकन होतो आणि छान लागतो. माझ्या आईची एक टीप आहे भात शिजला की त्यात चमचाभर साजूक तूप घालायचं त्यामुळे भाताला छान सुगंध येतो

साहित्य (४ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)

Tondli (तोंडली)

तांदूळ १ कप (मी कोलम / आंबेमोहोर वापरते; कोणताही बारीक तांदूळ वापरू शकता)

तोंडली पाव किलो

गोडा मसाला २ चमचे

काळी मिरी ८१०

लवंग ६

दालचिनी १ इंच तुकडा

हिरवी वेलची २

तमालपत्र १

लाल तिखट अर्धा ते १ चमचा

कढीपत्ता १०१२ पानं

लिंबाचा रस १ चमचा

ताजा खवलेला नारळ २ टेबलस्पून

चिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून

काजूचे तुकडे २ टेबलस्पून

तेल २ टेबलस्पून

मोहरी पाव चमचा

जिरं पाव चमचा

हळद अर्धा चमचा

हिंग २ चिमूट

साजूक तूप १ टेबलस्पून

मीठ चवीनुसार

कृती

. तांदूळ धुवून अर्धा तास ठेवून द्या.

. तोंडल्यांचे देठ काढून उभे दोन तुकडे करा.

. एका पातेल्यात तेल गरम करून मोहरी, जिरं, हळद, हिंगाची फोडणी करा.

. फोडणीत काळी मिरी, लवंग, दालचिनी, हिरवी वेलची, तमालपत्र घालाकाजूचे तुकडे आणि कढीपत्ता घाला.

. तोंडली घालून २ मिनिटं परतून घ्या.

. तांदूळ घालून मिक्स करा आणि तांदूळ सुके होईपर्यंत मिश्रण मंद आचेवर परतून घ्या. एका गॅसवर अडीच कप पाणी गरम करायला ठेवा.

. तांदूळ सुके झाले की त्यात उकळतं पाणी घाला.

. मीठ, लाल तिखट, लिंबाचा रस आणि गोडा मसाला घालून मिक्स करा.

. झाकण ठेवून मंद आचेवर भात शिजवून घ्या. मध्ये मध्ये ढवळा.

१०. भात शिजला की त्यात नारळ, कोथींबीर घालून मिक्स करा.

११. शेवटी साजूक तूप घालून मिक्स करा आणि गॅस बंद करा.

१२. गरम गरम तोंडली भात कढी आणि पापड / भज्यांबरोबर खायला द्या.

टीप

. तुमच्याकडे राईस कुकर असेल तर वर दिलेल्या ८ व्या स्टेप नंतर मिश्रण राईस कुकर मध्ये काढा. त्यात नारळ, कोथिंबीर घाला. मिक्स करून कुकर मध्ये भट शिजवून घ्या. नंतर साजूक तूप घालून मिक्स करा.

Tondli Bhaat (तोंडली भात)
Tondli Bhaat served with Kadhi and Bhaji (तोंडली भात, कढी आणि मिक्स भजी )
 
Tondli Bhaat served with Bhaji (तोंडली भात आणि मिक्स भजी )
 

2 Comments

Your comments / feedback will help improve the recipes