Pongal – Ven Pongal – Khara Pongal (पोंगल – खारा पोंगल) – Rice and Yellow Lentil Kedgeree

Pongal - Ven Pongal (पोंगल - खारा पोंगल)

Pongal – Ven Pongal – Khara Pongal (पोंगल – खारा पोंगल) – Rice and Yellow Lentil Kedgeree

पोंगल – खारा पोंगल मराठी

Pongal is a South Indian Specialty similar to Moong Dal Khichadi in Maharashtra but with no spices except Black Pepper. This is also called Ven Pongal / Khara Pongal as this is not sweet (there is Sweet Pongal – Sakkarai Pongal also). Khara Pongal is generally served for Breakfast with Sambhar. It’s very healthy and easy recipe. There are different recipes of Pongal. I follow this recipe that uses minimum ingredients. Some people like Pongal with Porridge consistency; some like it little thicker than Porridge. But definitely it’s not like Pulav. So adjust water accordingly while cooking. I cook it for meal and not for breakfast. I don’t add Turmeric Powder to Pongal but if you want, you can add it.

Ingredients (Serves 2) (1 cup = 250 ml)

Rice ½ cup

Moong Dal (Split Petite Yellow Lentil) ¼ cup

Pure Ghee / Clarified butter 2 tablespoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Black Pepper 8-10

Asafoetida a pinch

Lemon Juice ½ teaspoon

Cashew Nuts 8-10 chopped into medium size pieces

Salt to taste

Instructions

1. Wash and Drain Rice and leave for 30 minutes. Wash and Drain Moong Dal and leave for 30 minutes.

2. In a pan, heat 1 teaspoon of Ghee. Add cumin seeds. Wait for splutter. Add Black Pepper and Asafoetida.

3. Add Rice, Moong Dal and saute on low flame for 4-5 minutes.

4. Simultaneously in a bowl, heat 2 cups of water; Let it come to boil.

5. Add boiling water to the pan. Mix.

6. Add Lemon juice, Salt. Cook covered on low flame. Or Pressure Cook it.

7. If Pongal is dry, add water to get required consistency. Heat one teaspoon of Ghee. Add cashew nuts. Saute on low flame till light brown. Add Cashew Nuts along with Ghee to Cooked Pongal.

8. While serving add ½ spoon of pure Ghee on Pongal and Serve it hot with Sambhar.

Pongal – Ven Pongal (पोंगल – खारा पोंगल)
Pongal – Ven Pongal (पोंगल – खारा पोंगल)

==================================================================================

पोंगल – खारा पोंगल

पोंगल हा आपल्या मूगडाळीच्या खिचडीसारखा दक्षिण भारतीय प्रकार आहे. पण पोंगल मध्ये काळी मिरीशिवाय दुसरा काही मसाला नसतो. काहीजण आलं आणि हिरवी मिरची घालतातह्याला खारा पोंगल सुद्धा म्हणतात (कारण हा गोड नसतो स्वीट पोंगल – sakkarai Pongal सारखा). हा तिथे सकाळच्या नाश्त्यात खाल्ला जातो. मी मात्र जेवण म्हणून बनवते आणि फक्त काळी मिरी घालून करते. बाकी काही मसाले घालत नाही. हळद सुद्धा नाही. काहीजण पोंगल अगदी मऊ भातसारखा मऊ  करतात तर काही मऊ खिचडीसारखा. आपापल्या आवडीप्रमाणे करू शकता. पण नक्कीच पुलावासारखा मोकळा नसतो. शिजवताना त्याप्रमाणात पाणी घालावंसाजूक तुपात तळलेले काजूगर वर पेरून हा पोंगल फारच छान लागतो. फक्त साजूक तुपासोबत खाल्ला तर आजारी माणसाला पण खायला चालेल असा सात्विक पदार्थनक्की करून बघा

साहित्य (२ जणांसाठी ) (१ कप = २५० मिली)

तांदूळ अर्धा  कप

मूग डाळ पाव कप

साजूक तूप २ टेबलस्पून 

जिरं पाव टीस्पून

हिंग चिमूटभर

काळी मिरी ८१०

लिंबाचा रस अर्धा टीस्पून

काजूगर  ८१०  तुकडे करून

मीठ चवीनुसार

कृती

. तांदूळ आणि मूग डाळ वेगवेगळी धुवून पाणी निथळून अर्धा तास झाकून ठेवा.

. एका पातेल्यात १ टेबलस्पून साजूक तूप गरम करून त्यात जिरं हिंगाची फोडणी करून घ्या. फोडणीत मिरी घाला.

. पातेल्यात तांदूळ आणि मूग डाळ घालून मंद आचेवर ४५ मिनिटं परता.

. दुसरीकडे २ कप पाणी गरम करायला ठेवा.

. पाणी उकळलं की पातेल्यात घाला. लिंबाचा रस आणि मीठ घालून ढवळून घ्या.

. आता हवं असेल तर पातेलं प्रेशर कुकर मध्ये ठेवून पोंगल शिजवू शकता किंवा पातेलं गॅसवर ठेवून झाकण ठेवून शिजवू शकता.

. पोंगल सुकं झालं तर थोडं पाणी घाला.

. १ टेबलस्पून साजूक तूप गरम करून त्यात काजूचे तुकडे गुलाबी रंगावर परतून घ्या आणि तुपासकट पोंगल मध्ये घाला

. मऊसर गरमगरम पोंगल वर साजूक तूप घालून सांबार सोबत खायला घ्या आणि तृप्त व्हा

Pongal – Ven Pongal (पोंगल – खारा पोंगल)
Pongal – Ven Pongal (पोंगल – खारा पोंगल)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes