Simla Mirchi Peeth Perun Bhaaji ( सिमला (ढोबळी) मिरचीची पीठ पेरून भाजी) – Capsicum Subji with Gram Flour – No Onion Garlic Recipe

Simla Mirchi Peeth Perun Bhaaji ( सिमला (ढोबळी) मिरचीची पीठ पेरून भाजी) - Capsicum
Simla Mirchi Peeth Perun Bhaaji ( सिमला (ढोबळी) मिरचीची पीठ पेरून भाजी)

Simla Mirchi Peeth Perun Bhaaji ( सिमला (ढोबळी) मिरचीची पीठ पेरून भाजी) – Capsicum Subji with Gram Flour – No Onion Garlic Recipe

सिमला (ढोबळी) मिरचीची पीठ पेरून भाजी मराठी

This is a tasty subji made using Capsicum. Subjis using Dry Gram Flour are very popular in Maharashtrians. Chopped vegetables are added to Tempering and cooked without adding water. After vegetables are cooked, dry Gram Flour is sprinkled in the pan and then cooked with little water. These subjis taste yummy and are very easy to cook. Onions, Spring Onions, Capsicum, Snake Gourd, Fenugreek Leaves, Radish Greens subjis are made this way. I add little Rice flour (half of Gram flour) along with Gram Flour so that the subji does not get very dry.

Use Iron Wok for these subjis. Subjis taste better.

Ingredients (Serves 3) (1 cup = 250 ml)

Capsicum ¼ kg

Gram Flour ½ cup

Rice Flour ¼ cup

Chili Powder ½ teaspoon

Carom Seeds (Ajwain) ½ teaspoon

Sugar ½ -1 teaspoon

Mango Powder ¼ teaspoon

Fresh Scraped Coconut 1 Tablespoon

Chopped Coriander 1 teaspoon

Oil 1 tablespoon

Mustard Seeds ¼ teaspoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Asafoetida a pinch

Turmeric Powder ½ teaspoon

Salt to taste

Instructions

1. Finely chop Capsicum.

2. In a pan, heat oil. Add Mustard seeds, wait for splutter; Add Cumin Seeds, wait for splutter. Add Carom Seeds, Asafoetida.

3. Add chopped Capsicum, Turmeric powder.

4. Saute on low flame for 2-3 minutes.

5. Cook covered on low flame without adding water till Capsicum is soft.

6. Add Chili Powder, Mango Powder, Salt, Sugar and mix.

7. Sprinkle Gram flour using your fingers in the pan. You can use a spoon also but flour gets sprinkled better by using fingers.

8. Sprinkle rice flour. Mix well.

9. If you want subji to be more dry, sprinkle more Gram flour and rice flour.

10. Now sprinkle ¼ cup of water and cook covered on low flame till flour is cooked (flour should not be sticky).

11. Add Fresh coconut and coriander. Mix.

12. Tasty Capsicum subji is ready. Serve hot with Indian bread.

Note:

1. You can make subji using Spring Onions, Onions, Snake Gourd, Fenugreek Leaves, Radish Greens using this recipe.

Simla Mirchi Peeth Perun Bhaaji ( सिमला (ढोबळी) मिरचीची पीठ पेरून भाजी) - Capsicum
Simla Mirchi Peeth Perun Bhaaji ( सिमला (ढोबळी) मिरचीची पीठ पेरून भाजी)
Simla Mirchi Peeth Perun Bhaaji ( सिमला (ढोबळी) मिरचीची पीठ पेरून भाजी) - Capsicum
Simla Mirchi Peeth Perun Bhaaji ( सिमला (ढोबळी) मिरचीची पीठ पेरून भाजी)

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

सिमला (ढोबळी) मिरचीची पीठ पेरून भाजी कांदा लसूण विरहित

महाराष्ट्रात पीठ पेरून केलेल्या भाज्या खूप लोकप्रिय आहेत. वेगवेगळ्या भाज्या वापरून ह्या भाज्या केल्या जातात. भाज्या फोडणीत घालून वाफेवर शिजवल्या की त्यात तिखट, मीठ (ह्यात मसाला नसतोचफक्त काही भाज्यांत फोडणीत ओवा घालतात) घालून सुकं बेसन घातलं जातं (भुरभुरवतात) – शक्यतो हातानेम्हणजे एकदम जास्त पीठ एका जागी पडत नाही. मी अशा भाज्यांमध्ये थोडं तांदुळाचं पीठ (बेसनाच्या निम्मं) पण घालते. त्यामुळे भाजी गार झाल्यावर सुद्धा सुकी आणि फळफळीत होत नाही. काही ठिकाणी बेसन भाजून घालतात तर काही ठिकाणी कच्चेच. दोन्ही प्रकारे भाजी छान लागतेकांदा, पातीचा कांदा, ढोबळी मिरची, पडवळ, मेथीचा पाला , मुळ्याचा पाला ह्या भाज्यांची अशी भाजी करतात. अगदी सोपी रेसिपी आहे आणि भाजी अतिशय चविष्ट बनते. आणि हो, ह्या भाज्या शक्यतो लोखंडाच्या कढईत कराव्यात. आणखी खमंग लागतात.

साहित्य (३ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)

ढोबळी मिरची पाव किलो बारीक चिरून

बेसन अर्धा कप

तांदुळाचं पीठ पाव कप

लाल तिखट अर्धा टीस्पून

ओवा अर्धा टीस्पून

साखर अर्धाएक टीस्पून

आमचूर पाव टीस्पून

ताजा खवलेला नारळ १ टेबलस्पून

चिरलेली कोथिंबीर १ टीस्पून

तेल १ टेबलस्पून

मोहरी पाव टीस्पून

जिरं पाव टीस्पून

हिंग १ चिमूट

हळद अर्धा टीस्पून

मीठ चवीनुसार

कृती

. एका कढईत तेलाची गरम करून मोहरी, जिरं, हिंगाची फोडणी करा.

. फोडणीत ढोबळी मिरची आणि हळद घालून २३ मिनिटं परता.

. झाकण ठेवून पाणी न घालता मंद आचेवर वाफ काढा. ढोबळी मिरची नरम होईपर्यंत शिजवा.  

. लाल तिखट, आमचूर, मीठ आणि साखर घालून मिक्स करा

. बेसन आणि तांदुळाचं पीठ हाताने भुरभुरवा. छान ढवळून घ्या. भाजी जास्त ओली दिसत असेल तर आणखी १ टेबलस्पून बेसन आणि अर्धा टेबलस्पून तांदुळाचं पीठ घाला. ढवळून घ्या.

. पाव कप पाणी शिंपडून झाकण ठेवून मंद आचेवर वाफ काढा. पीठ हाताला चिकटलं नाही की भाजी शिजली असं समजावं.

. नारळ, कोथिंबीर घालून ढवळून घ्या. गॅस बंद करा.

. ढोबळी मिरचीची पीठ पेरून भाजी तयार आहे. गरम भाजी पोळी / भाकरी सोबत खायला द्या. ही भाजी अशीच खायला ही छान लागते.

टीप

. पातीचा कांदा, कांदा, पडवळ, मेथीचा पाला, मुळ्याचा पाला ह्या भाज्यांची अशीच भाजी करतात.

Simla Mirchi Peeth Perun Bhaaji ( सिमला (ढोबळी) मिरचीची पीठ पेरून भाजी) - Capsicum
Simla Mirchi Peeth Perun Bhaaji ( सिमला (ढोबळी) मिरचीची पीठ पेरून भाजी)
Simla Mirchi Peeth Perun Bhaaji ( सिमला (ढोबळी) मिरचीची पीठ पेरून भाजी) - Capsicum
Simla Mirchi Peeth Perun Bhaaji ( सिमला (ढोबळी) मिरचीची पीठ पेरून भाजी)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes