Papdachi Bhaaji (पापडाची भाजी) – Papad Subji

Papdachi Bhaaji (पापडाची भाजी)

Papdachi Bhaaji (पापडाची भाजी) – Papad Subji without Onion Garlic

पापडाची भाजी मराठी

This subji is Gujarati / Rajasthani specialty made from Raw Udid (Urad) Papad. When there is no fresh vegetable available, this is one of the tasty option for subji. This subji was made by my Daughter-in-law Mansi. It was super yummy. We all liked it. It’s an easy recipe using ingredients generally available in kitchen. One can relish this subji with Roti or Rice. In case you want to have it with Rice, make it like curry.

Ingredients (Serves 3) (1 cup = 250 ml)

Urad Papad 5

Curd ¾ cup

Green Chilies 2 (chopped into big pieces with a slit in centre)

Crushed Ginger ½ teaspoon

Kasuri Methi 1 teaspoon

Coriander Powder 1 teaspoon

Cumin Powder ¾ teaspoon

Chopped Coriander 1 teaspoon

Oil 1 tablespoon

Mustard Seeds ¼ teaspoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Asafoetida a pinch

Turmeric Powder ½ teaspoon

Curry Leaves 7-8

Salt to taste

Instructions

1. Churn curd into buttermilk. Add 1.5 cups of water and ¼ teaspoon salt.

2. In a Pan, heat oil.

3. Add Mustard Seeds, wait for splutter; Add cumin Seeds, wait for splutter; Add Turmeric Powder, Asafoetida and Curry Leaves.

4. Add Crushed Ginger; Saute for 2 minutes.

5. Add Green Chilies; Saute for 1 minute.

6. Add Buttermilk; heat on simmer and allow to boil.

7. Add Coriander powder and Cumin Powder. Mix.

8. Make 4 pieces of each Papad and add to the Pan separately so that pieces won’t stick together. Cook for 2-3 minutes.

9. Add Salt to taste.

10. If you want to have the subji with Roti, boil it a bit to make thick gravy. To have it with Rice, thin consistency gravy is good.

10. Add Chopped coriander and Kasuri Methi. Mix.

11. Enjoy steaming hot Papad Bhaaji with Roti / Rice. It’s yummy.

Note:

1. Bhaaji will become thick when it gets cool. If you want to reheat it, add some water.

2. Some variety of Urad Papad melts in Bhaaji. We use Lijjat Urad Papad for this Bhaaji.

Papdachi Bhaaji (पापडाची भाजी)
Papdachi Bhaaji (पापडाची भाजी)
      ==================================================================================

पापडाची भाजी गुजरात / राजस्थान ची स्पेशालिटी – कांदा लसूण न घालता

ही भाजी गुजरात / राजस्थान ची स्पेशालिटी आहे. कच्च्या उडदाच्या पापडापासून ही भाजी केली जाते. जेव्हा ताज्या भाज्या मिळत नाहीत तेव्हा हा भाजीचा चविष्ट पर्याय असतो. ही भाजी माझ्या सुनेनं मानसीनं केली आहे. खूप टेस्टी असते ही भाजी. आम्हाला खूप आवडली. रेसिपी सोपी आहे आणि घरात नेहमी असणारं साहित्य वापरून केली आहे. ही भाजी तुम्ही पोळी किंवा भाताबरोबर खाऊ शकता. भाताबरोबर खाण्यासाठी भाजीत थोडा रस ठेवा. भाजी गार झाल्यावर दाट होते त्यामुळे भाजी करताना जरा पातळ रस ठेवा आणि शक्यतो गरम असतानाच खा

साहित्य (३ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)

कच्चे उडीद पापड ५

दही पाऊण कप

हिरव्या मिरच्या २ (मोठे तुकडे करून आणि मधे चीर देऊन)

ठेचलेलं आलं अर्धा टीस्पून

कसुरी मेथी १ टीस्पून

धने पावडर १ टीस्पून

जिरे पावडर पाऊण टीस्पून

चिरलेली कोथिंबीर १ टीस्पून

तेल १ टेबलस्पून

मोहरी पाव टीस्पून

जिरं पाव टीस्पून

हिंग १ चिमूट

हळद अर्धा टीस्पून

कढीपत्ता ७

मीठ चवीनुसार

कृती

. दही घुसळून घ्या. दीड कप पाणी आणि पाव चमचा मीठ घालून एकजीव करा

. एका कढईत तेल गरम करून मोहरी, जिरं, हळद, हिंग आणि कढीपत्ता घालून खमंग फोडणी करा.   

. ठेचलेलं आलं घालून २ मिनिटं परता

. हिरव्या मिरच्या घालून १ मिनिट परता.

. ताक घालून मंद आचेवर ढवळत राहा आणि उकळी काढा

. धने, जिरे पावडर घालून ढवळून घ्या.

. प्रत्येक पापडाचे ४ तुकडे करून एक एक तुकडा कढईत घाला. एकदम सगळे तुकडे घालू नका. गुठळ्या होतील. २ मिनिटं उकळी काढा

. चवीनुसार मीठ घाला

. भाजी जशी दाट / पातळ हवी असेल त्यानुसार आटवा / पाणी घाला. भाताबरोबर खायची असेल तर रस जरा पातळ ठेवा

१०. कोथिंबीर घाला. कसुरी मेथी चुरडून घाला.

११. पापडाची गरमागरम भाजी पोळी / भाताबरोबर खायला द्या

टीप

. ही भाजी गार झाल्यावर दाट होते. भाजी परत गरम करताना थोडं पाणी मारून गरम करा.

. काही प्रकारचे पापड भाजीत विरघळतात. आम्ही लिज्जत चे उडदाचे पापड वापरतो

Papdachi Bhaaji (पापडाची भाजी)
Papdachi Bhaaji (पापडाची भाजी)

1 Comment

Your comments / feedback will help improve the recipes