Navalkol Dhirde ( नवलकोल धिरडं ) – Kohlrabi Savory Pan Cake – My Innovative Recipe
My efforts to design healthy recipes have resulted into this tasty and healthy recipe using Navalkol (Alkol / Ganth Gobi / Kohlrabi / Knolkol / German Turnip). This can be a quick breakfast / snack / tiffin option. Tender Navalkol is very juicy but has very strong flavour. To manage this I add Fresh Green Garlic and Coriander. Both these flavours blend very well and resulted into a yummy snack. I add Besan (Gram Flour), Rice Flour and Semolina in the batter. As always, all the ingredients are available in the kitchen.
I make Subji, Salad and Soup using Navalkol. All these recipes are available on my blog.
Ingredients (Makes 5-6 Dhirde)
Navalkol (Alkol / Ganth Gobi / Kohlrabi) 1 medium
Bengal Gram flour (Besan) 4 tablespoon
Rice Flour 2 tablespoon
Fine Semolina 2 tablespoon
Crushed Green Chilies ½ teaspoon
Fresh Green Garlic 10-12 strands
Turmeric Powder ½ teaspoon
Chopped Coriander 4 tablespoon
Sesame Seeds 1 tablespoon
Salt to taste
Oil / Butter / Ghee (Clarified Butter) for pan frying
Instructions
1. Peel and Grate Navalkol.
2. Roughly chop Fresh Green Garlic. Grind Garlic and Coriander together in a fine paste.
3. In a bowl, Mix all ingredients except Oil / Ghee / Butter. Add water to make a medium consistency batter. Rest the batter for 10 minutes.
4. Heat a non-stick Griddle. Turn the gas to medium flame. Pour ¼ cup of batter on the griddle and spread it evenly.
5. Cover the griddle and cook for 2-3 minutes.
6. Remove the cover. If you see wet batter on the top on Dhirde, cook for a few more minutes. Pour a few drops of oil / ghee/ butter along the edges of Dhirde.
7. Flip Dhirde and cook the other side without cover.
8. When both sides are cooked, Dhirde is ready.
9. Serve hot with coriander chutney and /or tomato sauce. It tastes awesome with home made butter.
==================================================================================
नवलकोल धिरडं – माझी नाविन्यपूर्ण पाककृती
नवलकोल / अल्कोल / गांठ गोबी / kohlrabi / Knolkol / German Turnip ही कोबीसारख्या चवीची भाजी आहे पण फारशी खाल्ली जात नाही. मी नवलकोल ची भाजी, कोशिंबीर, सूप करते. नवनवीन पाककृती करून बघताना नवलकोल घालून ही छान पौष्टिक आणि चविष्ट धिरडी केली. नवलकोल ला जरा उग्र वास असतो तो कमी करण्यासाठी हिरवी पातीची लसूण आणि कोथिंबीर वाटून घातली. पीठ भिजवताना बेसन, तांदुळाचं पीठ आणि थोडा रवा घातला. धिरडी छान लुसलुशीत झाली. हा नवीन प्रकार नक्की करून बघा.
साहित्य (५–६ धिरड्यांसाठी)
नवलकोल १ मध्यम
पातीची हिरवी लसूण १०–१२ काड्या
चिरलेली कोथिंबीर ४ टेबलस्पून
ठेचलेली हिरवी मिरची अर्धा चमचा
बेसन ४ टेबलस्पून
तांदुळाचं पीठ २ टेबलस्पून
बारीक रवा २ टेबलस्पून
हळद अर्धा चमचा (हळद जास्त झाली तर रंग काळपट येतो)
तीळ १ टेबलस्पून
मीठ चवीनुसार
तेल/ तूप / बटर धिरडी भाजायला
कृती
१. नवलकोल सोलून किसून घ्या.
२. पातीची लसूण चिरून घ्या. लसूण आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
३. एका वाडग्यात वरील सर्व साहित्य (तेल / तूप / बटर वगळून ) एकत्र करा.
४. थोडं थोडं पाणी घालून मध्यम पातळ पीठ भिजवा (भज्यांच्या पिठासारखं). पीठ १० मिनिटं झाकून ठेवा.
५. नॉन स्टिक तवा गरम करून घ्या.
६. गॅस मध्यम करून पाव कप पीठ तव्यावर ओता. ओतताना कप गोल फिरवा आणि हाताने पीठ सारखं करा.
७. झाकण ठेवून २–३ मिनिटं भाजा. झाकण काढून बघा. ओलं पीठ धिरड्यावर दिसत असेल तर परत १–२ मिनिटं भाजा.
८. कडेनी थोडं तूप / तेल / बटर सोडा.
९. धिरडं परतून दुसरी बाजू झाकण न ठेवता भाजून घ्या.
१०. गरमगरम धिरडी चटणी / सॉस बरोबर खायला द्या. लोण्याबरोबर ही धिरडी अप्रतिम लागतात.
कॅनडामध्ये थंडीत नवलकोल खूप कमी मिळतात! मिळाले तेव्हा रेसिपी try केली! अतिशय सुंदर लागतात! Number oneEnjoyed! Thanks Sudha
Thank you Sunanda for the feedback. Happy to read your comment.
Sudha