Aluchi Dethi (अळूची देठी) – Colocasia Stem Raita / Salad
We use Colocasia Leaves for Making Aluvadi – Patra. But most people throw away the stems. Use these stems to make a Raita / Salad. The basic principle of not wasting any food is strictly followed here. In Marathi, stem is called Deth. Hence this salad is called Dethi. It is a specialty from Konkan. It tastes awesome. The recipe is very easy. Serve this Raita as an accompaniment or have it by itself.
Sometimes hands start itching after handling Colocasia stems. In such cases rub Kokum / Tamarind on hands and wash hands with soap and water.
Ingredients (Serves 3)
Colocasia leaves about 15
Crushed Green Chili ½ teaspoon
Sugar ½ teaspoon (or as per taste)
Fresh Scraped coconut 1 teaspoon
Chopped Coriander 1 teaspoon
Salt to taste
Curd 2-3 tablespoon
For Tempering (Tadka)
Pure Ghee (Clarified Butter) 1 teaspoon
Cumin Seeds ½ teaspoon
Asafoetida a pinch
Instructions
1. Wash and peel Colocasia Stems. Chop it fine and Pressure cook till tender.
2. While the Stems are warm, mash it using a masher / spoon.
3. When mixture comes to room temperature, add Crushed Green chili, salt, sugar, scraped coconut, coriander. Mix together.
4. Add Curd and mix well.
5. Heat ghee in a ladle. Add Cumin Seeds. When they sputter, add Asafoetida (Hing). Pour this Tempering on mixture and mix well.
6. Aluchi Dethi is ready. Serve it as accompaniment or have it by itself.
==================================================================================
अळूची देठी – चविष्ट तोंडीलावणं
अळूच्या पानांची अळूवडी केल्यावर बरेच जण देठं टाकून देतात किंवा भाजीवाल्याकडून पानं आणताना देठं आणत नाहीत. ह्या देठांची कोशिंबीर खूप छान होते. कोकणात याला अळूची देठी म्हणतात. काहीही फुकट घालवायचं नाही हे कोकणस्थी तत्व अगदी लागू होतं ह्या देठीला. ही कोशिंबीर कशाही सोबत खाऊ शकता किंवा अशीच खाऊ शकता. मस्त लागते.
अळूला खाज असेल तर देठं सोलल्यावर हाताला आमसूल / चिंच लावून हात नीट धुवून घ्या.
साहित्य (३ जणांसाठी)
अळूची देठं १५
ठेचलेली हिरवी मिरची अर्धा टीस्पून
साखर अर्धा टीस्पून (चवीनुसार कमी / जास्त करा)
ताजा खवलेला नारळ १ टीस्पून
चिरलेली कोथिंबीर १ टीस्पून
गोड दही २–३ टेबलस्पून
मीठ चवीनुसार
फोडणीसाठी
साजूक तूप १ टीस्पून
जिरं अर्धा टीस्पून
हिंग १ चिमूट
कृती
१. अळूची देठं धुवून सोलून घ्या आणि बारीक चिरून घ्या. प्रेशर कुकर मध्ये नीट शिजवून घ्या.
२. गरम असतानाच चमच्याने कुस्करून एकजीव करा.
३. गार झाल्यावर त्यात मिरची, मीठ, साखर, नारळ, कोथिंबीर घालून मिश्रण ढवळून घ्या.
४. दही घालून मिश्रण एकजीव करा.
५. छोट्या कढल्यात साजूक तुपाची जिरं आणि हिंगाची खमंग फोडणी करून कोशिंबिरीवर घाला आणि ढवळून घ्या.
६. अळूची देठी तयार आहे. तोंडीलावणं म्हणून द्या किंवा अशीच खायला द्या. खूप छान लागते.
Your comments / feedback will help improve the recipes