Peanut Butter (पीनट बटर – शेंगदाण्याचं लोणी) – Healthy, Crunchy, Delicious Bread Spread – No Refined Sugar

Peanut Butter (पीनट बटर)
Peanut Butter (पीनट बटर)

Peanut Butter (पीनट बटर शेंगदाण्याचं लोणी)Healthy, Crunchy, Delicious Bread Spread – No Refined Sugar

पीनट बटर – शेंगदाण्याचं लोणी मराठी

Peanut Butter is a popular bread spread. It is very easy to make this at home. Home made Peanut butter is more tasty and you can control the sweetness as per your choice. I use roasted peanuts with peeling them. That enhances the taste of the butter. Also I add Jaggery in place of Sugar thereby making it healthier.

Addition of Oil (Preferably filtered Groundnut Oil) is necessary to get the right consistency of the butter. The amount of Oil has to be adjusted as per one’s preference of butter consistency as well as the Oil content of the peanuts. Try making Peanut Butter at home with this recipe; you will never buy it from the market.

Ingredients (1 cup = 250 ml)

Roasted Peanuts 2 cups

Crushed Jaggery 2 tablespoon

Oil about ¼ cup

Salt a pinch

Instructions

1. Peel Roasted Peanuts if you like. I use them unpeeled. Save ½ cup peanuts for later use.
2.
Transfer 1.5 cups of peanuts into a mixer jar. Grind till you get a coarse powder.
3.
Add Jaggery and Salt. Keep grinding till you get a smooth paste.
4.
Now add remaining peanuts and oil. Grind for a few seconds. These peanuts should be crunchy; so grind such that these freshly added peanuts are broken into pieces.
5.
This will be a paste of spreadable consistency. If you want it too thick, add some more oil and mix. Transfer peanut paste into a jar.
6. Delicious, Healthy and Crunchy Peanut Butter is ready.
This Peanut Butter lasts for about a month at room temperature. No need to refrigerate.
7.
Enjoy Delicious Peanut Butter with Bread, Roti, Paratha or as it is.

Note

1. We like crunchy Peanut Butter. If you like it Creamy, Grind all peanuts together in the mixer.
2. Instead of Jaggery, you can add Honey or Sugar.

Peanut Butter (पीनट बटर)
Peanut Butter (पीनट बटर)
Peanut Butter (पीनट बटर)
Peanut Butter (पीनट बटर)

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

पीनट बटर (Peanut Butter)- शेंगदाण्याचं लोणी स्वादिष्ट, पौष्टिक स्प्रेड

पीनट बटरचं मराठीत भाषांतर शेंगदाण्याचं लोणीअसं आहे पण हा पदार्थ पीनट बटरम्हणूनच ओळखला जातो. परदेशी प्रवास करताना जेव्हा शाकाहारी खाण्याचे हाल व्हायचे तेव्हा पीनट बटर आणि पाव हा माझा रोजचा नाश्ता असायचा. मग नंतर इथेही पीनट बटर आणायला लागले. रोज खाल्लं जात नाही पण आठवड्यातून एकदा पावासोबत खाल्लं जातं. माझ्या मुलालाही हे फार आवडतं. मग काही दिवसांनी पीनट बटर घरी करायला लागले. ह्याच्या नावात जरी बटर असलं तरी ह्यात अजिबात बटर नसतं.

घरी केलेलं पीनट बटर जास्त स्वादिष्ट, खमंग लागतं आणि मुख्य म्हणजे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी / जास्त गोड करू शकता. फक्त ४ जिन्नस लागतात ह्याला. मी शेंगदाणे सालासकट घालते त्यामुळे शेंगदाणे सोलण्याचा त्रासही वाचतो. Spreadable consistency साठी ह्यात मी गोडं तेल घालते. तेही फिल्टर्ड तेल घातलं तर जास्त चांगला स्वाद येतो. पीनट बटर एकदा ह्या रेसिपीनुसार करून बघा. तुम्ही परत कधी विकतचे बटर आणणार नाही.

साहित्य (१ कप = २५० मिली)

भाजलेले शेंगदाणे २ कप

चिरलेला गूळ २ टेबलस्पून

तेल अंदाजे पाव कप

मीठ चिमूटभर

कृती

. तुम्हाला हवं असेल तर भाजलेले शेंगदाणे सोलून घ्या. मी सालासकट शेंगदाणे घालते. /२ कप शेंगदाणे वेगळे काढून ठेवा.

. दीड कप शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात घालून जाडसर वाटून घ्या.

. गूळ आणि मीठ घालून मिश्रण अगदी बारीक वाटून घ्या.

. आता बाजूला ठेवलेले शेंगदाणे आणि तेल घाला आणि अगदी थोडा वेळ मिक्सर फिरवा. नंतर घातलेले शेंगदाणे बारीक व्हायला नकोत. फक्त तुकडे झाले पाहिजेत.

. हे मिश्रण spreadable consistency (पावाला लावता येईल इतपत पातळ) असेल. तुम्हाला मिश्रण आणखी पातळ हवं असेल तर आणखी थोडं तेल घालून मिश्रण एकत्र करा. ह्यात किती तेल घालावं लागेल हे शेंगदाणे कसे आहेत ह्यावर अवलंबून असतं. शेंगदाणे तेलकट असतील तर तेल कमी लागतं. वाटलेलं मिश्रण एका बरणीत काढून घ्या.

. स्वादिष्ट, पौष्टिक, crunchy पीनट बटर तयार आहे. हे फ्रिजबाहेर महिनाभर टिकेल.

. पीनट बटर तुम्ही ब्रेड, पोळी, पराठा कशाहीसोबत खाऊ शकता किंवा असंच खायला ही छान लागतं.  

टीप

. आम्हाला crunchy (शेंगदाण्याचे तुकडे असलेलं) पीनट बटर आवडतं. तुम्हाला असे तुकडे नको असतील तर सुरुवातीलाच सगळे शेंगदाणे मिक्सरमध्ये घालून वाटून घ्या.

. ह्यात तुम्ही गुळाऐवजी साखर किंवा मध घालू शकता.

Peanut Butter (पीनट बटर)
Peanut Butter (पीनट बटर)
Peanut Butter (पीनट बटर)
Peanut Butter (पीनट बटर)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes