Meduvada Sambar ( मेदूवडा सांबार) – South Indian Specialty Meduvada and Sambar

Meduvada Sambar ( मेदूवडा सांबार)

Meduvada Sambar ( मेदूवडा सांबार) – South Indian Specialty Meduvada and Sambar

मेदूवडा सांबार मराठी

Meduvada is popular South Indian Snack. Recipe for this is very easy. Soak Split Black Gram (Udad Daal) for 4-5 hours. Grind (little coarse) it with very little water. Beat the batter with a spoon till batter is light. Add salt and a spoonful of hot oil. Mix well and Deep Fry small round balls in hot Oil on medium flame. Ideally Meduvada has a hole in the centre. With little practice one can master this. But in case, you can’t make Meduvada with a hole, make small Vadas without hole.

In southern India, Sambar is served with different snacks like Idli, Meduvada, Dosa and Pongal. It’s also served with Rice. Main ingredient in Sambar is Split Pigeon Peas (Toor/ Tuvar Dal). One can add veggies of one’s choice. Some recipes have onions and tomatoes; while some don’t have. An important ingredient in Sambar is Sambar Masala (I generally buy it from market as we don’t make Sambar that often).

Sambar made in Tamil Nadu does not have Jaggery whereas Udipi recipe of Sambar has Jaggery for little sweet taste. We don’t like Sambar with Jaggery. This is the recipe I use for making Sambar. It makes yummy Sambar.

Sambar Ingredients (Serves 4) (1 cup = 250 ml)

Split Pigeon Peas (Toor/ Tuvar Daal) ¾ cup

Onion 2 medium

Tomatoes 2 medium

Drumsticks 2

Sambar Masala 3-4 teaspoon

Chopped Coriander 1 teaspoon

Tamarind Pulp 1 tablespoon

Oil 1 tablespoon

Mustard Seeds ¼ teaspoon

Cumin Seeds (Jeera) ¼ teaspoon

Turmeric Powder ½ teaspoon

Asafoetida (Hing) 2 pinch

Curry Leaves 8-10

Red Chilies 3-4

Salt to taste

Instructions

1. Wash and cook Split Pigeon Peas (Tuvar Daal) till soft.

2. Chop onions and tomatoes into thin slices.

3. Wash and cut Drumsticks into 3 inch pieces. Add 1 cup of water to drumsticks, a pinch of salt and cook on low flame till drumsticks are soft.

4. In a deep pan, heat 1 teaspoon of oil. Add slit red chilies. Add sliced onions, curry leaves, a pinch of salt and saute on low flame for 3 minutes.

5. Add Tamarind pulp and ½ cup water. Cook covered on low flame till onions are soft.

6. Add sliced tomatoes and saute for 2 minutes.

7. Mash cooked Split Pigeon Peas with a spatula and add to the pan.

8. Add water and mix. Let the mixture come to boil.

9. Add drumsticks along with stock, salt, Sambar Masala and mix. Sambar thickens when you add Sambar Masala. Add water to adjust consistency.

10. In a ladle, heat remaining Oil for tempering. Add mustard seeds, wait for splutter; add cumin seeds, wait for splutter; add Turmeric Powder, Asafoetida.

11. Pour tempering in the pan. Boil the mixture for 5 minutes. Add chopped coriander.

Sambar ( सांबार)

12. Tasty Sambar is ready. Serve hot with Idli, Dosa, Meduvada or with Rice.

Meduvada Sambar ( मेदूवडा सांबार)
Meduvada Sambar ( मेदूवडा सांबार)
     ==================================================================================

मेदूवडा सांबार लोकप्रिय दक्षिण भारतीय नाश्ता

मेदूवडा सांबार हा चविष्ट आणि पोटभरीचा लोकप्रिय दक्षिण भारतीय नाश्ता आहे. करायलाही सोपा आहे. फक्त मेदुवडे तळायला जरा वेळ लागतो.

मेदूवड्यासाठी उडीद डाळ ४५ तास भिजवून अगदी कमी पाणी घालून किंचित जाडसर वाटतात. वाटलेली डाळ डावाने फेटून हलकी करतात. त्यात चवीप्रमाणे मीठ आणि चमचाभर कडकडीत तेल घालून गरम तेलात वडे तळतात. थोड्या सरावाने मध्ये भोक असलेले मेदुवडे करता येतात. नाही जमले तर भोक नसलेले छोटे छोटे वडे करू शकता.

बहुतेक सर्व दक्षिण भारतीय नाश्यासोबत सांबार दिला जातो. अतिशय चविष्ट आणि पौष्टिक प्रकार आहे हा. ह्यातला  मुख्य जिन्नस म्हणजे तूर डाळ. तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता. सांबारची चव सांबार मसाल्यामुळे येते. आमच्या घरी नेहमी सांबार होत नाही त्यामुळे मी सांबार मसाला घरी न बनवता तयार मसाला आणते. तामिळनाडू मध्ये बनवला जाणारा सांबार गूळ न घालता बनतो तर उडिपी सांबारात थोडा गूळ घालतात त्यामुळे जरा गोडूस लागतो. मी  गूळ न घालता सांबार करते. सांबारच्या वेगवेगळ्या रेसिपीज उपलब्ध आहेत. पण मी ही रेसिपी वापरते. त्याने खूप चविष्ट सांबार बनतो.   

सांबार साहित्य (४ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)

तूरडाळ पाऊण कप

कांदे २ मध्यम

टोमॅटो २ मध्यम

शेवग्याच्या शेंगा २

सांबार मसाला ३४ टेबलस्पून

चिंचेचा कोळ १ टेबलस्पून

कढीपत्ता ८१०

लाल मिरच्या ३

चिरलेली कोथिंबीर १ चमचा

तेल १ टेबलस्पून

मोहरी पाव चमचा

जिरं पाव  चमचा

हळद अर्धा चमचा

हिंग २ चिमूट

मीठ चवीनुसार

कृती

. तूरडाळ धुवून शिजवून घ्या.

. शेवग्याच्या शेंगा धुवून २३ इंचाचे तुकडे करा. थोडं पाणी आणि चिमूटभर मीठ घालून शेंगा नरम होईपर्यंत शिजवून घ्या.

. कांदा उभा पातळ चिरून घ्या.

. टोमॅटोचे जरा लांबट पातळ तुकडे करा.

. एका कढईत १ चमचा तेल घालून त्यात चीर दिलेल्या लाल मिरच्या घाला. कांदा, कढीपत्ता  आणि चिमूटभर मीठ घालून ३ मिनिटं मंद आचेवर परतून घ्या.

. चिंचेचा कोळ आणि अर्धा कप पाणी घालून झाकण ठेवून कांदा नरम होईपर्यंत शिजवून घ्या.

. चिरलेला टोमॅटो घालून ३ मिनिटं परतून घ्या.

. शिजलेली तूरडाळ डावाने मऊ करून घ्या आणि कढईत घाला. जरुरीनुसार पाणी घालून एक उकळी काढा.

. शिजलेल्या शेवग्याच्या शेंगा उरलेल्या पाण्यासकट कढईत घाला. मीठ, सांबार मसाला घाला. मसाला घातल्यावर सांबार आळतो (दाट होतो); म्हणून जरुरीप्रमाणे पाणी घालून उकळी काढा.

१०. छोट्या कढल्यात उरलेलं तेल गरम करून मोहरी, जिरं, हिंग, हळद घालून खमंग फोडणी करा आणि कढईत ओता.

११. मिश्रण ५ मिनिटं उकळवा. चिरलेली कोथिंबीर घाला.

Sambar ( सांबार)

१२. चविष्ट सांबार तयार आहे. गरम सांबार इडली, डोसा, मेदूवडा किंवा भातासोबत खायला द्या.   

Meduvada Sambar ( मेदूवडा सांबार)
Meduvada Sambar ( मेदूवडा सांबार)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes