Instant Chakali Bhajani (इन्स्टंट चकली भाजणी) – An easy way to make mixed flour for Chakali
Chakali is a Popular Maharashtrian Snack. There are different ways to make Chakali. But the one made using Bhajani (Flour of roasted grains) tastes the best. Chakali Bhajani is not available in the market all the time. Generally it’s available before Diwali. Also it may not be possible to make the Bhajani at home due to time constraints or due to unavailability of a Flour mill nearby. To overcome all these problems, I’ve come up with an easy way to make the Bhajani at home. Last few years, I’ve been making Chakali using this Instant Bhajani. And Chakali comes out as good as the ones made with Bhajani made in traditional way. As Mansi says ‘No one can eat just one..’… Try this out. You will like it.
Ingredients (1 cup = 250 ml) (Makes 650-700 grams of Bhajani)
Rice Flour 3 cup
Split Bengal Gram Flour (Besan) ¾ cup
Split Black Gram Flour (Udid Dal Flour) 1 cup
Whole Wheat Flour 1/8 cup
Flattened Rice Flour (Poha Flour) 1/8 cup
Cumin Seeds Powder ½ cup
Instructions
1. Mix all ingredients mentioned above. Pass them through a sieve.
2. Roast the mixture on low flame for 3-4 minutes.
3. Instant Chakali Bhajani is ready. Use this Bhajani to make Chakali.
Click on the following link to get the recipe of how to make Chakali from this Bhajani:
Bhajanichi Chakali (भाजणीची चकली) – Popular Maharashtrian Snack
Note
1. Grind Udid Dal in a Grinder to make Udid Dal flour.
2. For Poha Flour, roast Poha on low flame till they are crispy. Upon cooling, grind in a Grinder.
==================================================================================
इन्स्टंट चकली भाजणी
चकली हा सर्वांना प्रिय असणारा पदार्थ आहे. चकल्या वेगवेगळ्या पद्धतीनं करतात. ह्या सर्व प्रकारात भाजणीची चकली सगळ्यात खमंग लागते. पण ही भाजणी बाजारात फक्त दिवाळीच्या वेळेसच मिळते. भाजणी घरी करायला सर्वांना वेळ असतोच असं नाही. आणि भाजणीची धान्य भाजली तरी ती दळून द्यायला खात्रीलायक गिरणी जवळपास असेलच असं नाही. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे ही इन्स्टंट चकलीची भाजणी. मी स्वतः ही रेसिपी बनवलीय. गेली काही वर्षे मी ही इन्स्टंट भाजणी वापरूनच चकल्या करते. अगदी पारंपरिक पद्धतीने केलेल्या भाजणीच्या चकलीसारख्याच चकल्या होतात. खमंग, खुसखुशीत आणि चविष्ट. माझी सून म्हणते ‘no one can eat just one’.. तुम्हीही करून बघा.
साहित्य (१ कप = २५० मिली ) (अंदाजे ६५०–७०० ग्राम भाजणीसाठी)
तांदूळ पीठ ३ कप
बेसन पाऊण कप
उडीद डाळ पीठ १ कप
कणिक १/८ कप
पोह्याचं पीठ १/८ कप
जिरे पावडर अर्धा कप
कृती
१. वर साहित्यात दिलेले जिन्नस एकत्र करून चाळणीने चाळून घ्या.
२. मिश्रण मंद आचेवर ३–४ मिनिटं भाजून घ्या.
३. इन्स्टंट चकलीची भाजणी तयार आहे. तुमची नेहमीची पद्धत वापरून चकल्या करा.
चकल्यांच्या रेसिपीसाठी ह्या लिंकवर क्लिक करा:
Bhajanichi Chakali (भाजणीची चकली) – Popular Maharashtrian Snack
टीप
१. उडीद डाळ मिक्सरमध्ये दळून उडीद डाळीचं पीठ करू शकता.
२. पोहे कुरकुरीत होईपर्यंत भाजून गार झाल्यावर मिक्सरमध्ये पोह्याचं पीठ करू शकता.
Your comments / feedback will help improve the recipes