Kavathachi Chutney (कवठाची चटणी ) – Wood Apple Sweet and Sour Chutney

Kavathachi Chutney (कवठाची चटणी)

Kavathachi Chutney (कवठाची चटणी ) Wood Apple Sweet and Sour Chutney

कवठाची चटणी मराठी

Kavath (Kaitha / Kabeet in Hindi, Kotha in Gujrati, Wood Apple in English) is a fruit with medicinal value. The fruit has a hard greenish brown shell and brownish colour pulp with white seeds. Ripe fruit has a sweet and sour smell. Kavath chutney is an easy recipe to make very tasty sweet and sour chutney. Only a few ingredients are required to make this chutney. You can only mix the ingredients if you want to consume the chutney immediately or cook it if you want it to last for 2-3 days. I’ve cooked the chutney. This chutney can be an accompaniment with any meal.

Ingredients (1 cup = 250 ml)

Kavath Fruit (कवठ)

Wood Apple Pulp ½ cup

Crushed Jaggery ½ cup

Roasted Cumin Powder ¼ teaspoon

Chili Powder ¼ teaspoon

Salt and Black Salt As per taste

Ingredients Of Kavathachi Chutney (कवठाच्या चटणीचं साहित्य)

Instructions

1. Wash and wipe Wood Apple.

2. Break it open as you can’t cut the shell.

3. Take out the pulp in a bowl. Remove thick strings from the pulp. Do not remove fine strings and seeds.

Kavath shell and Pulp (फोडलेलं कवठ आणि गर)

4. In a pan, mix Wood Apple Pulp, crushed Jaggery, Chili Powder and Roasted Cumin Powder. Add Salt and Black Salt together as per taste.

5. Cook on low flame till Jaggery melts. It will be a sticky mixture.

6. Yummy sweet and sour Wood Apple Chutney is ready. This goes well with anything.

7. This chutney will last for 2-3 days at room temperature.

Kavathachi Chutney (कवठाची चटणी)
Kavathachi Chutney along with Kavath fruit (कवठाची चटणी आणि कवठ)
      ==================================================================================

कवठाची चटणी Wood Apple Chutney

कवठ (हिंदीत कैथा/ कबीट, गुजरातीत कोठा, इंग्रजीत Wood Apple) हे एक औषधी फळ आहे. कवठाचा फोटो पोस्टमध्ये दिलायगेल्या आठवड्यात महालक्ष्मी सरस प्रदर्शनात दिसलं. मला माहित नव्हतं ते कसलं फळ आहे ते. विकणाऱ्या मावशींना विचारलं. त्यांनी सांगितलं कवठ आहे; त्याची चटणी करतात. त्यांच्याकडे चटणी विकायला पण होती; त्याची चव घेतली. छान लागली. म्हणून फळं विकत घेतली चटणी करायला. गूगल वर शोधाशोध करून रेसिपी शोधली आणि नेहमीप्रमाणे रेसिपीत थोडे बदल करून चटणी केली. खूप चविष्ट आंबट गोड चटणी झाली. रेसिपी सोपी आहे. काही ठिकाणी जिन्नस फक्त एकजीव करून चटणी करतात. काही ठिकाणी शिजवून. मी शिजवून केली

कवठ पिकलं की त्याच्या देठाकडे आंबट गोड वास येतो. वास येत नसेल तर कवठ कच्चे असेल आणि आंबट असेल. कवठाची साल खूप टणक असते. सुरीने कापता येत नाही. बत्त्याने हलका घाव घातला की नारळासारखे दोन भाग होतात आणि गर काढता येतो. गर चॉकलेटी रंगाचा असतो आणि बिया पांढऱ्या असतात.

साहित्य (१ कप = २०० मिली)

Kavath Fruit (कवठ)

कवठाचा गर अर्धा कप

चिरलेला गूळ  अर्धा कप

लाल तिखट पाव चमचा

भाजलेल्या जिऱ्याची पूड पाव चमचा

मीठ आणि काळं मीठ चवीनुसार

Ingredients Of Kavathachi Chutney (कवठाच्या चटणीचं साहित्य)

कृती

. कवठ धुवून पुसून घ्या. बत्त्याने हलकेच घाव घालून फोडा. आणि गर काढून घ्या. गरात जाड शिरा असतील त्या काढून टाका. बारीक शिरा आणि बिया तशाच ठेवा.

Kavath shell and Pulp (फोडलेलं कवठ आणि गर)

. एका कढईत कवठाचा गर, गूळ, लाल तिखट आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड घाला. मीठ आणि काळं मीठ चवीनुसार घाला.

. मंद आचेवर एकसारखं ढवळत गूळ वितळेपर्यंत शिजवून घ्या.

. चॉकोलेटी रंगाचं मिश्रण तयार होईल. आपली कवठाची चटणी तयार आहे.

. ही चटणी कशाबरोबर ही छान लागतेचटणी फ्रिजबाहेर २३ दिवस चांगली राहील.

Kavathachi Chutney (कवठाची चटणी)
Kavathachi Chutney along with Kavath fruit (कवठाची चटणी आणि कवठ)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes