Amba Dal / Kairi Dal (आंब्याची डाळ) – Yummy snack using Raw mango

Amba Dal / Kairi Dal (आंब्याची डाळ)
Amba Dal / Kairi Dal (आंब्याची डाळ)

Amba Dal / Kairi Dal (आंब्याची डाळ) Yummy snack using Raw mango

आंब्याची डाळ मराठी

This is Maharashtrian specialty made from Raw Mango and Split Chickpeas (Chana Dal). This does not require any cooking. This is no Onion, Garlic dish. Amba Dal can be served as a side dish or one can eat it with Roti / Chapati or one can have it as it is. It is a quick, easy and yummy dish.

Ingredients (Serves 4) (1 cup = 250 ml)

Split Chickpeas (Chana Dal) 1 cup

Raw Mango 2 medium size

Green Chilies 3-4

Sugar 2 teaspoons

Fresh scraped Coconut 2 Tablespoons

Chopped Coriander leaves 2 teaspoons

Salt to taste

For Tempering

Oil 1 tablespoon

Mustard Seeds ¼ teaspoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Turmeric ½ teaspoon (or as required)

Asafoetida 2 pinch

Curry leaves 8-10 (optional)

Instructions

1. Wash and soak Split Chickpeas (Chana dal) in water for 6 hours.

2. Drain water from Chickpeas. Coarse Grind soaked chickpeas along with green chilies. Preferable to Use pulse mode of grinder.

Coarsely Ground Chickpeas (जाडसर वाटलेली डाळ)

3. Mix ground chickpeas, sugar, salt, scraped coconut, chopped coriander leaves. Wash, Peel and grate raw mangoes.

Ground Chickpeas with other ingredients (वाटलेली डाळ आणि  बाकीचं साहित्य)

4. For Tempering, heat oil in a laddle on medium flame.

5. Add mustard seeds, wait for sputter; add cumin seeds, wait for sputter; add Turmeric Powder, Asafoetida and Curry Leaves.

Chickpeas mixture and grated raw mango (डाळीचं मिश्रण आणि  किसलेली कैरी)

6. Pour the above Tempering over the mixture made in step 3. Mix well.

7. Now add ½ of grated raw mango; mix well. Keep adding grated raw mango to the mixture till you get required sourness. If Raw mangoes are too sour, you may not require all the grated mango.

8. Yummy Kairi Dal is ready.

Note

1. This preparation does not last more than 5-6 hours.

2. In case one does not have time to prepare Amba Dal just before serving , then follow the recipe till step 6 and keep Chickpeas Mixture and Grated Raw Mango separately in refrigerator. Add the grated raw mango just before serving and mix well.

3. Left over Amba Dal can be stored in Deep Freezer for 2 days. Take it out of the Refrigerator 1 hour before serving.

Amba Dal / Kairi Dal (आंब्याची डाळ)
Amba Dal / Kairi Dal (आंब्याची डाळ)

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

आंब्याची डाळ – उन्हाळा स्पेशल

आंब्याची डाळ ही महाराष्ट्रीयन स्पेशालिटी आहे. खरं तर ही कैरीची डाळ आहे पण ह्याचं नाव मात्र आंब्याची डाळ असं आहे. का ते माहित नाही. चैत्रात कैरी मिळायला लागली की कैरीचं पन्हे आणि आंब्याची डाळ हा बेत सिझन संपेपर्यंत चालूच असतो. ही डाळ काही जणांना अजिबात आवडत नाही. माझे वडील त्यात एक होते. ते आंबा डाळीला पोपटाचं खाणंम्हणायचे (भिजवलेली चणा डाळ आणि मिरची असते म्हणून!!). आम्ही मात्र अगदी आवडीने खायचो आंबा डाळ!!

आंब्याची डाळ करायला अगदी सोपी असते. मात्र आंबा डाळ करताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या.

. ही डाळ कच्ची असल्यामुळे जास्त वेळ टिकत नाही. त्यामुळे आधी करून ठेवायची असेल तर डाळीचं मिश्रण करून ठेवायचं आणि कैरी मात्र खायच्या वेळी घालायची.

. डाळ वाटताना जाडसर वाटायची. खलबत्त्यात कुटलेला डाळीची चव अप्रतिम लागते.

. आंब्याच्या डाळीला खमंग फोडणी असेल तर चव आणखी छान येते. ह्या फोडणीचं सुद्धा एक तंत्र आहे. मी स्वयंपाक करायला लागल्यावर आईला विचारलं होतं की तिची फोडणी माझ्या फोडणीपेक्षा खमंग का लागते? त्यावर आईची टीप होती तेलात मिसळण (मोहरी, धने आणि कारळे तिळाचं मिश्रण जे आम्ही मोहरीऐवजी वापरतोतडतडलं की बाकीचे जिन्नस घालायच्या आधी किंचित थांबायचं. आईच्या भाषेत मिसळण थावटु द्यायचं”. म्हणजे फोडणी खमंग होते. पण हे काळजीपूर्वक करायचं नाहीतर फोडणी जळते.. सरावाने मलाही अशी खमंग फोडणी जमायला लागली.

साहित्य ( जणांसाठी) ( कप = २५० मिली)

चणा डाळ १ कप

कैरी २ मध्यम आकाराच्या

हिरवी मिरची

साखर २ टीस्पून

ताजा खवलेला नारळ २ टेबलस्पून

चिरलेली कोथिंबीर २ टीस्पून

मीठ चवीनुसार 

फोडणीसाठी

तेल १ टेबलस्पून

मोहरी पाव टीस्पून

जिरे पाव टीस्पून

हळद अर्धा टीस्पून

हिंग २ चिमूट

कढीपत्ता १० (ऐच्छिक)


कृती

. चणा डाळ धुवून ६ तास पाण्यात भिजवून ठेवा.

. पाणी निथळून भिजलेली डाळ आणि हिरवी मिरची मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या (किंवा  खलबत्त्यात कुटून घ्या).

Coarsely Ground Chickpeas (जाडसर वाटलेली डाळ)

. डाळीत मीठ, साखर, नारळ, कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करा.

Ground Chickpeas with other ingredients (वाटलेली डाळ आणि  बाकीचं साहित्य)

. छोट्या  कढल्यात तेल गरम करून मोहरी, जिरं, हळद, हिंग आणि कढीपत्ता घालून खमंग फोडणी कराही फोडणी डाळीच्या मिश्रणात घालून मिश्रण नीट ढवळून घ्या.

. कैरी धुवून, सोलून किसून घ्या.

Chickpeas mixture and grated raw mango (डाळीचं मिश्रण आणि  किसलेली कैरी)

. डाळीच्या मिश्रणात थोडा थोडा कैरीचा कीस घालून ढवळून घ्या. डाळ जशी  आंबट हवी असेल त्यानुसार कैरी घाला.

. चवदार आंबा डाळ तयार आहे. अशीच खा किंवा पोळी/ भाता सोबत खा.

टीप

. ही आंबा डाळ ५६ तासापेक्षा जास्त टिकत नाही.

. आंबा डाळ आधी करून ठेवायची असेल तर वर कृतीत लिहिल्याप्रमाणे पाचव्या पायरीपर्यंत कृती करून डाळीचं मिश्रण आणि किसलेली कैरी वेगवेगळी फ्रिजमध्ये ठेवा. आणि खायच्या वेळी डाळीच्या मिश्रणात कैरी घालून आंबा डाळ करा.

. उरलेली डाळ फ्रिजर मध्ये ठेवून दिवस चांगली राहते. खायच्या आधी तासभर फ्रिजमधून बाहेर काढून ठेवा.

Amba Dal / Kairi Dal (आंब्याची डाळ)
Amba Dal / Kairi Dal (आंब्याची डाळ)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes