Sweet Corn Veg Soup (स्वीट कॉर्न व्हेज सूप)

Sweet Corn Veg Soup (स्वीट कॉर्न व्हेज सूप)

Sweet Corn Veg Soup (स्वीट कॉर्न व्हेज सूप)

स्वीट कॉर्न व्हेज सूप मराठी

Sweet Corn soup that you get in restaurants has lot of corn flour (corn starch) and very little sweet corn. Try this recipe that has lots of fresh sweet corn. This soup has yellowish colour because of sweet corn paste. It’s very easy and makes delicious, healthy soup.

Ingredients (Serves 4-5) (1 cup = 250 ml)

Sweet Corn 1.25 cup

Lemon juice ½ tablespoon (if you use Cottage Cheese Whey then don’t add lemon juice)

Carrots 1 medium size

Chopped French Beans ½ cup

Corn flour / Corn starch 1 tablespoon

Garlic Cloves 4-5 chopped into medium size pieces

Ghee (Clarified Butter) / Butter 1 Teaspoon

Black Pepper to taste

Black Salt to taste

Instructions

1. Wash, Peel and chop carrots in small cubes.

2. Wash and chop french beans in small pieces.

3. Boil carrots in water and cook till little soft. Don’t overcook. I cook it in microwave on high power for 3 minutes after adding water just enough to cover carrot cubes.

4. Boil french beans in water and cook till little soft. Don’t overcook. I cook it in microwave on high power for 8-9 minutes after adding water just enough to cover the beans.

5. Cook sweet corn – either in microwave for 4 minutes on high or using any other method; leave it to cool.

6. Using a grinder, Grind ½ cup sweet corn into a fine paste.

7. In a deep pan, Heat Ghee / Butter. Add Garlic Pieces; saute till light brown. Add sweet corn paste, cooked sweet corn, carrots and french beans. Add lemon juice.

8. Add water as required; bring it to boil.

9. Mix corn flour (corn starch) in 2 tablespoon of water and add to the pan.

10. Add salt and black pepper. Boil the mixture for 5 minutes.

11. Delicious soup is ready. Serve hot.

Note

1. Instead of water, you can use Cottage Cheese Whey / Paneer water (water that gets separated when you make Cottage Cheese from Milk). Soup tastes better with this.

2. You can add any other veggies of your choice. Cook them separately and mix with other ingredients in step 7.

Sweet Corn Veg Soup (स्वीट कॉर्न व्हेज सूप)
Sweet Corn Veg Soup (स्वीट कॉर्न व्हेज सूप)
       ==================================================================================

स्वीट कॉर्न व्हेज सूप

रेस्टोरंट मध्ये मिळणारं स्वीट कॉर्न सूप हे कॉर्न फ्लोअर (कॉर्न स्टार्च) घालून बनवलेलं असतं. त्यात नावालाच स्वीट कॉर्न असतात. हे सूप स्वीट कॉर्न वापरून केलेलं आहे. मक्याचे दाणे शिजवून मिक्सरमध्ये बारीक करून घातले आहेत. तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या भाज्या घालू शकता. मी गाजर, फरसबी आणि मक्याचे दाणे घालते. चमचाभर कॉर्न फ्लोअर (कॉर्न स्टार्च) पाण्यात मिसळून सूप दाट होण्यासाठी घातलंय. चवीसाठी लसूण, काळी मिरी, काळं मीठ आणि लिंबू. अगदी चविष्ट आणि पौष्टिक सूप होतं.

सुपात पाण्याऐवजी पनीर करताना वेगळं केलेलं दुधाचं पाणी घातलं तर सूप आणखी चविष्ट होतं.

साहित्य (५ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)

स्वीट कॉर्न सव्वा कप

गाजर १ मध्यम बारीक तुकडे करून

बारीक चिरलेली फरसबी अर्धा कप

लिंबाचा रस अर्धा टीस्पून (पनीरचं पाणी घातलं तर लिंबाचा रस घालू नका)

साजूक तूप / बटर १ टीस्पून

लसूण ४५ पाकळ्या तुकडे करून

काळं मीठ चवीनुसार

काळी मिरी पावडर चवीनुसार

कॉर्न फ्लोअर (कॉर्न स्टार्च) १ टेबलस्पून

कृती

. गाजराचे तुकडे थोडं पाणी घालून जरा मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. जास्त शिजवू नका. (मायक्रोवेव्ह मध्ये हाय पॉवर वर ३ मिनिटं शिजवा. शिजवताना भांड्यात गाजराचे तुकडे बुडतील एवढंच पाणी घाला.)

. फरसबीचे  तुकडे थोडं पाणी घालून जरा मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. जास्त शिजवू नका. (मायक्रोवेव्ह मध्ये हाय पॉवर वर ८९ मिनिटं शिजवा. शिजवताना भांड्यात फरसबीचे  तुकडे बुडतील एवढंच पाणी घाला.) 

. मक्याचे दाणे थोडं पाणी घालून शिजवून घ्या. (मायक्रोवेव्ह मध्ये हाय पॉवर वर ४ मिनिटं शिजवा. शिजवताना भांड्यात दाणे बुडतील एवढंच पाणी घाला.) 

. मक्याचे दाणे गार झाले की अर्धे दाणे मिक्सरमध्ये फिरवून बारीक वाटून घ्या.

. एका पातेल्यात तूप / बटर गरम करून त्यात लसूण घालून गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्या.

. आता पातेल्यात वाटलेले मक्याचे दाणे, शिजवलेलं गाजर, फरसबी आणि मक्याचे दाणे घाला. लिंबाचा रस घाला.

. जरुरीप्रमाणे  पाणी घालून उकळी काढा.

. कॉर्न फ्लोअर (कॉर्न स्टार्च) २ टेबलस्पून पाण्यात मिसळून ते पाणी पातेल्यात घाला.

. काळं मीठ आणि काळी मिरी पावडर घाला. सूप हवं तेवढं दाट झालं की गॅस बंद करा.

१०. स्वादिष्ट स्वीट कॉर्न व्हेज सूप तयार आहे. गरमगरम सूप सर्व्ह करा.

टीप

. ह्या सुपात पाण्याऐवजी पनीरचं पाणी घालू शकता (दुधापासून पनीर करताना जे पाणी वेगळं होतं ते ).

. तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता. भाज्या चिरून शिजवून स्टेप ६ मध्ये बाकीच्या भाज्यांसोबत पातेल्यात घाला.

Sweet Corn Veg Soup (स्वीट कॉर्न व्हेज सूप)
Sweet Corn Veg Soup (स्वीट कॉर्न व्हेज सूप)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes