Sabudana Appe without Potato (साबुदाणा आप्पे – बटाटा विरहित) – Tapioca / Sago Pan Fried Croquettes without Potatoes

Sabudana Appe without Potato (साबुदाणा आप्पे - बटाटा विरहित)
Sabudana Appe without Potato (साबुदाणा आप्पे - बटाटा विरहित)

Sabudana Appe without Potato (साबुदाणा आप्पे – बटाटा विरहित) – Tapioca / Sago Pan Fried Croquettes without Potatoes

साबुदाणा आप्पे – बटाटा विरहित मराठी

One of the most popular dish for Fasting days in Maharashtra is Sabudana Vada. It’s a deep fried snack using Tapioca Pearls. We try to avoid deep fried food. Pan fried Sabudana Appe is a healthy option for Deep Fried Sabudana Vada. These Appe are crisp from outside and soft inside. Taste is very similar to Sabudana Vada but it’s cooked with very less Ghee. Hence one can relish it without any guilt. I do not add Potatoes in these Appe. Instead I add Elephant Yam. That makes it more healthy too.

Ingredients (Makes 35-38 Appe) (1 cup = 250 ml)

Sabudana (Tapioca) 3 cups

Elephant Yam ¼ kilo

Roasted Peanut Powder 4-5 tablespoons

Chili Paste 1.5 teaspoon

Amchoor (Mango Powder ) ½ teaspoon

Cumin Seeds ½ teaspoon

Chopped Coriander 2 tablespoon

Kokam 5-6

Salt to taste

Ghee (Clarified butter) / Oil for Pan Frying

Instructions

1. Wash and soak Sabudana in water for 4-6 hours. Add water in the bowl just enough to cover Sabudana. If you add more, Sabudana will be soggy; if you add less, Sabudana won’t soak properly.

2. Wash, Peel and chop Yam into thin slices of about ¼ cm thick.

3. Wash the slices; transfer them to a bowl. Add kokam, ½ teaspoon salt and pressure cook Yam till soft.

4. Upon cooling discard kokam. Using a grinder, grind Yam into a smooth paste.

5. Loosen soaked Sabudana. Mix all ingredients except ghee in a bowl.

6. If required, add little water to bind the mixture together. You should be able to roll balls of the mixture.

7. Make round balls to fit the Grooves of your Appe Pan.

8. Heat Appe Pan. Grease the Grooves with some oil/ Ghee.

9. Place one ball in each groove. Drop some oil/ Ghee in each groove.

10.Cook covered for 2-3 minutes on medium flame.

11. Flip over each Appe. Drop some oil/ Ghee (if you like) and cook covered for 2-3 minutes.

12. Serve Hot Sabudana Appe with Chutney and /or sweet Yogurt (Yogurt mixed with some sugar and a pinch of salt).

Note

1. Instead of Elephant Yam, you can add Boiled Potatoes. For the above measure, you will need 4-5 medium size Potatoes. Mash them and mix it with other ingredients in step 5.

Sabudana Appe without Potato (साबुदाणा आप्पे - बटाटा विरहित)
Sabudana Appe without Potato (साबुदाणा आप्पे – बटाटा विरहित)
Sabudana Appe without Potato (साबुदाणा आप्पे - बटाटा विरहित)
Sabudana Appe without Potato (साबुदाणा आप्पे – बटाटा विरहित)

 

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

साबुदाणा आप्पे उपासासाठी बटाटा विरहित चविष्ट पदार्थ

उपासाच्या दिवशी साबुदाणा नाही खाल्ला तर उपास केला असं वाटत नाही. साबुदाणा वडा तर सर्वांचाच आवडता पदार्थ. पण तळलेला पदार्थ असल्यामुळे आमच्याकडे जास्त केला जात नाही. साबुदाणा वड्यांना हेल्दी पर्याय म्हणजे साबुदाणा आप्पे. अगदी कमी तेल / तुपात करता येतात आणि चवीत फारसा फरक पडत नाही. हे आप्पे बाहेरून खुसखुशीत आणि आत छान मऊ असतात. हे आप्पे मी बटाटे न घालता सुरण घालून करते. त्यामुळे आप्पे पौष्टिक ही होतात.

साहित्य (३५३८ आप्पे होतात ) (१ कप = २५०मिली)

साबुदाणे ३ कप

सुरण पाव किलो

भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट टेबलस्पून

ठेचलेली मिरची दीड टीस्पून

आमचूर अर्धा टीस्पून

जिरे अर्धा टीस्पून

चिरलेली कोथिंबीर २ टेबलस्पून

कोकम

मीठ चवीनुसार

तेल / तूप आप्पे भाजण्यासाठी

कृती

. साबुदाणे धुवून तास भिजत ठेवा. पातेल्यात साबुदाणे बुडतील एवढंच पाणी घाला.

. सुरण धुवून, सोलून त्याचे पातळ काप करून घ्या.

. एका पातेल्यात सुरणाचे काप, आमसूल (कोकम) आणि अर्धा टीस्पून मीठ घालून प्रेशर कुकर मध्ये वाफवून घ्या.

. सुरण गार झाल्यावर कोकम काढून टाका. मिक्सरमध्ये सुरण बारीक करून घ्या.

. भिजलेले साबुदाणे मोकळे करून त्यात सर्व जिन्नस (तूप वगळून) घालून मिश्रण एकत्र करा.

. लागलं तरच थोडं पाणी घाला. मिश्रणाचे गोळे करता आले पाहिजेत.

. तुमच्या आप्पे पॅन च्या आकारानुसार मिश्रणाचे गोळे करून घ्या.

. आप्पे पॅन गरम करून प्रत्येक खाचेत थेम्ब तेल / तूप घाला. प्रत्येक खाचेत एक एक गोळा ठेवून वरून थेम्ब तेल / तूप घाला.

. झाकण ठेवून मध्यम आचेवर मिनिटं भाजा. आता आप्पे परतून दुसरी बाजूही झाकण ठेवून छान सोनेरी रंगावर भाजून घ्या.

१०. गरम गरम साबुदाणा आप्पे चटणी आणि गोड दह्याबरोबर सर्व्ह करा. गोड दह्यासाठी ताज्या दह्यात थोडी साखर आणि किंचित मीठ घालून एकजीव करा.

टीप

. ह्यात सुरणाऐवजी उकडलेला बटाटा घालू शकता. वरील प्रमाणासाठी ४५ मध्यम आकाराचे बटाटे लागतील. बटाटे उकडून, सोलून कुस्करून घ्या आणि बाकी जिन्नसांसोबत मिश्रणात घाला.

Sabudana Appe without Potato (साबुदाणा आप्पे - बटाटा विरहित)
Sabudana Appe without Potato (साबुदाणा आप्पे – बटाटा विरहित)
Sabudana Appe without Potato (साबुदाणा आप्पे - बटाटा विरहित)
Sabudana Appe without Potato (साबुदाणा आप्पे – बटाटा विरहित)

 

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes