Pav Bhaaji / Pav Bhaji (पाव भाजी – मुंबईचं लोकप्रिय फास्ट फूड) – Famous Fast Food from Mumbai
पाव भाजी- मुंबईचं लोकप्रिय फास्ट फूड
Pav Bhaji is an all time favorite yummy Fast Food. There are different recipes for Pav Bhaji using different veggies. This is the recipe that I have been using for making delicious Pav Bhaji. I boil Cauliflower, Cabbage, Green Peas, Potatoes and mash it. Capsicum, Onion and Tomatoes are chopped. For nice red colour, I either add Soaked and Ground Kashmiri Chilies or Kashmiri Chili Powder. Main taste of Pav Bhaaji comes from Pav Bhaaji Masala. So use the Pav Masala to match your taste.
Ingredients (Serves 5) (1 cup = 250 ml)
Cauliflower 1 medium
Cabbage 1 medium
Potatoes 6 medium size
Onions 4 medium size
Tomatoes 4 medium size
Capsicum 2 small
Green Peas 1 cup
Red Chili powder ½ to 1 teaspoon
Kashmiri chilies 3-4 (Or Kashmiri Chili Powder 1 teaspoon)
Pav Bhaji Masala 3-4 teaspoon
Salt to taste
Butter 2 tablespoon
Chopped coriander 1 tablespoon
For serving
Chopped onions
Chopped coriander
Lemon pieces
Butter
Pav
Instructions
1. Wash and chop Cauliflower, cabbage. Pressure cook them separately.
2. Pressure cook Potatoes and green peas separately.
3. Finely chop Onions, Tomatoes and Capsicum.
4. Soak Kashmiri chilies in water for 30 minutes; grind into a smooth paste.
5. In a heavy bottom pan, heat butter.
6. Add onions; saute on low flame for 3-4 minutes.
7. Add capsicum; saute on low flame for 3-4 minutes
8. Add tomatoes; cook covered on low flame till onions are soft. Stir after every 3-4 minutes. If mixture is too dry, sprinkle some water.
9. Using a vegetable masher, mash the mixture.
10. Mash cauliflower, cabbage and green peas properly.
11. Peel boiled potatoes and grate them.
12. Add all mashed veggies in the pan and mix well. Add some water to adjust consistency.
13. Add Kashmiri chili paste (or Kashmiri Chili Powder), Red Chilly powder, Salt, Pav Bhaji Masala and mix well.
14. It should be nice homogeneous mixture. Add chopped coriander and mix well. Bhaaji is ready.
15. For serving apply butter to Pav and roast them.
16. Serve Bhaaji with a generous topping of Butter along with roasted Pav, chopped onion, chopped coriander and lemon pieces. Enjoy.
Note
1. You can add 1 teaspoon Crushed Garlic to Pav Bhaaji. Add it along with onions in step 6.
==================================================================================
पाव भाजी – मुंबईचं लोकप्रिय फास्ट फूड
मुंबईची पाव भाजी खूप लोकप्रिय आहे. पाव भाजी घरी बनवणं थोडं वेळकाढू काम असलं तरी फार कठीण नाहीये. पाव भाजीची भाजी बनवण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. मीकित्येक वर्ष ही रेसिपी वापरून भाजी बनवते. भाजीत मी फ्लॉवर, कोबी, मटार आणि बटाटे शिजवून, कुस्करून घालते. तर ढोबळी मिरची, कांदा, टोमॅटो बारीक चिरून घालते. भाजीला छान लालसर रंग येण्यासाठी काश्मिरी मिरची भिजवून वाटून घालते किंवा काश्मिरी मिरचीची पावडर घालते. भाजीला चव येण्यासाठी पाव भाजीचा मसाला खूप महत्वाचा कारण दुसरे काहीच मसाले मी घालत नाही. तुमच्या चवीला साजेसा पाव भाजी मसाला वापरा. भाजी नेहमी बटर वर करते त्यामुळे आणखी चविष्ट होते.
साहित्य (५–६ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)
फ्लॉवर १ मध्यम
कोबी १ मध्यम
बटाटे ६ मध्यम
कांदे ४ मध्यम
टोमॅटो ४ मध्यम
ढोबळी मिरची २ लहान
मटारचे दाणे १ कप
लाल तिखट अर्धा – १ चमचा
काश्मिरी लाल मिरच्या ३–४ (किंवा काश्मिरी मिरची पावडर १ चमचा )
पाव भाजी मसाला ३–४ चमचे
मीठ चवीनुसार
बटर २ टेबलस्पून
चिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून
सर्व्ह करताना लागणारे साहित्य
बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर
लिंबाचे तुकडे
बटर
पाव
कृती
१. फ्लॉवर, कोबी धुवून मोठे तुकडे करून प्रेशर कुकर मध्ये शिजवून घ्या.
२. बटाटे आणि मटारचे दाणे प्रेशर कुकर मध्ये वेगवेगळे शिजवून घ्या.
३. कांदे, टोमॅटो आणि ढोबळी मिरची बारीक चिरून घ्या.
४. काश्मिरी लाल मिरच्या अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवा आणि मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या.
५. एका जाड बुडाच्या पातेल्यात बटर गरम करा.
६. पातेल्यात चिरलेला कांदा घालून मंद आचेवर ३–४ मिनिटं परतून घ्या.
७. चिरलेली ढोबळी मिरची घालून मंद आचेवर ३–४ मिनिटं परतून घ्या.
८. चिरलेले टोमॅटो घालून ढवळून घ्या. झाकण ठेवून मंद आचेवर कांदा नरम होईपर्यंत शिजवून घ्या. मधे मधे ढवळा. मिश्रण सुकं झालं तर थोडं पाणी शिंपडा.
९. भाजीच्या मॅशर नी मिश्रण मॅश करा.
१०. शिजलेला फ्लॉवर, कोबी आणि मटार मॅशर ने नीट मॅश करून घ्या.
११. शिजलेले बटाटे सोलून किसून घ्या.
१२. सगळी मॅश केलेली भाजी, बटाटे पातेल्यात घाला. मिश्रण नीट ढवळून घ्या. जरुरीप्रमाणे पाणी घालून वाफ काढा.
१३. काश्मिरी मिरचीची पेस्ट / काश्मिरी मिरची पावडर घाला. मीठ, पाव भाजी मसाला घालून मिश्रण ढवळून छान वाफ काढा.
१४. भाजी छान मिळून आली पाहिजे. तशी नसेल तर मॅशर नी परत मॅश करा. चिरलेली कोथिंबीर घालून ढवळून घ्या.
१५. खायला देताना पाव मधे कापून बटर लावून तव्यावर गरम करा.
१६. भाजीवर सढळ हाताने बटर घालून सोबत चिरलेला कांदा, कोथिंबीर, लिंबाचा तुकडा देऊन गरम पावाबरोबर सर्व्ह करा.
टीप
१. पाव भाजीत लसूण घालायची असेल तर १ चमचा ठेचलेली लसूण कांद्याबरोबर घाला.
मॅडम, एक रिक्वेस्ट होती, ग्रीन पाव भाजी ची रेसिपी शेअर कराल का? मी मध्यंतरी ग्रीन पाव भाजी खाल्ली होती आणि तशी मला करुन बघायची आहे. धन्यवाद.
\n
मी केली नाही अजून. करेन तेव्हा रेसिपी पोस्ट करेन.