Dalyache Laadoo (डाळ्याचे लाडू) – Roasted Chana Flour Sweet Balls .. No white sugar
Besan laadoo is an all time favorite sweet dish. But making Besan Laadoo is a time consuming process. If you want some easy and quick laddus try these laddus with Roasted Chana Flour (Roasted Bengal Gram). Roasted Chana is easily available in any store in India. This is what we generally add to Chivada. It’s called Daale or Pandharpuri Daale in Marathi. You can also get the flour of roasted Chana. In case it’s not readily available, grind peeled roasted Chana to make flour. I add a secret ingredient to these laddus to make them more delicious. Read the recipe below for the details.
Ingredients (1 cup = 250 ml) (Makes 20-22 Laddus)
Ground Roasted Dalia / Roasted Chana / Roasted Split Bengal Gram 250 Gms (2 cups)
Desi Ghee ½ cup + 2 tablespoon
Crushed Jaggery 1.25 cups
Cardamom Powder ¼ teaspoon
Dry Ginger (Sunth) Powder 3 teaspoon
Milk 1 tablespoon
Dry fruits as required
Instructions
1. In a thick bottom pan, add Ghee and Roasted Chana Flour. Roast it on low flame till the flour changes the colour and you get nice aroma of roasted flour. Keep stirring all the time; else it will burn. It takes7-8 minutes to roast.
2. Now remove the pan from gas. Immediately add milk. You will see lot of bubbles. Keep stirring till bubbles stop.
3. Immediately add crushed Jaggery and mix thoroughly so that Jaggery properly mixes with the flour. When mixture is lukewarm, add Cardamom powder, Dry Ginger Powder and dry fruits of your choice.
4. Leave the mixture to cool. When mixture comes to room temperature, roll Laadoos.
5. Enjoy delicious Daale Jaggery laadoos. These laadoos last for 2-3 weeks without refrigeration.
==================================================================================
डाळ्याचे लाडू – सोपे स्वादिष्ट लाडू
बेसन लाडू आपण नेहमीच करतो. बेसन भाजायला वेळ नसेल तर अगदी पटकन होणारे हे डाळ्याचे लाडू नक्की करून बघा. डाळं म्हणजे आपण चिवड्यात घालतो ते (सोललेले भाजके चणे – पंढरपुरी डाळं). डाळं आधीच भाजलेलं असल्यामुळे पीठ भाजायला कमी वेळ लागतो. ह्यात मी एक सिक्रेट जिन्नस घालते त्यामुळे लाडू अगदी स्वादिष्ट होतात.
साहित्य (१ कप = २५० मिली) (२०–२२ लाडू होतात)
डाळ्याचं पीठ पाव किलो (२ कप)
साजूक तूप अर्धा कप + २ टेबलस्पून
चिरलेला गूळ सव्वा कप
वेलची पूड पाव टीस्पून
सुंठ पावडर ३ टीस्पून
दूध १ टेबलस्पून
सुका मेवा आवडीप्रमाणे
कृती
१. एका जाड बुडाच्या पातेल्यात तूप आणि डाळ्याचं पीठ घालून मंद आचेवर खमंग भाजून घ्या. भाजायला ७–८ मिनिटं लागतात. डाळ्याचं पीठ नसेल तर डाळं मिक्सरमध्ये दळून पीठ करून घ्या.
२. पिठाचा रंग बदलला आणि छान खमंग सुगंध आला की गॅस बंद करून लगेच दूध घाला. आणि मिश्रण ढवळत राहा. पीठ फुलेल. खूप बुडबुडे येतील आणि थोडा वेळ ढवळल्यावर बुडबुडे येणं बंद होईल. असे केल्यानं लाडवाचा ढास बसत नाही ( लाडू घशाला चिकटत नाही).
३. मिश्रण दुसऱ्या पातेल्यात काढून लगेच चिरलेला गूळ घालून नीट एकजीव करून घ्या.
४. मिश्रण कोमट झालं की त्यात वेलची पूड आणि सुंठ पावडर घालून एकजीव करा.
५. मिश्रण गार झालं की लाडू वळा. बेदाणे / काजू मिश्रणात घालू शकता किंवा प्रत्येक लाडू वळताना लावू शकता.
६. डाळ्याचे लाडू २–३ आठवडे टिकतात. फ्रिजमध्ये ठेवू नका.
Your comments / feedback will help improve the recipes