Kairi Kandyachi Chutney (कैरी कांद्याची चटणी) – Raw Mango Onion Chutney
During summer when Raw mangoes are available, this is the most preferred option for Chutney. My mother used to make this yummy Chutney often. Main ingredients of this chutney are Raw Mango and Onion. Other ingredients Jaggery, Salt, Cumin Powder, Red Chilies are always available in Indian Kitchen. After the chutney is ready, tempering of Oil, mustard seeds and Asafoetida is poured on it to make the Chutney super yummy.
Ingredients
Raw Mango 1 small
Onions 2 medium
Jaggery about 1 tablespoon (adjust as per taste)
Dry red Chilies 3-4
Roasted Cumin Powder ½ teaspoon
Salt to taste
for Tempering
Oil 1 teaspoon
Mustard seeds ¼ teaspoon
Cumin seeds ¼ teaspoon (optional)
Asafoetida (Hing) 1 pinch
Instructions
1. Peel Raw mangoes, Onions and chop into medium size pieces.
2. Transfer the pieces to a Grinder. Add Red Chilies, Jaggery, Salt and Cumin Powder.
3. Grind into a smooth paste. Add little water if required. Chutney should be thicker than Tomato Sauce. Transfer it to a bowl.
4. In a ladle, heat oil. Add mustard seeds; wait till crackles. Add cumin seeds; wait till crackles. Add Asafoetida. Pour this tempering onto the Chutney.
5. Yummy Chutney is ready. Serve it with Thepla, Roti, Dhokla, Indian Crepe, Indian Pan Cake.
==================================================================================
कैरी कांद्याची चटणी
उन्हाळ्यात कैऱ्या मिळायला लागल्यावर ही चटणी करावीच लागते. नेहमीच्या नारळ / डाळ्याच्या चटणीऐवजी थोडी वेगळ्या चवीची पण अतिशय चवदार चटणी आमच्याकडे सगळ्यांना खूप आवडते. माझ्या आईच्या हातच्या चटणीची चव अजून जिभेवर आहे. कैरी आणली की बाकीचं साहित्य नेहमीचंच आहे – कांदा, सुक्या लाल मिरच्या, गूळ, मीठ आणि जिऱ्याची पूड. चटणी वाटल्यावर छान खमंग फोडणी घालायची आणि चविष्ट चटणी कशाही सोबत खायची. खूपच छान लागते.
साहित्य
कैरी १ लहान
कांदे २ मध्यम
सुक्या लाल मिरच्या ३–४
चिरलेला गूळ अंदाजे १ टेबलस्पून (चवीप्रमाणे कमी जास्त करा)
भाजलेल्या जिऱ्याची पूड अर्धा टीस्पून
मीठ चवीनुसार
फोडणीसाठी
तेल १ टीस्पून
मोहरी पाव टीस्पून
जिरं पाव टीस्पून (ऐच्छिक)
हिंग चिमूटभर
कृती
१. कैरी आणि कांदे सोलून मध्यम आकाराच्या फोडी करून घ्या.
२. मिक्सरच्या भांड्यात कैरी, कांदे, गूळ, मिरच्या, मीठ आणि जिरेपूड घालून बारीक वाटून घ्या. जरूर पडल्यास थोडं पाणी घाला.
३. चटणी एका वाडग्यात काढून घ्या.
४. एका कढल्यात तेल गरम करून मोहरी, जिरं आणि हिंगाची खमंग फोडणी करून ती चटणीवर ओता.
५. चविष्ट चटणी तयार आहे. पोळी, भाकरी, ठेपला, घावन, धिरडं, ढोकळा कशाची सोबत छान लागते.
Your comments / feedback will help improve the recipes