Kakdiche Gharge ( काकडीचे – तवशाचे– घारगे ) – Sweet Puri made from Cucumber with No Refined Sugar
This is a traditional Konkani dish made from Cucumber – Tavshe (Cucumber variety available in Konkan and Goa). It’s an easy recipe using Cucumber, Jaggery and Rice Flour. This is mild sweet preparation generally eaten as main course (along with the meal). But you can have it as tea time snack as well.
Ingredients (Makes 20-22 Gharge) (1 cup = 250 ml)
Cucumber (Tavshe) Peeled and Grated ½ cup
Rice flour 1.25 to 1.5 cup (approx)
Jaggery crushed ½ cup
Cardamom Powder ¼ teaspoon
Salt a pinch
Oil / Ghee ½ teaspoon
Oil / Ghee for frying
Instructions
1. Peel and grate Cucumber (Tavshe). Squeeze it slightly to remove excess juice. This juice added with a pinch of salt is a soothing drink.
2. In a bowl, mix grated Cucumber and Jaggery. Ensure Jaggery dissolves completely and there are no pieces left.
3. Add a pinch of salt, cardamom powder to the mixture. Gradually mix Rice flour to form a medium consistency dough. Add ½ teaspoon of ghee and bind the dough properly. Cover and Rest it for 1 hour.
4. Make small balls of the dough. Use a plastic sheet or butter paper to pat the dough ball into a round shape Puri. Puri should be little thick. Deep fry Puris in oil / Ghee.
5. These Puris can be eaten hot or cold. Serve with Desi ghee / clarified butter.
Note
1. In case big cucumber is not available, you can use the regular one.
==================================================================================
काकडीचे (तवशाचे) घारगे – स्वादिष्ट खुसखुशीत पारंपरिक पदार्थ
हा कोकणातला पारंपरिक पदार्थ आहे. कोकणात मोठ्या काकड्या मिळतात त्यांना तवशे म्हणतात. हे तवशे वापरून हे घारगे केले जातात. घरात असणारं अगदी कमी साहित्य वापरून हे स्वादिष्ट खुसखुशीत घारगे केले जातात. रेसिपी अगदी सोपी आहे. घारगे दुसऱ्या दिवशीही छान लागतात. मुलांना डब्यात देण्यासाठी छान पर्याय आहे. आदल्या रात्री घारगे करून ठेऊ शकता.
साहित्य (२०–२२ घारग्यांसाठी) (१ कप = २५० मिली)
काकडीचा कीस अर्धा कप
चिरलेला गूळ अर्धा कप
तांदुळाचे पीठ अंदाजे सव्वा ते दीड कप
मीठ चिमूटभर
वेलची पूड पाव टीस्पून
साजूक तूप अर्धा टीस्पून
तेल / तूप घारगे तळण्यासाठी
कृती
१. काकडी सोलून किसून घ्या. कीस हाताने हलकेच पिळून पाणी वेगळं काढा. ह्या पाण्यात किंचित मीठ घालून ते प्यायला छान लागतं.
२. एका परातीत काकडीचा कीस आणि गूळ एकत्र करून हाताने मिसळून घ्या. गूळ काकडीच्या किसात विरघळला पाहिजे.
३. मिश्रणात मीठ, वेलची पूड घालून मिसळून घ्या. थोडं थोडं तांदुळाचं पीठ घालून मध्यम सैल पीठ भिजवून घ्या. हे घारगे थापून करतात, त्यामुळे पीठ फार घट्ट नको आणि सैलही नको.
४. अर्धा टीस्पून साजूक तूप घालून पीठ चांगलं मळून घ्या आणि १ तास झाकून ठेवा.
५.पीठ जरा मळून घ्या आणि लिंबाच्या आकाराचे गोळे करा. गोळे थापून जाडसर पुऱ्या बनवा आणि मध्यम आचेवर गरम तेलात / तुपात तळून घ्या.
६. स्वादिष्ट खमंग खुसखुशीत घारगे साजूक तुपासोबत आणखी छान लागतात. तूप नको असेल तर असेच ही खाऊ शकता. घारगे शिळे पण छान लागतात.
टीप
१. मोठी काकडी नसेल तर नेहमी मिळणारी काकडी सुद्धा वापरू शकता.
Your comments / feedback will help improve the recipes