Makyacha Chivada (मक्याचा चिवडा) – Corn Chivada – Crispy Chivada using Flattened Corn

Makyacha Chivada (मक्याचा चिवडा) - Corn Chivada
Makyacha Chivada (मक्याचा चिवडा) - Corn Chivada

Makyacha Chivada (मक्याचा चिवडा) – Corn Chivada – Crispy Chivada using Flattened Corn

मक्याचा चिवडा मराठी

We make Poha Chivada regularly. One can make Chivada using Corn Poha – Flattened Corn. This Chivada is very tasty. It’s an easy recipe to make this Chivada. Corn Poha is easily available in the market. Corn Poha is fried in oil to make yummy Chivada. You can add Groundnuts, Dry Coconut, Roasted Chana and any dry fruits you want. This is a tasty any time snack.

Corn Poha gets evenly fried when you use a stainless steel strainer (Pohe Talani – पोहे तळणी) to fry it.

Ingredients (Makes about 400 Grams of Chivada) (1 cup = 250 ml)

Corn Poha (Flattened Corn) 3 cups (about 250 Gms)
Groundnut ¼ cup + 2 tablespoon
Thin sliced Dry Coconut ¼ cup
Dalia /Daale / Roasted Chana Daal / Roasted Split Bengal Gram ¼ cup
Cashews 12-15 chopped into medium size pieces
Raisins 12-15
Curry leaves 20-22
Oil ½ cup to fry + 2 tablespoon for tempering
Mustard seeds ½ teaspoon
Turmeric Powder ¼ teaspoon
Asafoetida 1/8 teaspoon
Sesame seeds 1 teaspoon
Chili powder 1 teaspoon (adjust as per taste)
Citric acid / Amchoor 1/8 teaspoon
Salt to taste
Powdered sugar 1 tablespoon

Instructions

1. Add ½ cup of oil in a thick bottom pan and heat it. Add about 1 tablespoon of Flattened Corn (Corn Poha) to a stainless steel strainer (or Pohe Talani – पोहे तळणी) at a time and place the strainer in hot oil to deep fry Corn Poha. This way deep fry all the Corn Poha and take out in a big bowl.

2. In the same oil, deep fry Groundnuts, sliced Dry Coconut, Cashews and Curry leaves. Take them out in the same bowl.

Makyacha Chivada (मक्याचा चिवडा) - Corn Chivada
Makyacha Chivada (मक्याचा चिवडा) – Corn Chivada

3. In a thick bottom pan add 2 tablespoon of oil. Do not use the oil that was used for deep frying. The oil becomes thick after frying ingredients. Add Mustard seeds, wait for splutter; add Turmeric Powder, Asafoetida, Raisins, Sesame Seeds, Citric Acid / Amchoor, Salt, Chili Powder and mix. Switch off the gas.

4. Add all the deep fried ingredients and gently mix. Add Powdered Sugar, mix and Put the pan on low flame. Add Roasted Chana Daal. Mix and heat the pan in low flame for 3-4 minutes. Stir 2-3 times.

5. Tasty Corn Chivada is ready. Allow the Chivada to cool completely before you store it in an air-tight container.

6. Enjoy Yummy Corn Chivada along with a hot cup of tea. Corn Chivada can be stored at room temperature for 3 weeks.

Makyacha Chivada (मक्याचा चिवडा) - Corn Chivada
Makyacha Chivada (मक्याचा चिवडा) – Corn Chivada
Makyacha Chivada (मक्याचा चिवडा) - Corn Chivada
Makyacha Chivada (मक्याचा चिवडा) – Corn Chivada

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

मक्याचा चिवडा (Corn Chivada) – चविष्ट कुरकुरीत चिवडा

पोह्याचा चिवडा आपण नेहमीच करतो. मक्याच्या पोह्यांचा चिवडा सुद्धा छान होतो. मकाई चिवडा ह्या नावाने बाजारात मिळणारा चिवडा बऱ्याच जणांनी खाल्ला असेल. हा चिवडा मक्याच्या पोह्यांचाच केलेला असतो. हा चिवडा घरी करायला अगदी सोपा आहे. मक्याचे पोहे बाजारात मिळतात. ते तळून घेऊन आपल्या आवडीप्रमाणे शेंगदाणे, खोबरं, डाळं आणि सुका मेवा घालून हा चिवडा करतात. ह्यात मी काही विशेष मसाला घालत नाही. घरात नेहमी असणारे जिन्नस घालून हा चविष्ट चिवडा करता येतो.

मक्याचे पोहे तळताना पोहे तळणी (किंवा स्टीलचं गाळणे) वापरली तर पोहे छान तळले जातात.

साहित्य (अंदाजे अंदाजे ४०० ग्रॅम चिवड्यासाठी) (१ कप = २५० मिली )

मक्याचे पोहे ३ कप (अंदाजे पाव किलो)

शेंगदाणे पाव कप + २ टेबलस्पून

खोबऱ्याचे पातळ काप पाव कप

डाळं पाव कप

काजू १२-१५ मध्यम आकाराचे तुकडे करून

बेदाणे (किसमिस) १२- १५

कढीपत्ता २०- २२ पानं

तेल अर्धा कप पोहे तळायला + २ टेबलस्पून फोडणीसाठी

मोहरी अर्धा टीस्पून

हळद पाव टीस्पून

हिंग १/८टीस्पून

तीळ १ टीस्पून

लाल तिखट १ टीस्पून (चवीप्रमाणे कमी / जास्त करा )

लिंबाचं फूल (citric acid) / आमचूर १/८ टीस्पून
मीठ चवीनुसार

पिठीसाखर १ टेबलस्पून

कृती

१. एका कढईत अर्धा कप तेल घालून गरम करा. पोहे तळणी किंवा मोठं गाळणे घेऊन मक्याचे पोहे मंद आचेवर तळून घ्या. एका वेळी साधारण १ टेबलस्पून पोहे घालून तळा. जास्त तेल घालून पोहे तळता येतात पण तळण झाल्यावर तेल दाट होतं आणि परत वापरता येत नाही. म्हणून मी कमी तेल घालून पोहे तळते. तळलेले पोहे एका परातीत काढून घ्या.

२. त्याच तेलात शेंगदाणे, खोबरं, काजू आणि कढीपत्ता तळून घ्या आणि परातीत काढा.

Makyacha Chivada (मक्याचा चिवडा) - Corn Chivada
Makyacha Chivada (मक्याचा चिवडा) – Corn Chivada

. जाड बुडाच्या पातेल्यात २ टेबलस्पून तेल गरम करा. त्यात मोहरी, हळद, हिंग घालून खमंग फोडणी करा. त्यात बेदाणे, तीळ, लिंबाचं फूल / आमचूर, मीठ आणि लाल तिखट घालून ढवळून घ्या आणि गॅस बंद करा.

४. सगळे तळलेले जिन्नस पातेल्यात घाला आणि हलक्या हाताने ढवळून घ्या. पिठीसाखर घालून ढवळा आणि पातेलं परत मंद आचेवर ठेवा. डाळं घालून ढवळून घ्या. मंद आचेवर ३-४ मिनिटं चिवडा गरम करा. मधे २-३ वेळा ढवळा.

५. मक्याचा चविष्ट चिवडा तयार आहे. चिवडा पूर्ण गार झाला की हवाबंद डब्यात भरून ठेवा.

मक्याच्या कुरकुरीत चिवड्याचा गरम चहासोबत आस्वाद घ्या. हा चिवडा फ्रिझबाहेर आठवडे चांगला राहतो.

Makyacha Chivada (मक्याचा चिवडा) - Corn Chivada
Makyacha Chivada (मक्याचा चिवडा) – Corn Chivada
Makyacha Chivada (मक्याचा चिवडा) - Corn Chivada
Makyacha Chivada (मक्याचा चिवडा) – Corn Chivada

 

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes