Kalakand (कलाकंद) – Delicious Milk Pudding

Kalakand (कलाकंद)
Kalakand (कलाकंद)

Kalakand (कलाकंद) – Delicious Milk Pudding without using Condensed Milk

कलाकंद मराठी

Kalakand is a Popular Indian Sweet made from Milk. Most recipes use Condensed Milk along with Milk. But this recipe uses only Milk and Milk Powder. It’s an easy recipe to make super delicious Kalakand. Unlike other Indian Burfi, Kalakand is soft and Grainy.

Ingredients (Makes about 15-16 pieces) (1 cup = 250 ml)

Full Fat Milk ½ litre + ¾ cup

Milk Powder 1 cup

Sugar ½ cup (add more if you want more sweet Kalakand)

Lemon Juice 2 teaspoon mixed with 2 tablespoon water

Pure Ghee (Clarified Butter) 2 teaspoon

Cardamom Powder ¼ teaspoon

Dry fruits as per choice

Instructions

1. Boil ½ liter milk. Slowly Add lemon juice mixed with water and stir.

2. If milk does not cuddle, add 1 teaspoon of diluted vinegar (mixed with 2 teaspoon of water).

3. Pour cuddled milk on a muslin cloth. Pour water on it to remove sourness of lemon. Gently press to remove water from cottage cheese (Paneer). Transfer the cottage cheese to a bowl and keep it aside.

4. Take half of the remaining milk to a bowl. Add milk powder and make a smooth paste. Add some more milk if required.

5. Transfer remaining milk to a thick bottom pan (preferably non-stick), add Ghee and bring the mixture to boil.

6. Add milk powder paste to the pan and mix it. Keep reducing the mixture on low flame. Keep stirring all the time.

7. When all the water from the mixture dries out, add cottage cheese, sugar and mix.

8. The mixture will be watery again. Keep reducing it by cooking on low flame. Keep stirring all the time.

9. When the water from the mixture dries and it starts coming together, add cardamom powder and mix well.

Kalakand (कलाकंद)
Kalakand (कलाकंद)

10. Switch off the gas. Transfer the mixture to a greased plate/ tray and level it. Sprinkle dry fruit on the top and press gently.

Kalakand (कलाकंद)
Kalakand (कलाकंद)

11. When the mixture comes to room temperature, keep the plate / tray in the refrigerator for 30 minutes so that the mixture sets properly.

12. Take out the plate / tray from the refrigerator and cut it into pieces of desired shape and size.

13. Delicious Kalakand is ready. In hot and humid weather, Kalakand will last for 1- 2 days without refrigeration. Store it in the refrigerator if you want to store it longer.

Kalakand (कलाकंद)
Kalakand (कलाकंद)
Kalakand (कलाकंद)
Kalakand (कलाकंद)

 

 

 

 

 

 

==================================================================================

कलाकंद कंडेन्स्ड मिल्क न वापरता केलेली स्वादिष्ट मिठाई

कलाकंद ही सर्वांना आवडणारी दुधाची मिठाई आहे. मऊ दाणेदार स्वादिष्ट कलाकंद करण्याची रेसिपि सोपी आहे. बऱ्याच रेसिपी मध्ये कलाकंद करताना कंडेन्स्ड मिल्क घालतात. पण ह्या रेसिपीत कंडेन्स्ड मिल्क वापरलं नाहीये. फक्त दूध आणि दुधाची पावडर वापरून केलेला कलाकंद करायला अगदी सोपा आहे. खाली दिलेल्या प्रमाणात किंचित अगोड (फिका) कलाकंद होतो (माझ्या मते असा कलाकंदच छान लागतो). पण तुम्हाला आणखी गोड हवा असेल तर साखरेचं प्रमाण वाढवा.

साहित्य (१५१६ वड्यांसाठी) (१ कप = २५० मिली)

म्हशीचं दूध अर्धा लिटर + पाऊण कप (full fat मिल्क)

दुधाची पावडर १ कप

साखर अर्धा कप

लिंबाचा रस २ टीस्पून २ टेबलस्पून पाण्यात मिक्स करून

साजूक तूप २ टीस्पून

वेलची पूड पाव टीस्पून

सुका मेवा आवडीनुसार

कृती

. अर्धा लिटर दूध उकळी येईपर्यंत गरम करा. त्यात पाण्यात मिसळलेला लिंबाचा रस घाला.

. आता दूध फाटलेलं असेल. पनीर आणि पाणी वेगळं दिसायला लागेलदूध जर फाटलं नाही तर १ टीस्पून व्हिनेगर २ टीस्पून पाण्यात मिसळून दुधात घाला.

. फाटलेलं दूध मलमलच्या कापडावर ओता. पाणी वेगळं होईल. तयार पनीरवर पाणी ओतून घ्या म्हणजे लिंबाचा आंबटपणा निघून जाईल. हलक्या हाताने पनीर दाबून जास्तीचं पाणी काढून टाका. तयार पनीर एका वाडग्यात काढून घ्या.

4. उरलेल्या दुधातलं अर्ध दूध एका वाडग्यात घ्या. त्यात दुधाची पावडर घालून नीट ढवळून घ्या. जरूर पडल्यास आणि थोडं दूध घाला.

. उरलेलं दूध एका नॉन स्टिक कढईत घाला. त्यात साजूक तूप घाला आणि मिश्रण गरम करा.

. मिश्रणाला उकळी आली की त्यात दुधाच्या पावडरचं मिश्रण घाला. मंद आचेवर मिश्रण एकसारखं ढवळत आटवा.

. मिश्रणातलं पाणी आटून मिश्रण खव्यासारखं घट्ट झालं की त्यात पनीर आणि साखर घालून एकजीव करा.

. मिश्रण पुन्हा पातळ होईल. परत मंद आचेवर एकसारखं ढवळत राहून मिश्रण आटवा.

. मिश्रणातलं पाणी आटून मिश्रण खव्यासारखं घट्ट झालं की त्यात वेलची पूड घालून ढवळून घ्या.

Kalakand (कलाकंद)
Kalakand (कलाकंद)

१०. गॅस बंद करून मिश्रण एका तूप लावलेल्या ताटलीत घाला आणि चमच्याने पसरून समतल करा. वर सुक्या मेव्याचे बारीक तुकडे घालून हलक्या हाताने दाबून घ्या.

Kalakand (कलाकंद)
Kalakand (कलाकंद)

११. मिश्रण थंड झालं की ताटली अर्धा तास फ्रिजमध्ये ठेवा.

१२. ताटली बाहेर काढून सुरीने वड्या पाडा.

१३. स्वादिष्ट कलाकंद तयार आहे. मुंबईच्या गरम आणि दमट हवेत कलाकंद फ्रिजबाहेर १२ दिवसच चांगला राहतो. जास्त दिवस ठेवायचा असेल तर फ्रिजमध्ये ठेवा.

Kalakand (कलाकंद)
Kalakand (कलाकंद)
Kalakand (कलाकंद)
Kalakand (कलाकंद)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes