Udid Methi (उडदं मेथी) – Goan Specialty Coconut Curry – No Onion Garlic Recipe

Udid Methi (उडदं मेथी) – Goan Specialty Coconut Curry – No Onion Garlic Recipe

उडदं मेथी- मराठी

In Goan cuisine, there are different types of coconut curries. Goans have these curries along with Rice. These are very easy and quick recipes to make tasty curries. I like this Udad Methi Curry very much. In this also there are 2 types depending on the ingredients– one with Tamarind and other with Raw Mango. Also in some places coconut is ground coarse and in some other it is ground fine. All variations are super tasty.

Ingredients (Serves 2-3) (1 cup = 250 ml)

Fresh scraped coconut ½ cup

Raw Mango Medium size pieces 12-15 Or Tamarind 1 cm diameter ball

Turmeric Powder ¼ teaspoon

Chili Powder ¼ – ½ teaspoon

Jaggery ½ – 1 teaspoon

Salt to taste

For Tempering/ Tadka

Oil (Preferably Coconut Oil) 1 teaspoon

Mustard Seeds ¼ teaspoon

Udad / Urad Dal (Split Black Gram) ¼ teaspoon

Fenugreek Seeds 7-8

Asafoetida (Hing) 1 pinch

Curry leaves 4-5

Instructions

1. In a grinder, add Coconut, Turmeric powder, Chili Powder and Tamarind (if you are using it). Add little water. Grind into a coarse (or fine) paste – as per your choice.

2. In a pan, heat Oil. Add Mustard seeds, wait for sputter. Add Udad Dal and Fenugreek Seeds. When Udad Dal changes colour add Asafoetida and Curry Leaves.

3. Add raw Mango Pieces. Saute for a minute. Add a teaspoon of coconut paste and ¼ cup water. Cook on low flame till Mango is soft. (If you are using Tamarind, skip this step).

4. Add Coconut Paste, Salt and Jaggery. Bring the mixture to boil.

5. Add water to adjust consistency. This is a fluid curry and it thickens when it gets cold.

6. Boil the mixture for 5 minutes.

7. Yummy Udad Methi is ready. Relish with hot rice.

==================================================================================

उडदं मेथी गोव्याची स्पेशालिटी नारळाची आमटी – कांदा लसूण विरहित

उडदं मेथी ही गोव्यात लोकप्रिय असलेली उडदाची डाळ आणि मेथीदाणे घालून केलेली  नारळाची आमटी (नारलाचो रोस) आहे. पण कोणीच ह्याला रोस म्हणत नाही. फक्त उडदं मेथी असंच म्हणतात. गोव्यात वेगवेगळ्या प्रकारच्या नारळाच्या आमट्या केल्या जातात. ह्या आमट्या फक्त भात कालवायला घेतात. आपण जशी आमटी पोळीसोबत खातो किंवा अशीच पितो तसं तिकडे करत नाहीत. ह्या उडदं मेथी चे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार चिंच घालून केलेला आणि दुसरा कैरी घालून केलेला. तसंच ह्या आमटीसाठी काहीजण नारळ जाडसर वाटतात तर काहीजण बारीक वाटतात. सगळे प्रकार खूप चविष्ट लागतात. मला तर उडदं मेथी हा प्रकार फारच आवडतो. नक्की करून बघा.

साहित्य ( जणांसाठी) (१ कप = २५० मिली )

ताजा खवलेला नारळ अर्धा कप

कच्च्या कैरीचे मध्यम आकाराचे तुकडे किंवा चिंचेचा १ व्यासाचा गोळा

हळद पाव टीस्पून

लाल तिखट पाव / अर्धा टीस्पून

चिरलेला गूळ अर्धा / एक टीस्पून

मीठ चवीनुसार

फोडणीसाठी

तेल (शक्यतो खोबरेल तेल१ टीस्पून

मोहरी पाव टीस्पून

हिंग १ चिमूट

उडीद डाळ पाव टीस्पून

मेथीदाणे ७

कढीपत्ता ४५ पानं

कृती

. मिक्सरच्या भांड्यात नारळ, हळद, लाल तिखट आणि चिंच (वापरणार असाल तर) घालून थोडं पाणी घालून जाडसर (किंवा बारीक तुम्हाला आवडेल तसं ) वाटून घ्या.

. एका कढईत तेल गरम करून मोहरी घाला. मोहरी तडतडली की उडीद डाळ आणि मेथीदाणे घाला. उडीद डाळीचा रंग बदलला की हिंग आणि कढीपत्ता घाला.

. कैरीचेकैरीचे तुकडे घालून ढवळून घ्या. १ टीस्पून नारळाचं वाटलेलं मिश्रण आणि पाव कप पाणी घाला. मंद आचेवर कैरी मऊ होईपर्यंत शिजवा. (तुम्ही कैरी घालणार नसाल तर ही कृती करू नका).

. नारळाचं वाटलेलं मिश्रण, मीठ आणि गूळ घालून मिश्रण उकळा.

. तुम्हाला ही आमटी जशी दाट / पातळ हवी असेल तसं पाणी घाला. ही आमटी जरा दाटच असते. आणि थंड झाल्यावर ही आळते.

. आमटी ५ मिनिटं उकळून घ्या.

. चविष्ट उडदं मेथी तयार आहे. गरमागरम भातासोबत आस्वाद घ्या.

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes