Kalya Valachi Usal (काळ्या वालाची उसळ ) – Black Beans Subji

Kalya Valachi Usal (काळ्या वालाची उसळ )

Kalya Valachi Usal (काळ्या वालाची उसळ ) – Black Beans Subji

काळ्या वालाची उसळ मराठी

I’d bought Kale Val (Black Beans) from an exhibition. I did not even know what it was called. So posted the image on food groups and got to know it is called Kale Val (Black Beans) / Kale Police / Didgi and it is cooked like Rajma (Kidney Beans). It is also used in Mexican cuisine. So I made my own version of this subji. It turned out to be very tasty. Many people commented that these beans take very long to cook. So I cooked it for a long time and landed up overcooking it a bit. But no harm. It still tasted nice. I would suggest, for the first time don’t cook it for a long time. If it’s not cooked, you can cook it again. Second time onwards, your judgment won’t go wrong.

Ingredients (Serves 4) (1 cup = 250 ml)

Kale Val (Black Beans) 1 cup

Onions 2 medium finely chopped

Tomatoes 2 medium finely chopped

Garlic Cloves 5-6 crushed

Ginger ¾ inch crushed

Coriander Powder 1 teaspoon

Cumin Powder ½ teaspoon

Lemon Juice ½ teaspoon

Kashmiri Chili Powder 1 teaspoon

Sugar ½ teaspoon (adjust as per taste)

Cloves 3

Cinnamon 1 inch stick

Bay Leaf 1

Chopped Coriander leaves 2 teaspoon

Salt to taste

Pure Ghee (Clarified Butter) 2 teaspoon

Cumin Seeds (Jeera) ¼ teaspoon

Asafoetida (Hing) a pinch

Turmeric Powder ½ teaspoon

Instructions

1. Soak Kale Val (Black Beans) for 8 hours.

2. Add Cloves, Bay Leaf and Cinnamon to Chhole. Add water to level 2 inches above Beans level. Pressure cook till soft. After one whistle, pressure cook on simmer for 10-12 minutes.

3. In a pan, heat Ghee. Add Cumin Seeds, wait for splutter. Add Turmeric Powder and Asafoetida.

4. Add chopped onion. Add a pinch of salt. Saute for 2 minutes. Cook covered on low flame till onion is translucent. Add crushed Garlic and Ginger. Saute for 2 minutes.

5. Add chopped tomatoes. Cook covered on low flame till tomatoes are soft.

6. Add Coriander Powder, Cumin powder. Mix.

7. Add Kashmiri Chili Powder, Sugar, ¼ cup water and saute for 2-3 minutes.

8. Remove Cloves, Bay leaf and Cinnamon from cooked Beans and add Beans to the Pan along with the stock. (You can discard the stock if you don’t want the subji to be dark; but with the stock all the nutrients will be drained away).

9. Add Salt. Cook on low flame till you get right consistency of the gravy.

10. Add Lemon Juice, chopped Coriander and mix.

11. Serve hot with Indian bread (Roti, Paratha) Or Rice. It’s very tasty.

Kalya Valachi Usal (काळ्या वालाची उसळ )
Kalya Valachi Usal (काळ्या वालाची उसळ )
         ==================================================================================

काळ्या वालाची उसळ

महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून काळे वाल आणले होते. मला त्याचं नावही माहित नव्हतं. दोन फेसबुक ग्रुप मध्ये फोटो टाकून विचारलं हे काय आहे आणि कशी भाजी करतात ते. खूप साऱ्या टिप्पण्या आल्या. त्यात कळलं की हे काळे वाल / काळे पोलीस (हे नाव फार मजेशीर वाटलं) / दिडगा आहे. आणि ह्याची राजम्यासारखी उसळ करतात. मेक्सिकन पदार्थात ही हे Black Beans वापरले जातात. मग काय, माझ्या मनाप्रमाणे केली उसळ. छान झाली चवीला. ग्रुपवर वाचलं होतं की हे वाल शिजायला जास्त वेळ लागतो. म्हणून मी जास्त वेळ शिजवले. आणि वाल जरा जास्तच शिजले. पण काही हरकत नाही. कमी शिजल्यापेक्षा बरं नाही का. तुम्ही पहिल्यांदाच हे वाल वापरत असाल तर जरा कमी शिजवा. नंतर पाहिजे तर परत शिजवता येतील. आणि दुसऱ्या वेळेपासून तर तुमचा अंदाज चुकणार नाहीच.

मी वाल  शिजवताना त्यात लवंग, दालचिनी आणि तमालपत्र घातलं. त्यामुळे मसाल्याचा छान सुगंध येतो उसळीला.

साहित्य (४ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)

काळे वाल / काळे पोलीस दिडगा १ कप

कांदे २ मध्यम बारीक चिरून

टोमॅटो २ मध्यम बारीक चिरून

लसूण ५६ पाकळ्या कुटून

आलं पाऊण इंच कुटून

धने पावडर १ चमचा

जिरे पावडर अर्धा चमचा 

काश्मिरी लाल तिखट १ चमचा

लिंबाचा रस अर्धा चमचा

साखर अर्धा  चमचा (चवीप्रमाणे कमी/जास्त करा)

लवंगा ३

तमालपत्र १

दालचिनी १ इंचाचा तुकडा

चिरलेली कोथिंबीर २ चमचे

मीठ चवीनुसार

साजूक तूप २ टेबलस्पून

जिरं पाव  चमचा

हळद अर्धा चमचा

हिंग चिमूटभर

कृती

. काळे वाल धुवून ८ तास पाण्यात भिजवून ठेवा.

. वालांच्या  पातळीच्या २ इंच वर येईल एवढं पाणी घालून त्यात लवंग, दालचिनी, तमालपत्र घाला. प्रेशर कुकर मध्ये वाल  छान शिजवून घ्या. कूकरची एक शिटी झाल्यावर १०१२ मिनिटं मंद आचेवर कुकर ठेवून वाल शिजतील

. एका कढईत साजूक तूप घालून जिरं, हळद आणि हिंगाची फोडणी करा.

. चिरलेला कांदा घालून चिमूटभर मीठ घाला. २ मिनिटं परतून झाकण ठेवून मंद आचेवर कांदा पारदर्शक होईपर्यंत शिजवा. लसूण आणि आलं घालून २ मिनिटं परता.

. चिरलेला टोमॅटो घालून परता आणि झाकण ठेवून मंद आचेवर टोमॅटो नरम होईपर्यंत शिजवा

. धने, जिरे पावडर घालून २३ मिनिटं परता

. काश्मिरी लाल तिखट, साखर घालून घालून पाव कप पाणी घाला आणि २३ मिनिटं परता

. शिजलेल्या वालातील  लवंग, दालचिनी आणि तमालपत्र काढून टाका आणि वाल  पाण्यासकट कढईत घाला. (तुम्हाला काळी उसळ आवडत नसेल तर वालातलं पाणी काढून टाका; पण पाण्याबरोबर सगळी जीवनसत्व ही निघून जातील हे लक्षात घ्या).   

. मीठ घालून मंद आचेवर शिजवा. पाणी घालून रस्सा जेवढा दाट हवा असेल तसे शिजवा.

१०. लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या.

११. गरम गरम उसळ पोळी, पराठा / भाताबरोबर सर्व्ह करा. खूप छान लागते

Kalya Valachi Usal (काळ्या वालाची उसळ )
Kalya Valachi Usal (काळ्या वालाची उसळ )
    

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes