Bajri Moogdalichi Khichadi (बाजरी मूगडाळीची खिचडी) – Pearl Millet and Lentil Kedgeree – No Rice Recipe
Bajri Moogdalichi Khichadi (Pearl Millet and Lentil Kedgeree) is a healthy, tasty and quick ‘one pot meal’. This is very apt for winter. This recipe does not use Rice; hence good for people who want to avoid rice. When you want to cook something quick and filling, this can be one of the option. It’s a complete meal in itself. It’s full of Proteins, Carbs and Antioxidants. Lentils used here are with Husk; hence has more Fibre also. Khichadi Served with spoonful of Desi Ghee (Clarified Butter) and roasted / fried Papad is a soul food for many of us. This Khichadi is of Porridge consistency.
Ingredients (Serves 4) (1 cup = 250 ml)
Pearl Millet (Bajri Grains) ¾ cup
Split Petite Yellow Lentil with Husk (Chhilakewali Moog Dal) ½ cup
Ginger Crushed ½ teaspoon
Roasted Cumin Powder ½ teaspoon
Coriander Powder ½ teaspoon
Slit Green Chilies 3-4
Fresh Scraped Coconut 2 tablespoon
Chopped coriander 2 tablespoon
Lemon Juice 1 teaspoon
Clarified Butter(Ghee) 2 tablespoon + 1 teaspoon
Mustard Seeds ¼ teaspoon
Cumin Seeds ¼ teaspoon
Turmeric Powder ½ teaspoon
Asafoetida 2 pinch
Curry Leaves 8-10
Salt to taste
Instructions
1. Wash and Drain Bajri Grains and rest for 15 minutes. Wash and Drain Moog Dal and rest for 15 minutes.
2. Using a grinder, coarse grind Bajri without adding water. Do not make a fine powder.
3. In a pan, heat 2 tablespoons of Clarified Butter. Add Mustard Seeds, wait for splutter. Add cumin seeds, wait for splutter. Add Turmeric Powder, Asafoetida, Slit Green Chilies, Crushed Ginger and Curry Leaves.
4. Add Bajri, Moog Dal and saute on low flame for 10 minutes.
5. Simultaneously in a bowl, heat 4 cups of water; Let it come to boil. Add boiling water to the pan. Mix.
6. Add Cumin Powder, Coriander Powder, Lemon juice, Salt. Cook covered on low flame.
7. Keep stirring regularly. Check the consistency and add hot water if required.
8. When Bajri and Moog Dal is cooked, add fresh scraped coconut and coriander. Mix. Finally add remaining Ghee and mix.
9. While serving add some Pure Ghee on Khichadi and serve hot Khichadi with Papad and curd.
==================================================================================
बाजरी आणि मूगडाळीची खिचडी – चविष्ट आणि पौष्टिक soul फूड – तांदुळाशिवाय खिचडी – हिवाळा स्पेशल
हिवाळ्यात पोटभरीचं, पौष्टिक आणि चविष्ट one pot meal हवं असेल तर बाजरी आणि मूगडाळीची खिचडी नक्की करून बघा. हिवाळ्यात मुद्दाम बाजरी खातात. बाजरी सोबत ह्या खिचडीत सालाची मूगडाळ घातली आहे. आणि तांदूळ अजिबात घातला नाहीये. त्यामुळे तांदूळ न खाणारे लोकही ही खिचडी खाऊ शकतात.
ही खिचडी मऊ भाताच्या consistency ची असते. छान थंड हवेत गरम वाफाळती खिचडी, वर सढळ हाताने घातलेलं साजूक तूप, सोबत दही आणि पापड असा बेत असेल तर त्यापुढे पंचपक्वान्न फिकी वाटतात.
साहित्य (४ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)
बाजरी पाऊण कप
सालाची मूग डाळ अर्धा कप
हिरव्या मिरच्या ३–४ उभी चीर देऊन
ठेचलेलं आलं अर्धा टीस्पून
धने पावडर अर्धा टीस्पून
जिरे पावडर अर्धा टीस्पून
साजूक तूप २ टेबलस्पून + १ टीस्पून
मोहरी पाव टीस्पून
जिरं पाव टीस्पून
हळद अर्धा टीस्पून
हिंग २ चिमूट
कढीपत्ता ८–१० पानं
लिंबाचा रस १ टीस्पून
ताजा खवलेला नारळ २ टेबलस्पून
चिरलेली कोथिंबीर २ टेबलस्पून
मीठ चवीनुसार
कृती
१. एका वाडग्यात बाजरी धुवून पाणी निथळून १५ मिनिटं झाकून ठेवा. दुसऱ्या वाडग्यात सालाची मूगडाळ धुवून पाणी निथळून १५ मिनिटं झाकून ठेवा..
२. बाजरी पाणी न घालता मिक्सरमध्ये रवाळ वाटून घ्या. जास्त बारीक करू नका.
३. एका पातेल्यात २ टेबलस्पून साजूक तूप गरम करून त्यात मोहरी, जिरं, हळद, हिंगाची फोडणी करून घ्या. फोडणीत आलं, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घाला.
४. पातेल्यात बाजरी आणि मूग डाळ घालून मंद आचेवर १० मिनिटं परता.
५. दुसरीकडे ४ कप पाणी गरम करायला ठेवा. पाणी उकळलं की पातेल्यात घाला. त्यात धने पूड, जिरे पूड, लिंबाचा रस आणि मीठ घालून ढवळून घ्या.
६.पातेल्यावर झाकण ठेवून मंद आचेवर शिजवा. मधे मधे ढवळत राहा. खिचडी सुकी वाटत असेल तर थोडं गरम पाणी घाला.
७. खिचडी शिजली की त्यात नारळ कोथिंबीर घालून ढवळा. शेवटी १ टीस्पून साजूक तूप घालून ढवळा. चविष्ट खिचडी तयार आहे.
८. गरम खिचडीवर सढळ हाताने साजूक तूप घालून सोबत पापड आणि दही खायला द्या.
Your comments / feedback will help improve the recipes