Dahiwali Bhendi (दहीवाली भेंडी ) – Okra with Yogurt based Gravy – No Onion Garlic Recipe

Dahiwali Bhendi (दहीवाली भेंडी )
Dahiwali Bhendi (दहीवाली भेंडी )

Dahiwali Bhendi (दहीवाली भेंडी ) – Okra with Yogurt based Gravy- No Onion Garlic Recipe

दहीवाली भेंडी मराठी

While searching for new recipes for Bhendi / Bhindi / Okra Subji, I came across Dahiwali Bhindi recipe. I tend to look for recipes without Onion, Garlic as I feel these preparations retain the original taste of the main ingredients. I checked a few recipes for Dahiwali Bhindi and then created my own version to suit our palate. This recipe makes very yummy subji of Bhindi without Onion Garlic. Try it out.

Ingredients (Serves 4) (1 cup = 250 ml)

Bhindi / Bhendi / Okra ½ kg (Preferably use the small variety)

For Marination

Green Chilies 2-3 slit lengthwise

Chili Powder ½ teaspoon

Turmeric Powder ½ teaspoon

Coriander Powder ½ teaspoon

Salt to taste

Oil 2 tablespoon

For Gravy

Thick Curd / Yogurt 1 cup

Turmeric Powder ½ teaspoon

Chili Powder ½ teaspoon

Coriander Powder ½ teaspoon

Oil 2 tablespoon

Gram Flour / Besan 1 teaspoon

Tomato 1 medium size – roughly chopped

Ginger Chili Paste 1.5 teaspoon

Cumin Seeds ½ teaspoon

Fennel Seeds / Saunf ½ teaspoon

Coriander Seeds 1 teaspoon – roughly crushed

Asafoetida a pinch

Kasuri Methi 1.5 teaspoon

Sugar ½ to 1 teaspoon (adjust as per taste)

Salt to taste

Instructions

1. Wash and Wipe Okra. Trim head and Tail. Since we are using whole Okra in this recipe, buy small variety of Okra. If you get the long Okra, chop them into 2-3 pieces depending on the size (each piece about 2 inch long). Transfer Okra into a bowl.

2. Add all ingredients mentioned above for Marination, mix well and keep covered for 15-20 minutes.

Dahiwali Bhendi Masala (दहीवाली भेंडी मसाला )
Marinated Bhendi (मसाला लावलेली भेंडी)

3. Transfer Curd in a bowl and beat it. Do not add water. Add Turmeric Powder, Chili Powder, Coriander Powder, ½ tablespoon Oil, salt to the curd. In a small bowl, mix Gram flour and 1 tablespoon of curd to make a smooth paste. Add Gram Flour paste to Curd bowl and mix well.

4. Heat a wok on medium flame. Add marinated Okra to the wok. Saute for 2 minutes. Cook covered on medium flame till Okra is little soft. If required, add 1 teaspoon of oil while cooking.

5. In another Pan, add remaining oil and heat. Add cumin seeds and wait for splutter. Add fennel seeds, wait for splutter. Add coriander seeds and Asafoetida. Add Ginger chili paste and saute for 1 minute.

6. Add Curd mixture, 1 cup water and keep cooking on low flame stirring all the time. Once the mixture comes to boil, add Okra, Tomatoes and Sugar. Keep cooking on low flame till Okra is cooked. Add Salt and Chili Powder, if required.

7. Finally add crushed Kasuri Methi. Stir gently.

8. Yummy Dahiwali Bhindi is ready. Serve hot with Indian bread.

Dahiwali Bhendi (दहीवाली भेंडी )
Dahiwali Bhendi (दहीवाली भेंडी )
Dahiwali Bhendi (दहीवाली भेंडी )
Dahiwali Bhendi (दहीवाली भेंडी )

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

दहीवाली भेंडी भेंडीची चविष्ट भाजी कांदा लसूण विरहित

भेंडीच्या वेगळ्या रेसिपी शोधताना मला दहीवाली भेंडी मसाला नावाची रेसिपी दिसली. मला कांदा लसूण न घातलेल्या रेसिपीज जास्त आवडतात कारण अशा रेसिपीत मुख्य भाजीची चव लपत नाही. ह्या दहीवाल्या भेंडीच्या २३ रेसिपीज वाचून मी आम्हाला आवडेल अशी रेसिपी तयार केली. अति तेल आणि मसाले न घालता सुद्धा ही भाजी छान लागते. आमच्या घरी ही आवडत्या भाज्यांमध्येगणली जाते.      

साहित्य (४ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)

भेंडी अर्धा किलो (शक्यतो लहान भेंडी घ्या)

भेंडीला लावायच्या मसाल्यासाठी

हिरवी मिरची २३ उभी चीर देऊन

लाल तिखट अर्धा टीस्पून

हळद अर्धा टीस्पून

धने पावडर अर्धा टीस्पून

मीठ चवीनुसार

तेल २ टेबलस्पून

रस्सा ग्रेव्ही साठी

घट्ट दही १ कप

हळद अर्धा टीस्पून

लाल तिखट अर्धा टीस्पून

धने पावडर अर्धा टीस्पून

तेल २ टेबलस्पून

बेसन १ टीस्पून

टोमॅटो १ मध्यम आकाराचा मध्यम आकाराचे तुकडे करून

आलं मिरची पेस्ट दीड टीस्पून

जिरं अर्धा टीस्पून

बडीशेप अर्धा टीस्पून

धने १ टीस्पून अर्धवट कुटून

हिंग १ चिमूट

मसुरी मेथी दीड टीस्पून

साखर अर्धा एक टीस्पून (चवीनुसार कमी / जास्त करा)

मीठ चवीनुसार

कृती

. भेंडी धुवून कापडाने पुसून घ्या. देठ आणि शेवटचं टोक काढून टाका. ह्या रेसिपीमध्ये अख्खी भेंडी वापरतात त्यामुळे लहान आकाराची भेंडी घ्या. लहान भेंडी नसतील तर भेंडीचे २३ तुकडे करून घ्या (साधारण २ इंच लांबीचे).

. भेंडी एका वाडग्यात घाला. वर लिहिलेलं भेंडीला लावायचा मसालासाहित्य वाडग्यात घाला आणि ढवळून घ्या. मसाला भेंडीला नीट लागला पाहिजे. १५२० मिनिटं वाडगा झाकून ठेवा.

Dahiwali Bhendi Masala (दहीवाली भेंडी मसाला )
Marinated Bhendi (मसाला लावलेली भेंडी)

. दुसऱ्या वाडग्यात दही फेटून घ्या. पाणी घालू नका. दह्यात हळद, लाल तिखट, धने पावडर, अर्धा टेबलस्पून तेल आणि मीठ घाला. एका छोट्या वाटीत बेसन आणि १ टेबलस्पून दही घालून मिश्रण करा. गुठळी होऊ देऊ नका. बेसनचं मिश्रण दह्यात घालून मिश्रण एकजीव करा.

. एक कढई गरम करून मसाला लावलेली भेंडी त्यात घाला. मध्यम आचेवर २ मिनिटं परतून घ्या. झाकण ठेवून मध्यम आचेवर भांडी नरम होईपर्यंत शिजवून घ्या. जरूर पडल्यास आणखी १ टीस्पून तेल घाला.

. दुसऱ्या कढईत उरलेलं तेल गरम करून जिरं घाला. जिरं तडतडलं की बडीशेप घाला. नंतर अर्धवट कुटलेले धने आणि हिंग घाला. आलं मिरचीची पेस्ट घालून १ मिनिट परतून घ्या.

. त्यात दह्याचं मिश्रण आणि १ कप पाणी घाला. मंद आचेवर सतत ढवळून मिश्रण गरम करा. मिश्रणाला उकळी आली की त्यात भेंडी, टोमॅटो आणि साखर घाला. मंद आचेवर भेंडी शिजेपर्यंत शिजवा. चव बघून जरूर असल्यास लाल तिखट आणि मीठ घाला.

. कसुरी मेथी चुरडून घाला. हलकेच ढवळून गॅस बंद करा.

. चविष्ट दहीवाली भेंडी तयार आहे. गरमगरम भेंडी पोळी / पराठा सोबत खायला द्या.

Dahiwali Bhendi (दहीवाली भेंडी )
Dahiwali Bhendi (दहीवाली भेंडी )
Dahiwali Bhendi (दहीवाली भेंडी )
Dahiwali Bhendi (दहीवाली भेंडी )

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes