Tea Masala (चहाचा मसाला)

Tea Masala (चहाचा मसाला)

Tea Masala (चहाचा मसाला)

चहाचा मसाला मराठी

Recipe credit – My friend’s mother.

We never used to make Masala Tea at home till about 2 years back when I first bought Ready made Tea Masala. After that mostly our afternoon Tea is Masala Tea. But I always remembered the Masala Tea made by my friend’s mother whenever we used to visit her – we were a group of 4 friends from college days. That taste was awesome. We are still in touch. So I asked my friend to get the recipe of Tea Masala from her mother. This is that recipe. Ever since I got this recipe, I’ve making Tea Masala at home. In original recipe, ingredient measures were mentioned in grams. For everyone’s convenience, I’ve converted them into cup/spoon measure.

Ingredients (1 cup = 250 ml)

Ingredients of Tea Masala (चहाच्या मसाल्याचे साहित्य)

Dry Ginger Powder (Soonth ) 50 gm – ¾ cup
Black Pepper 25 gm – ¼ cup
Small cardamom 15 gm – 1/8 cup
Big cardamom 5 gm (optional) – 2
Cinnamon 5 gm – 8-10 one inch pieces
Cloves 5 gm – 40-45
Mace (Javitri) 5 gms – ¼ cup
Nutmeg (Jayphal) ½

Instructions

1. Except Dry Ginger powder grind all ingredients together into a fine powder.

2. Now add dry ginger powder in the powder in the mixer and grind it for a minute.

3. While making Tea, add this Masala as required and boil tea. Enjoy hot and Aromatic Masala tea.

 

Tea Masala (चहाचा मसाला)

==================================================================================

चहाचा मसाला

ही माझ्या मैत्रिणीच्या आईची रेसिपी.

अगदी दोन वर्षांपूर्वीपर्यंत आम्ही घरी मसाल्याचा चहा करत नव्हतो. मग एकदा मी तयार मसाला विकत आणला आणि घरी दुपारचा चहा मसाल्याचा व्हायला लागला.पण माझ्या आठवणीत मसाल्याच्या चहाची एक चव होती ती काही मिळत नव्हती. आमच्या कॉलेजच्या मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये एका मैत्रिणीची आई मसाल्याचा चहा करायची. आम्ही तिच्या घरी गेलो की हमखास तो स्पेशल चहा मिळायचा. खरं तर तो चहा हेही एक कारण असायचं तिच्या घरी जायला. तिची आई तो मसाला स्वतः करायची. आम्हा मैत्रिणींच्या अजूनही भेटीगाठी चालू असतात. मी मैत्रिणीला सांगितलं तिच्या आई कडून मसाल्याची रेसिपी आणायला. तिच्या आईनं आनंदानं दिली. आणि मी ती रेसिपी वापरून चहाचा मसाला करायला लागले. माझ्या आठवलीतली मस्त चव मला मिळाली.मूळ रेसिपी मध्ये जिन्नसांची मापं ग्रॅम मध्ये आहेत. मी ती मापं कप – २५० मिली- च्या मापात करून दिली आहेत.

साहित्य (१ कप = २५० मिली )

Ingredients of Tea Masala (चहाच्या मसाल्याचे साहित्य)

सुंठ पावडर  ५० ग्रॅम पाऊण कप

काळी मिरी २५ ग्रॅम – पाव कप

हिरवी वेलची १५ ग्रॅम – १/८ कप पाव कपाच्या अर्धा

मसाला वेलची ५ ग्रॅम २ वेलची (ऐच्छिक)

दालचिनी ५ ग्रॅम – एक इंचाचे ८-१० तुकडे

लवंग ५ ग्रॅम – ४०-४५ लवंगा

जावित्री ५ ग्रॅम – पाव कप

जायफळ अर्ध

कृती

१. सुंठ पाउडर वगळून बाकीचं साहित्य कच्चेच  मिक्सरमध्ये बारीक करून घ्यामिश्रण मिक्सरमध्येच राहू द्या.

२. आता सुंठीची पावडर त्याच मिक्सर मध्ये घाला आणि मिक्सर फिरवून मिश्रण एकजीव करून घ्या. चहाचा मसाला तयार आहे.

३. चहा करताना हा मसाला घालून चांगला उकळवा. गरम गरम मसाला चहाचा आनंद घ्या.

 

Tea Masala (चहाचा मसाला)

10 Comments

 1. हे चुकीचे पोस्ट झाले आहे.प्लिज delete कराल का?तसा ऑपशन दिसत नाही इथे.

  \n

 2. मी गावाला जाताना हा मसाला घेउन गेले होते तिकडे सर्वांना हा चहा आवडला. आवर्जून कळवायला सांगितले आहे बाबांनी मला. रेसिपी साठी धन्यवाद.

  \n

 3. सुधा मॅडम, तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात चहा अगदी छान झाला. खूप खूप धन्यवाद. तुमच्या अनेक रेसिपी मी करण्याचा प्रयत्न करते आणि खूपच छान होतात.

  • खूप छान वाटलं वाचून. रेसिपी केल्यावर सांग कशा झाल्या ते.

 4. मी चहा मसाला बनवला पण तो कसा वापरायचा ते पण सांगाल का? आज मी चहा करुन बघितला 2.5 चिमूट मसाला घालून पण तशी चव लागत नाही. 1 कप चहा चे प्रमाण कळले तर बरे होईल. म्हणजे साखर, चहा पावडर आणि मसाला तिन्ही गोष्टींचे.

  • प्रत्येकाची चहाची चव वेगवेगळी असते. मी २ कप तयार चहासाठी दीड कप पाणी, दीड चमचा साखर, दीड चमचा चहा पावडर घालते. आमचा चहा कमी गोड असतो. चहा पावडर गिरनार रॉयल कप किंवा वाघबकरी ची वापरते. ही चहा पावडर स्ट्रॉंग असते. पाण्यात साखर आणि पाव चमचा चहाचा मसाला घालून पाणी उकळलं की चहा पावडर घालून एक मिनिट उकळायचं. नंतर झाकण ठेवून २-३ मिनिटं चहा मुरू द्यायचा. मग चहा गाळून उकळतं दूध घालायचं.   तुमच्या आवडीप्रमाणे साखर, चहा पावडरचं प्रमाण कमी जास्त करा. \nSudha

   • खूप खूप धन्यवाद. आज दुपारी असा चहा करुन बघते आणि आवर्जून कळवते.

Your comments / feedback will help improve the recipes