Neer Phanasachya Phodi / Kaap ( नीर फणसाच्या फोडी / काप) – Pan Fried Bread Fruit Fritters – Traditional Goan / Konkan Recipe

Neer Phanasachya Phodi / Kaap ( नीर फणसाच्या फोडी / काप)
Neer Phanasachya Phodi / Kaap ( नीर फणसाच्या फोडी / काप)

Neer Phanasachya Phodi / Kaap ( नीर फणसाच्या फोडी / काप) Pan Fried Bread Fruit Fritters – Traditional Goan / Konkan Recipe

नीर फणसाच्या फोडी / काप मराठी

In Goa, Pan Fried Fritters (Fodi / Phodi) are very popular. Different vegetables like Potato, Raw Breadfruit (Neer Phanas), Eggplant, Okra, Bitter Gourd, Capsicum are used to make these fritters. Goans have these fritters with Rice and Solkadhi (Kokam Curry). Texture of Raw Neer Phanas is just right for these Phodi and It tastes amazing. Hence most people love these Phodi. These Phodi made using Coconut Oil taste awesome. But you can use any cooking oil if you want.

In Konkan, these fritters are called Kaap. Asafoetida is added while adding the spices and the fritters are rolled into a mixture of Chickpeas flour and Rice flour.

If you are not going to use the whole Breadfruit, place the remaining fruit into a plastic bag and keep it in a refrigerator. It will last for 3-4 days.

Ingredients (Serves 4)

Raw Neer Phanas (Bread Fruit) About half of a medium size fruit

Chili Powder 1 teaspoon

Turmeric Powder ½ teaspoon

Garam Masala ½ teaspoon

Lemon Juice ½ teaspoon

Rice Flour 2 tablespoon

Fine Semolina 3-4 tablespoon

Oil (Preferably Coconut Oil) for Pan Frying

Salt to taste

Instructions

1. Wash Neer Phanas. Cut into 4 halves. Remove the skin and the spongy middle portion.

Neer Phanas (Breadfruit)
Neer Phanas (Breadfruit)
Neer Phanas (Breadfruit)
Neer Phanas (Breadfruit)

2. Chop Neer Phanas into pieces about 3-4 mm thick. Any shape is fine. Dip the pieces in water for 1 hour.

Neer Phanasachya Phodi / Kaap ( नीर फणसाच्या फोडी / काप)
Neer Phanasachya Phodi / Kaap ( नीर फणसाच्या फोडी / काप)

3. After 1 hour, remove the pieces from water. Transfer them into a bowl. Add Chili Powder, Turmeric Powder, Lemon Juice, Garam Masala, Salt and mix together. There will be a thin layer of spice mixture on Neer Phanas pieces.

4. In a plate, mix Rice Flour and Semolina.

5. Heat a Griddle. Put some oil on the Griddle and spread it evenly. Turn the flame to low.

6. Roll each piece in dry flour mixture and place it on hot Griddle. Put some oil around the pieces.

7. Roast pieces for 4-5 minutes and then flip over. Again Put some oil around the pieces.

8. Roast for 3-4 minutes. Pieces should be cooked properly.

9. Yummy Neer Phanas Photi (Fritters) are ready. Serve hot as a snack or a side dish.

Neer Phanasachya Phodi / Kaap ( नीर फणसाच्या फोडी / काप)
Neer Phanasachya Phodi / Kaap ( नीर फणसाच्या फोडी / काप)
Neer Phanasachya Phodi / Kaap ( नीर फणसाच्या फोडी / काप)
Neer Phanasachya Phodi / Kaap ( नीर फणसाच्या फोडी / काप)

==================================================================================

नीर फणसाच्या फोडी (काप) गोवा / तळकोकणातली पारंपरिक रेसिपी

गोव्यात वेगवेगळ्या भाज्यांच्या फोडी / काप करतात. अट्टल गोवेकराच्या मते शिवराक (शाकाहारी) जेवणाला ह्या फोडींमुळे चव येते. बटाटे, नीर फणस (नीरपणस), वांगी, भेंडी, कारले, ढोबळी मिरची ह्या भाज्यांच्या फोडी लोक शित (भात) कढीसोबत (सोलकढी) आवडीनं खातात. नीर फणसाचं टेक्सचर ह्या फोडींसाठी अगदी साजेसं असतं. त्यामुळे ह्या फोडी / काप खूप चविष्ट लागतात. आणि ह्या फोडींसाठी जर खोबरेल तेल वापरलंत तर त्या आणखीनच चवदार होतात.

कोकणात नीर फणसाला विलायती फणस असंही म्हणतात. आणि त्याचे काप (कोकणात फोडी नाही तर काप म्हणतात) करताना हिंग घालतात आणि कापांना थोडं बेसन आणि तांदुळाचं पीठ लावतात. वेगवेगळ्या प्रांतांच्या वेगवेगळ्या रेसिपीज

टीप

सगळा नीर फणस वापरला जाणार नसेल तर कापलेला तुकडा प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून फ्रिजमध्ये ठेवा. ४ दिवस चांगला राहतो.

साहित्य ( जणांसाठी)

नीर फणस मध्यम आकाराचा अर्धा फणस

लाल तिखट १ टीस्पून

हळद अर्धा टीस्पून

गरम मसाला अर्धा टीस्पून

लिंबाचा रस अर्धा टीस्पून

तांदुळाचं पीठ २ टेबलस्पून

बारीक रवा ३४ टेबलस्पून

तेल (शक्यतो खोबरेल) फोडी भाजताना घालण्यासाठी

मीठ चवीनुसार

कृती

. नीर फणस धुवून त्याचे ४ तुकडे करा. साल आणि मधला मऊ भाग काढून टाका. फणसाचे ३४ मिमी जाडीचे तुकडे करा. कोणत्याही आकाराचे तुकडे चालतात. फणसाचे तुकडे १ तास पाण्यात बुडवून ठेवा.

Neer Phanas (Breadfruit)
Neer Phanas (Breadfruit)
Neer Phanas (Breadfruit)
Neer Phanas (Breadfruit)
Neer Phanasachya Phodi / Kaap ( नीर फणसाच्या फोडी / काप)
Neer Phanasachya Phodi / Kaap ( नीर फणसाच्या फोडी / काप)

. तुकडे पाण्यातून काढून एका वाडग्यात घाला. त्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला, लिंबाचा रस आणि मीठ घालून मिसळून घ्या. तुकड्यांना छान मसाला लागलेला दिसेल.

. एका ताटलीत तांदुळाचं पीठ आणि रवा घालून एकत्र करा.

. एक तवा गरम करून त्यावर थोडं तेल घालून पसरून घ्या. गॅसची आच मंद करा.

. फणसाचे तुकडे पिठात घोळवून तव्यावर घाला. तुकड्यांवर सर्व बाजूला थोडं तेल घाला.

. ५ मिनिटं भाजून तुकडे परतून घ्या. परत थोडं तेल घालून दुसरी बाजूही ३४ मिनिटं भाजून घ्या. फोडी शिजल्या गेल्या पाहिजेत.

. नीर फणसाच्या चवदार फोडी / काप तयार आहेत. स्नॅक किंवा साईड डिश म्हणून खायला द्या.

Neer Phanasachya Phodi / Kaap ( नीर फणसाच्या फोडी / काप)
Neer Phanasachya Phodi / Kaap ( नीर फणसाच्या फोडी / काप)
Neer Phanasachya Phodi / Kaap ( नीर फणसाच्या फोडी / काप)
Neer Phanasachya Phodi / Kaap ( नीर फणसाच्या फोडी / काप)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes