Kang / Kangni / Ralyachi Idli (कांग / कांगणी / राळ्याची इडली) – Foxtail Millet Idli

Kang / Kangni / Ralyachi Idli (कांग / कांगणी / राळ्याची इडली) – Foxtail Millet Idli
Kang / Kangni / Ralyachi Idli (कांग / कांगणी / राळ्याची इडली) – Foxtail Millet Idli

Kang / Kangni / Ralyachi Idli (कांग / कांगणी / राळ्याची इडली) Foxtail Millet Idli

कांग / कांगणी / राळ्याची इडली मराठी

#Millets2023 #Milletsyear

People who can’t eat rice have to refrain themselves from eating Idlis. Check this Idli recipe that does not contain rice and uses a healthy millet called Kang / Kangni / Rale / Foxtail Millet . Foxtail millet is not so popular in Maharashtra. I’d not seen or eaten it earlier. But as per my house helper, it is commonly used in Rajastan. There people have it on fasting days in the form of Indian bread (Roti).

These Idlis are more tasty than the normal Rice, Lentil Idlis. Kang / Foxtail Millet is available in a grocery store as well as in Online shop. Kang / Foxtail Millet is small yellowish grains little bigger than Barnyard Millet / Sama Rice / Vari Tandul. Photo of the millet is also given in the recipe. These tasty Idlis are very soft and fluffy. Try them out.

Ingredients (1 cup = 250ml) (Makes 24-25 Idlis)

Urad Daal (Split Black Gram) 1 cup

Kang / Kangni / Foxtail Millet 1 cup

Kang / Kangni / Rale (कांग / कांगणी / राळं) – Foxtail Millet
Kang / Kangni / Rale (कांग / कांगणी / राळं) – Foxtail Millet

Fenugreek seeds 1 teaspoon

Salt to taste

Ginger paste 1 teaspoon (Optional)

Chili paste ½ teaspoon (Optional)

Instructions

1. Wash and soak Urad Daal and Kang separately for 7-8 hours.

2. Drain water and grind them separately. Grind Kang coarse and Urad Daal fine.

3. Mix both batters in a bigger bowl. Cover it and keep for fermentation for 7-8 hours.

4. Batter will be double after it is fermented. Add salt and mix well.

5. If you want to add ginger and chili paste, do it now.

6. Boil water in Idli steamer. Apply some oil to idli moulds. Add batter in each mould.

7. When water in the steamer starts boiling, keep idli stand in the steamer and Steam idlis for 20-25 minutes.

8. Serve hot with your choice of Chutney / Sambar.

Kang / Kangni / Ralyachi Idli (कांग / कांगणी / राळ्याची इडली) – Foxtail Millet Idli
Kang / Kangni / Ralyachi Idli (कांग / कांगणी / राळ्याची इडली) – Foxtail Millet Idli
Kang / Kangni / Ralyachi Idli (कांग / कांगणी / राळ्याची इडली) – Foxtail Millet Idli
Kang / Kangni / Ralyachi Idli (कांग / कांगणी / राळ्याची इडली) – Foxtail Millet Idli

==================================================================================

कांग / कांगणी / राळ्याची इडली तांदूळ न घालता – #millets2023

२०२३ हे आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष म्हणून साजरं होतंय. म्हणून ही खास राळ्याची इडली तांदूळ न घालता केलेली. कांग / कांगणी / राळं हे एक भरडधान्य (मिलेट) आहे. आपल्या महाराष्ट्रीयन स्वयंपाकात फारसं प्रचलित नसलेलं हे धान्य आहे. मी तरी आतापर्यंत कधी पाहिलं / खाल्लं नव्हतं. पण माझी मदतनीस बाई सांगत होती की तिच्या राजस्थानमधल्या गावात कांगणी नेहमी खाल्लं जातं. पूर्वीच्या काळी हे कोणी विकत आणत नसत. शेताच्या कडेला उगवलेल्या गवताच्या शेंड्याला कांगणीच्या लोंब्या लागतात ते गवत उपटून आणून कांगणी खाल्ली जायची. तिथे उपासाला ह्याची भाकरी करून खातात. कांग / राळं पिवळ्या रंगाचं लहान धान्य असतं वरी तांदुळापेक्षा थोडं मोठं. माहितीसाठी पोस्टमध्ये त्याचा फोटो दिलाय.

जे कोणी तांदूळ खाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी खास तांदुळाशिवाय इडली. जे तांदूळ खातात त्यांनाही जरा वेगळा प्रकार म्हणून ही इडली आवडेल. ह्यात मी कांग / राळं आणि उडीद डाळ घालते. म्हणजे अगदी प्रोटीन पॅक्ड नाश्ता. ह्याची चव नेहमीच्या इडल्यांपेक्षा छान लागते.

साहित्य (१ कप = २५० मिली )(२४२५ इडल्यांसाठी)

उडीद डाळ १ कप

कांग / कांगणी / राळं १ कप

Kang / Kangni / Rale (कांग / कांगणी / राळं) – Foxtail Millet
Kang / Kangni / Rale (कांग / कांगणी / राळं) – Foxtail Millet

मेथी १ टीस्पून

मीठ चवीनुसार

वाटलेलं आलं १ चमचा ऐच्छिक

वाटलेली हिरवी मिरची अर्धा चमचा ऐच्छिक

कृती

. उडीद डाळ आणि राळं धुवून वेगवेगळं ७८ तास पाण्यात भिजवा.

. पाणी निथळून डाळ आणि राळं वेगवेगळं वाटून घ्या. राळं जाडसर वाटा आणि उडीद डाळ बारीक वाटा.

. दोन्ही पिठं एकत्र करून मिसळून घ्या आणि झाकण ठेवून ७८ तास पीठ आंबण्यासाठी ठेवा.

. पिठात मीठ घाला. मिरची, आलं घालायचं असेल तर घाला.

. इडली पात्रात / मोठ्या पातेल्यात पाणी गरम करायला ठेवा. इडलीच्या साच्याला थोडं तेल लावून घ्या.

. साच्यात थोडं थोडं पीठ घालून पात्रातलं पाणी उकळलं की इडली साचा पात्रात ठेवा आणि झाकण ठेवून २०२५ मिनिटं वाफवून घ्या.

. गरम गरम इडल्या चटणी / सांबारसोबत खायला द्या.

Kang / Kangni / Ralyachi Idli (कांग / कांगणी / राळ्याची इडली) – Foxtail Millet Idli
Kang / Kangni / Ralyachi Idli (कांग / कांगणी / राळ्याची इडली) – Foxtail Millet Idli
Kang / Kangni / Ralyachi Idli (कांग / कांगणी / राळ्याची इडली) – Foxtail Millet Idli
Kang / Kangni / Ralyachi Idli (कांग / कांगणी / राळ्याची इडली) – Foxtail Millet Idli

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes