Fada Khichadi ( फाडा खिचडी – दलिया खिचडी) – Daliya Khichadi – Broken Wheat Kedgeree
फाडा खिचडी – दलिया खिचडी मराठी
Fada Khichadi is a Popular Gujarati specialty using Daliya – (Broken Wheat), and Moong Dal (Split Petite yellow lentil) and vegetables. This is a one pot meal. It is very good for Diabetic people. Those who can’t have Rice but still want to have Khichadi, this is an excellent option. There are different recipes for making this Khichadi. One good thing about this recipe is that you can add any vegetables that you like. I did not add Onions; but you can add if you like.
Ingredients (Serves 4-5) (1 cup = 250 ml)
Daliya (Broken Wheat) 1 cup
Moong Dal (Split Petite Yellow Lentil) ½ cup
Fresh Green Garlic 7-8 stems or Garlic 5-6 cloves
Carrot 1 medium
Potato 1 medium
Fresh Beans 1 cup (any kind – I use Fresh Green Gram)
Crushed Ginger 1 teaspoon
Crushed Green Chilies ½ teaspoon
Coriander Powder 1 teaspoon
Cumin Powder ½ teaspoon
Red Chili Powder ½ teaspoon
Pure Ghee / Clarified butter 2 tablespoon
Cumin Seeds ¼ teaspoon
Black Pepper 3-4
Cloves 3-4
Cinnamon 1 inch
Turmeric Powder ½ teaspoon
Asafoetida 2 pinch
Curry Leaves 10-12
Chopped coriander 2 teaspoon
Lemon Juice 1 teaspoon
Salt to taste
Instructions
1. Wash and soak Daliya (Broken Wheat) for 30 minutes. Wash and Drain Moong Dal and leave for 30 minutes.
2. Grind fresh Green Garlic into a smooth paste or crush Garlic cloves.
3. Chop Carrot and Potato into medium size pieces.
4. In a pan, heat Ghee. Add cumin seeds. Wait for splutter. Add Cloves, Black Pepper, Cinnamon, Turmeric Powder, Crushed Chilies, Crushed Ginger, Curry leaves and Asafoetida.
5. Add Vegetables and Saute for 3-4 minutes.
6. Drain Daliya and add to the pan. Add Moong Dal and saute for 4-5 minutes.
7. Simultaneously in a bowl, heat 4 cups of water; Let it come to boil.
8. Add boiling water to the pan. Mix.
9. Add Coriander powder, Cumin Powder, Red Chili Powder, Lemon juice, Salt, and chopped coriander. Cook covered on low flame. This Khichadi is of Porridge consistency. (I transfer the mixture to rice cooker and cook on Porridge mode). Khichadi get dry as it cools.
10. When Daliya is cooked, Khichadi is ready.
11. While serving add ½ spoon of pure Ghee on Khichadi and Serve it hot with Kadhi / Raita .
Note
1. Khichadi thickens as it gets cold. So it’s better enjoyed when it’s hot. In case you want to reheat it, sprinkle some water before reheating.
==================================================================================
फाडा खिचडी – दलिया खिचडी – चविष्ट आणि पौष्टिक खिचडी – तांदूळ न वापरता
फाडा खिचडी हा लोकप्रिय गुजराती प्रकार आहे. ह्यात गव्हाचा रवा (दलिया), मूग डाळ आणि भाज्या घालतात. तांदूळ अजिबात नसतो. ज्यांना तांदूळ वर्ज्य आहे त्यांच्यासाठी, मधुमेही लोकांसाठी हा उत्तम पर्याय आहे. बाकी सर्वांनाच हा चविष्ट खिचडीचा प्रकार आवडेल. ही खिचडी करण्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज आहेत. मी ही रेसिपी वापरते. ह्यात तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता. हिवाळ्यात मिळणारे ताजे दाणे घालू शकता. फक्त सगळ्या भाज्यांचे एकत्रित प्रमाण दलिया आणि मूग डाळीपेक्षा जास्त असावं. मी ह्यात कांदा घालत नाही. तुम्ही पाहिजे असल्यास कांदा उभा चिरून बाकी भाज्यांबरोबर किंवा तेलावर परतून घालू शकता. गरमागरम फॅड खिचडी साजूक तूप आणि कढीसोबत अप्रतिम लागते.
टीप
ही खिचडी गार झाल्यावर दाट होते. त्यामुळे गरम असतानाच खावी. नाहीतर परत गरम करताना थोडं पाणी शिंपडून गरम करावी.
साहित्य (४–५ जणांसाठी ) (१ कप = २५० मिली)
गव्हाचा रवा (दलिया) १ कप
मूग डाळ अर्धा कप
पातीची हिरवी लसूण ७–८ काड्या किंवा लसूण ५–६ पाकळ्या
गाजर १ मध्यम
बटाटा १ मध्यम
ओले दाणे कोणत्याही प्रकारचे १ कप (मी ओले हरभरे / सोलाणे घेते)
बारीक ठेचलेलं आलं १ चमचा
हिरवी मिरची ठेचून अर्धा चमचा
धने पावडर एक चमचा
जिरे पावडर अर्धा चमचा
लाल तिखट अर्धा चमचा
साजूक तूप २ चमचे
जिरं पाव चमचा
काळी मिरी ३–४
लवंग ३–४
दालचिनी १ इंचाचा तुकडा
हळद अर्धा चमचा
हिंग २ चिमूट
कढीपत्ता ८–१० पानं
लिंबाचा रस १ चमचा
चिरलेली कोथिंबीर २ चमचे
मीठ चवीनुसार
कृती
१. गव्हाचा रवा धुवून ३० मिनिटं पाण्यात भिजवून ठेवा. मूग डाळ धुवून, पाणी निथळून ३० मिनिटं ठेवा.
२. पातीची हिरवी लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. सुकी लसूण असेल तर ती ठेचून घ्या.
३. गाजर आणि बटाटे सोलून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या.
४. एका पातेल्यात तूप गरम करून त्यात जिरं, हिंग, कढीपत्त्याची फोडणी करा. फोडणीत आलं, लवंग, मिरी, दालचिनी, हिरवी मिरची आणि हळद घाला.
५. सगळ्या भाज्या घालून ३–४ मिनिटं परता.
६. गव्हाच्या रव्यातलं पाणी काढून टाका आणि रवा, मूग डाळ पातेल्यात घाला. ४–५ मिनिटं मंद आचेवर भाजून घ्या.
७. एकीकडे ४ कप पाणी गरम करत ठेवा.
८. पाणी उकळलं की पातेल्यात घाला.
९. धने – जिरे पावडर, लाल तिखट, लिंबाचा रस, मीठ, कोथिंबीर घालून मिक्स करा. झाकण ठेवून शिजवून घ्या.ही खिचडी ओलसर असते. त्यानुसार पाणी घालून शिजवून घ्या. मी हे मिश्रण राईस कुकर मध्ये घालून शिजवते. राईस कुकर मध्ये ओलसर खिचडी साठी Porridge चा ऑप्शन निवडा.
१०. गव्हाचा रवा शिजला की खिचडी तयार.
११. गरमगरम खिचडी वरून साजूक तूप घालून कढी / रायत्या बरोबर खायला द्या.
Your comments / feedback will help improve the recipes