Alakudichi Farali Kachori Appe (अळकुडीची फराळी कचोरी – आप्पे पॅन मध्ये ) – Pan Fried Colocasia Croquette
अळकुडीची फराळी कचोरी – आप्पे पॅन मध्ये मराठी
Farali Kachori is a popular snack that we have on Fasting days. It is also called Farali Pattice in some places. This is variation of Farali Kachori where I use Colocasia (Arbi / Alakidu) for outer cover instead of Potatoes. Boiled Colocasia is mixed with Tapioca Flour for binding. The filling is fresh scraped coconut, crushed roasted peanuts, coriander and chili powder. In Traditional recipe Kachori is deep fried. But I make them in Appe Pan (kind of pan fried). So this is a healthier non-oily version of Farali Kachori. It tastes awesome.
Ingredients (Serves 4) (1 cup = 250 ml)
Colocasia / Arbi / Alkudi 750 gms
Sabudana / Sago/ Tapioca Flour 4-5 tablespoon (you may need more/less if colocasia is too sticky)
Fresh scraped coconut 1.5 cup
Crushed roasted peanuts ½ cup
Chopped coriander 3 tablespoon
Green Chili Paste ¾ teaspoon
Cumin Seeds ½ teaspoon
Chili Powder 1 teaspoon
Mango Powder (Aamchoor) ½ teaspoon
Kokam 7-8
Sugar 1 teaspoon
Oil / Ghee (Clarified butter) for pan frying
Salt to taste
Instructions
1. Wash Colocasia. Transfer them into a pressure cooker. Add kokam and salt. Pressure cook till Colocasia is soft (simmer for 5-7 minutes after 1 whistle)
2. Upon cooling, peel and grate Colocasia. Discard kokam.
3. Add 3 tablespoon of Tapioca flour, cumin seeds, Green chili paste, salt (remember we had added salt while boiling Colocasia) and bind a semi soft dough. If dough is too sticky, you may need to add more flour. Use little oil / ghee while binding the dough.
4. For the stuffing, take fresh scraped coconut in a bowl.
5. Add crushed roasted peanuts, coriander, chili powder, mango powder, salt and sugar. Mix together. Stuffing is ready.
6. Apply little oil / ghee to your palms and make small lemon size balls of the dough.
7. Using your fingers, make a hollow cup of the dough ball. Stuff a spoonful of stuffing and seal the edges properly. Stuff all the dough balls this way.
8. Heat Appe Pan. Grease the Grooves with some oil.
9. Place one stuffed ball in each groove. Drop some oil in each groove.
10.Cook covered for 2-3 minutes on medium flame.
11. Flip over each Kachori. Drop some oil and cook covered for 2-3 minutes.
12. Serve hot with choice of chutney.
==================================================================================
अळकुडीची फराळी कचोरी – आप्पे पॅन मध्ये
उपासाच्या दिवशी आपण बटाटेच जास्त खातो. त्याऐवजी अळकुडी वापरून मी फराळी कचोरी करते. अळकुडीची छान चव येते कचोरीला. आणि मी ही कचोरी आप्पे पॅन मध्ये करते. अगदी कमी तेल/तूप लागतं. आवरणासाठी उकडलेल्या अळकुड्या कुस्करून त्यात साबुदाण्याचं पीठ घालते (तुम्ही उपासाची भाजणी किंवा वरी, राजगिरा पीठ घालू शकता). सारण खरवडलेला नारळ, दाण्याचं कूट, कोथिंबीर, लाल तिखट, आमचूर, मीठ, साखर घालून करते. गरमगरम कचोरी नारळाच्या चटणी सोबत अगदी चविष्ट लागते. आणि तळलेली नसल्यामुळे अगदी चिंता न करता खाता येते.
साहित्य (४ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)
अळकुड्या पाऊण किलो
साबुदाणा पीठ ४–५ टेबलस्पून (अळकुड्यांच्या चिकटपणानुसार कमी /जास्त लागेल)
खवलेला नारळ दीड कप
भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट अर्धा कप
चिरलेली कोथिंबीर ३ टेबलस्पून
लाल तिखट १ टीस्पून
आमचूर अर्धा टीस्पून
साखर १ टीस्पून
ठेचलेली हिरवी मिरची पाऊण टीस्पून
जिरं अर्धा टीस्पून
कोकम ७–८
मीठ चवीनुसार
तेल / तूप आप्पे पॅन मध्ये घालायला
कृती
१. अळकुड्या धुवून, मीठ आणि कोकम घालून प्रेशर कुकर मध्ये शिजवून घ्या. १ शिटी झाल्यावर ५–७ मिनिटं मंद आचेवर कुकर ठेवून अळकुड्या शिजतात.
२. गार झाल्यावर अळकुड्या सोलून किसून घ्या. कोकम टाकून द्या.
३. थोडं थोडं साबुदाणा पीठ, ठेचलेली हिरवी मिरची,जिरं आणि थोडं मीठ (आपण अळकुड्या शिजवताना मीठ घातलंय) घालून मध्यम सैल पीठ भिजवून घ्या. लागल्यास थोडे तेल/तूप घाला.
४. सारणासाठी एका वाडग्यात नारळ, दाण्याचं कूट, कोथिंबीर, साखर, लाल तिखट, आमचूर, मीठ एकत्र करा. सारण तयार झाले.
५. पिठाचे लिंबाच्या आकाराचे गोळे करून त्यात चमचाभर सारण भरून गोळा नीट बंद करा.तुमच्या आप्पे पॅन च्या आकारानुसार कचोरी बनवा.
६. आप्पे पॅन गरम करून प्रत्येक खाचेत २ थेम्ब तेल / तूप घाला. प्रत्येक खाचेत एक एक कचोरी ठेवून वरून २ थेम्ब तेल / तूप घाला.
७. झाकण ठेवून मध्यम आचेवर २–३ मिनिटं भाजा. आता कचोरी परतून दुसरी बाजूही छान सोनेरी रंगावर भाजून घ्या.
८. गरम गरम कचोरी नारळाच्या चटणी सोबत खायला द्या.
Trying out the first comment using google